Join us  

कळ्या येतात पण फुलं नीट वाढत नाही? ५ ट्रिक्स, गुलाबांनी बहरेल बाल्कनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 5:14 PM

What To Do If Rose Plant Is Not Flowering : किचनमध्ये उरलेलं भाज्यांचे पाणी, फळांची सालं  तुम्ही मातीत  घालू शकता.

घरात  लावलेल्या फुल झाडांची व्यवस्थित वाढ होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. फुलं झाड खरेदी करताना ती चांगली असतात पण नंतर फुलांची वाढच व्यवस्थित होत नाही. गुलाबाची फुलं गार्डनची शोभा वाढण्यात फायदेशीर ठरतात. ज्या लोकांना गार्डनिंगची आवड असते. (What To Do If Rose Plant Is Not Flowering)

असे लोक सोपे घरगुती उपाय करून फुलांची वाढ करू शकतात. (Easy Tips To Grow Roses) जर फुलांना सुर्यप्रकाश मिळत नसेल किंवा रोपाला सावली मिळत नसेल तर फुलांची वाढ व्यवस्थित होत नाही. गुलाबाच्या रोपाला रोज ४ ते ५ तास ऊन मिळणं गरजेचं असतं. (Easy Ways To Grow Rose At Home)

गार्डन डिजाईनच्या रिपोर्टनुसार  गुलाबाचे झाड वाढण्यासाठी फुलं आल्यानंतर लगचेच त्याची छाटणी करा.  जास्त फुलल्यानंतर तुम्ही काढलं तर फुल कोमेजू शकते. फुलं ताजी आणि हायड्रेटेड असतील तेव्हाच कापा. जर तुम्ही बाटलीत रोप लावलं असेल तर रोपातील पाणी नेहमीच बदलत राहा. रोपाची माती सुकली असेल किंवा मुळांना पाणी मिळत नसेल तर फुलं न येण्याचे कारण ठरतं.

रात्री लवकर झोप येत नाही? सद्गुरू सांगतात झोपेचे १० नियम-गाढ झोप येईल, अलार्मशिवाय उठाल

मॉईश्चर असलेल्या मातीत गुलाबांची वाढ चांगली होईल. मातीत रेती किंवा दगड असेल तर ग्रोथ थांबते. गुलाबाची रोपं छाटू नका हे फुलं न येण्याचे कारण ठरू शकते. सगळ्यात आधी सुकलेले आणि कोमेजलेली फुलं, फांद्या वेगळ्या करा. फुलं न येण्याची कारणं खताची कमतरता असू शकते. 

फुलांच्या झाडांना खत घाला, अनेकदा फुलं व्यवस्थित येत  नाही. यानंतर फुलं येणं बंद होतं. यासाठी फुलांची झाडं अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी जास्त ऊन येत असेल, पाण्याची जास्त काळजी घ्या. मॉईश्चर राहणार नाही याची काळजी घ्या. कुंडीत सतत खत घालू नका, फळांची सालं पाण्यात मिसळा. फुलांना खत घालण्यासाठी संत्र्याची सालं  पाणी घालून स्प्रे तयार करून झाडांवर मारा.  गुलाबाच्या झाडासाठी नैसर्गिक खताचा वापर करा. ज्यामुळे रोपांची वाढ चांगली होईल.

किचनमध्ये उरलेलं भाज्यांचे पाणी, फळांची सालं  तुम्ही मातीत  घालू शकता. यामुळे झाडाला बरीच पोषक तत्व मिळतील. गुलाबाच्या रोपाच्या आजूबाजूला असलेल्या माती नेहमी साफ करत राहा ते झाडाच्या विकासासाठी फार आवश्यक असते. रोपामध्ये उगवलेले तण बाजूला करा.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स