Join us  

कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 9:11 AM

Gardening Tips: कधी कधी झाडांना किती, कसं आणि किती कालावधीने खत घालावं, हे कळतच नाही. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा....(When and how to give fertilizers to plant?)

ठळक मुद्देयोग्य वेळी योग्य प्रमाणात खत घातलं गेलं की झाडांची वाढ अधिक जोमाने होते. पण कधी, किती आणि कसं खत घालावं, हे समजत नाही

आपण रोज व्यवस्थित जेवतो. तरी कधीतरी आहारात काही उणिवा राहून जातात आणि म्हणून मग आपल्याला कधी टॉनिक तर कधी मल्टीव्हिटॅमिन घेण्याची गरज पडते. असंच काहीसं झाडाचं असतं. त्यांना पाणी, ऊन व्यवस्थित मिळालं तरी बऱ्याचदा मातीतून जे पाहिजे ते जास्तीचं पोषण मिळत नाही. त्यामुळे मग त्यांना ठराविक कालावधीने खत घालावं लागतं. योग्य वेळी योग्य प्रमाणात खत घातलं गेलं की झाडांची वाढ अधिक जोमाने होते. पण कधी, किती आणि कसं खत घालावं, हे समजत नाही (When and how to give fertilizers to plant?). म्हणूनच त्यासंबंधीच्या या काही टिप्स एकदा बघून घ्या. झाडांची चांगली वाढ होण्यासाठी निश्चितच फायदा होईल. ( Proper method of fertilizing your home garden)

 

झाडांना किती, कसं आणि कधी खत द्यावं

१. झाडांना किती खत घालावं

वेगवेगळ्या प्रकारची खते बाजारात मिळतात. पण ढोबळमानाने त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर ती नैसर्गिक आणि रासायनिक या दोन प्रकारात मोडली जातात.

स्वयंपाक घरातले कळकट- तेलकट नॅपकीन होतील स्वच्छ, फक्त २ पदार्थ वापरा- नॅपकीन चमकतील नव्यासारखे

रासायनिक खत सहसा अंगणातल्या कुंड्यांमध्ये लहान रोपट्यांना घालणं टाळावं. घालायचंच असेल तर ४ ते ६ महिन्यातून एकदा द्यावं. कोणत्या झाडाला किती खत द्यावं हे त्या खताच्या पाकिटावर लिहिलेलं असतं. पण तरीही जे प्रमाण दिलं असेल त्याच्यापेक्षा कमीत रासायनिक खत घालावं. नैसर्गिक गांडूळ खत घालणार असाल तर दोन महिन्यांतून एकदा द्यावं.

 

२. झाडांना कसं खत घालावं

झाडांना नैसर्गिक किंवा रासायनिक असं कोणत्याही प्रकारचं खत घालताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी.

कोणतीही वस्तू ऑनलाइन खरेदी करताना तपासा ३ गोष्टी, आर्थिक फसवणूक टाळायची तर एवढं लक्षात ठेवाच

ती म्हणजे झाडांच्या मुळांशेजारी कधीही खत घालू नये. कुंडीच्या कडेकडेने खत घालावं. साधारणपण रात्री खत दिलं तर सकाळी त्या झाडाला पाणी घालावं.

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सखते