Lokmat Sakhi >Health > युरीन इन्फेक्शन, जळजळ, व्हाईट डिस्चार्जचा त्रास? करा १ उपाय- दुखणं अंगावर काढणं धोक्याचं

युरीन इन्फेक्शन, जळजळ, व्हाईट डिस्चार्जचा त्रास? करा १ उपाय- दुखणं अंगावर काढणं धोक्याचं

1 Easy Home Remedy for UTI, White Discharge and Burning Urination : घरच्या घरी करता येईल असा सोपा आयुर्वेदीक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2023 08:50 AM2023-08-08T08:50:12+5:302023-08-08T14:41:13+5:30

1 Easy Home Remedy for UTI, White Discharge and Burning Urination : घरच्या घरी करता येईल असा सोपा आयुर्वेदीक उपाय...

1 Easy Home Remedy for UTI, White Discharge and Burning Urination : Urine infection, inflammation, white discharge? Do 1 simple solution at home, troubles will be gone | युरीन इन्फेक्शन, जळजळ, व्हाईट डिस्चार्जचा त्रास? करा १ उपाय- दुखणं अंगावर काढणं धोक्याचं

युरीन इन्फेक्शन, जळजळ, व्हाईट डिस्चार्जचा त्रास? करा १ उपाय- दुखणं अंगावर काढणं धोक्याचं

युरीन इन्फेक्शन ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. लघवी करताना आग होणे, खालच्या भागाची आग होणे, प्रमाणापेक्षा जास्त व्हाईट डिस्चार्ज होणे या समस्या वारंवार भेडसवताना दिसतात. एकदा या समस्या सुरू झाल्या की आपल्याला काही सुधरत नाही. यामागे विविध कारणे असून त्यांचा शोध घेऊन वेळीच या समस्या दूर करणे आवश्यक असते. अन्यथा त्या गंभीर रुप धारण करण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या उपायांबरोबरच घरच्या घरी आपण एक अतिशय सोपा उपाय करु शकतो. राईस वॉटर म्हणजेच तांदळाच्या पाण्याचा यासाठी अतिशय चांगला फायदा होत असून प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार हे तांदळाचे पाणी कसे करायचे आणि वापरायचे याविषयी माहिती देतात (1 Easy Home Remedy for UTI, White Discharge and Burning Urination). 

तांदूळ शिजवण्यापूर्वी किंवा उकळण्यापूर्वी तांदूळ धुण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्यातून तयार होणारा पांढरा घट्टसर द्रवाला आयुर्वेदात तांदुलोदक म्हणतात. यात भरपूर स्टार्च आहे आणि त्यात विविध महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. तांदळाच्या पाण्याची जादू आयुर्वेदाला प्राचीन काळापासून ज्ञात असून आता तांदळाच्या पाण्याचे आश्चर्यकारक फायदे संपूर्ण जगाने स्वीकारले आहेत.

कसा करायचा उपाय? 

१. १ वाटी तांदूळ घेऊन त्याच्या ६ ते ८ पट पाणी घालून किमान २ ते ६ तास भिजत ठेवायचे. 

२.  त्यानंतर हाताने  साधारण २ ते ३ मिनीटे हा तांदूळ चांगला चोळून घ्यावा.

३.  मग हे पाणी गाळून एका ग्लासमध्ये घ्यायचे आणि प्यायचे. 

४. दिवसभर थोडे थोडे करुन तुम्ही हे पाणी पिऊ शकता. 

५. हे पाणी ६ ते ८ तासांपर्यंत चांगले टिकते. मात्र दररोज नवीन करावे आणि प्यावे.

कोणता तांदूळ वापरावा? 

यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरु शकतो. पण तुकडा असेल तर जास्त चांगला. तसेच लाल तांदूळ, वर्षभर ठेवलेला जुना तांदूळ, पॉलिश न केलेले आणि चांगला कोरडा असलेला तांदूळ यासाठी वापरावा.

फायदे 

१. तांदळाचे पाणी त्वचा आणि केसांसाठी आश्चर्यकारक काम करते परंतु शरीरासाठी त्याचे अनेक उपचारात्मक फायदे देखील आहेत.

२. अंगावरुन पांढरे जाणाऱ्यांसाठी तर हे पाणी आश्चर्यकारक परिणाम देते.


३. तांदूळ हा गुणाने थंड आहे. त्यामुळे लघवीची जळजळ, अतिसार, रक्तस्त्राव विकार, मासिक पाळीचा त्रास, हाताचे आणि पायाचे तळवे यांची जळजळ कमी करण्यास देखील मदत करते.

४. तांदळाच्या पाण्यात अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे त्वचेसाठी आश्चर्यकारक परिणाम होतात. त्यात ‘इनोसिटॉल’ नावाचे संयुग असते जे पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते, वृद्धत्वाची प्रक्रिया विलंब करते आणि रक्त प्रवाह उत्तेजित करते. 

५. तांदळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट, मॉइश्चरायझिंग आणि यूव्ही किरण शोषणारे गुणधर्म देखील असतात जे छिद्रांना घट्ट करतात आणि रंगद्रव्य आणि वाढत्या वयाच्या खुणा प्रतिबंधित करतात.

६. तुम्ही ते एनर्जी ड्रिंक म्हणूनही पिऊ शकता. मात्र थंड असल्याने, ज्यांना आधीच खोकला आणि सर्दी आहे त्यांनी टाळावे.


 

Web Title: 1 Easy Home Remedy for UTI, White Discharge and Burning Urination : Urine infection, inflammation, white discharge? Do 1 simple solution at home, troubles will be gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.