बटाटे आणि टोमॅटो हे दोन्ही अगदी वेगवेगळे. एक जमिनीच्या वर वाढतो, तर दुसरा जमिनीच्या खाली. मुळात बटाटा हे एक कंद आहे. आता या दोन्ही एकमेकांपासून अतिशय वेगळ्या असणाऱ्या फळभाज्या एकाच झाडाच्या माध्यमातून वाढविण्याचा एक भन्नाट प्रयोग एका तरुणाने केला आहे. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला म्हणजे बटाटे आणि टोमॅटो या दोन्ही फळभाज्या देणाऱ्या एकाच झाडाला त्याने पोमॅटोचं झाड (pomato plant) असं नाव दिलं आहे. त्याने केलेला हा अचाट प्रयोग सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. (Young man grows tomato and potato in one plant)
agrotill या इन्स्टाग्राम पेजवर त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने याविषयीचा प्रयोग सुरुवातीला त्याच्या घराच्या अंगणातच केला असून अगदी लहान स्तरावर त्याने बटाटा आणि टोमॅटो या दोन्ही भाज्यांचं उत्पन्न घेतलं आहे.
grafting तंत्रज्ञान म्हणून हा प्रयोग ओळखला जातो. या प्रयोगात एका झाडाची फांदी दुसऱ्या झाडाला जोडली जाते. त्या तरुणाने हा जो प्रयोग केला आहे, त्यातून जी काही झाडं वाढली आहेत, त्या झाडांच्या वरच्या भागाला टोमॅटो येणार आहेत, तर जमिनीच्या खालच्या भागात बटाट्याची वाढ होणार आहे.
हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी विशेष उपयुक्त आहे, असं त्या तरुणाचं म्हणणं आहे. कारण या प्रयोगामुळे कमी जागेतही शेतकरी बटाटा आणि टोमॅटो ही दोन्ही पिके घेऊ शकतील.
किचन सिंक तुंबून पाणी साचलं? तातडीने २ उपाय करा- सिंक मोकळं होऊन लगेच पाणी वाहून जाईल
त्याने त्याच्या घरात जो प्रयोग केला त्या झाडाने त्याला २ किलो टोमॅटो आणि दिड किलो बटाटे दिले. आता तुमच्याकडे थोडी मोकळी जागा असेल तर अंगणात किंवा गच्चीवरही तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.