Lokmat Sakhi >Health > पावसाळ्यात सतत नाक चोंदते, झोप लागत नाही - काम सुचत नाही ? करा ३ सोपे उपाय...

पावसाळ्यात सतत नाक चोंदते, झोप लागत नाही - काम सुचत नाही ? करा ३ सोपे उपाय...

Stuffy nose in monsoon? Try these 3 home remedies for sinus infection : पावसाळ्यात वारंवार सर्दी, खोकला, नाक चोंदणे असा त्रास होतो, अशावेळी काय करावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 07:58 PM2023-07-07T19:58:12+5:302023-07-07T20:13:14+5:30

Stuffy nose in monsoon? Try these 3 home remedies for sinus infection : पावसाळ्यात वारंवार सर्दी, खोकला, नाक चोंदणे असा त्रास होतो, अशावेळी काय करावे?

3 Ayurvedic Remedies For Blocked Nose and Congestion In Monsoon Season. | पावसाळ्यात सतत नाक चोंदते, झोप लागत नाही - काम सुचत नाही ? करा ३ सोपे उपाय...

पावसाळ्यात सतत नाक चोंदते, झोप लागत नाही - काम सुचत नाही ? करा ३ सोपे उपाय...

पावसाळा आला की आपल्याला खरा आनंद होतोच. गरमीने जीव हैराण झालेला असतो अशावेळी आपण पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. याचवेळी पावसाळा आल्याने आपल्या छातीत धस्स होते ते येणाऱ्या आजारपणामुळेच. पावसाळा येताना तो आनंद तर घेऊन येतोच परंतु सोबत आजारपणाची भीतीही घेऊन येतो. पावसाळा सुरू झाला, की तापमानात सतत बदल होतात. हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो. पावसाळ्यात जरा जरी पाण्यांत भिजलो तरीही सर्दी, खोकला, डोकेदुखी, नाक चोंदणे असे वरचेवर होतच राहते.

काहीवेळा पावसाळ्यात होणाऱ्या सततच्या आजारपणामुळे हा पावसाळा कितीही अल्हाददायक वाटत असला तरीही नको वाटतो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात जसजसा हवेतील गारवा वाढत जातो तसे आपल्याला स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात आपल्याला बरेचदा सर्दी व सर्दीमुळे नाक बंद होणे ही सर्वसामान्य समस्या जाणवते. काहीवेळा सर्दी, खोकला, फ्लू असे साधे वरचेवर होणारे आजार वाटत असले तरीही ते गंभीर रूप धारण करतात, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. परंतु लगेच डॉक्टरांकडे जाण्यास शक्य झाले नाही तर आपण घरीच काही प्राथमिक उपचार घेऊ शकतो. या प्राथमिक उपचारांमध्ये नेमकं काय करावे ? हे पाहूयात(3 Ayurvedic Remedies For Blocked Nose and Congestion In Monsoon Season). 

पावसाळयात सर्दी व नाक चोंदणे यासारख्या समस्येवर घरगुती उपाय... 

१. लसूण व ओव्याची पुरचुंडी :- सर्वात प्रथम गॅस वर तवा ठेवा आणि थोडा ओवा घ्या. सोबत 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घ्या. आता पॅनमध्ये लसूण पाकळ्या व ओवा ओता. ओवा आणि लसूण दोन्ही खरपूस भाजून घ्या. जेव्हा ओवा भाजू लागेल तेव्हा त्यातून चट चट आवाज येऊ लागेल. ओवा एकदा का नीट भाजला की गॅस बंद करून घ्या. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यावे,  त्यावर सुती कपडा पसरा आणि मग त्यात हे मिश्रण टाकून तो कपडा घट्ट बांधून घ्या. या कापडाची एक छोटी पुरचुंडी तयार करा. आता सर्दी झाली असल्यास ही पुरचुंडी नाकाजवळ नेऊन त्याचा वास घ्यावा तसेच डोकं दुखत असेल तर या गरम पुरचुंडीने डोकंसुद्धा शेकू शकता. यामुळे आपल्याला आराम पडेल. 

५ पैकी फक्त १ गोष्ट रोज करा, दिवसभर राहाल आनंदी-हॅपी हार्मोन्सचं संतुलन...

२. निलगिरीचे तेल :- पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, डोकेदुखीवर निलगिरीचे तेल अतिशय उपयुक्त ठरते. छातीमध्ये साचलेला कफ साफ करण्यासाठी आणि नाक आणि छातीमध्ये जमा झालेले बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी निलगिरीचे तेल हे उपयुक्त ठरते. याशिवाय, दम्यासारख्या श्वासोच्छवासाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी निलगिरीचे तेल देखील एक उत्तम घरगुती उपाय आहे. एका भांड्यात पाणी घेऊन ते उकळी येईपर्यंत गरम करून घ्यावे. उकळी आल्यानंतर त्यात निलगिरीच्या तेलाचे ४ ते ५ थेंब घालावेत. आता डोक्यावर टॉवेल घेऊन संपूर्ण डोकं झाकून या पाण्याची वाफ घ्यावी. डोळे बंद करा आणि नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. सुमारे ५ ते १० मिनिटे असे करा. यामुळे सर्दी व नाक चोंदण्याची समस्या कमी होईल. 

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

३. आले आणि पुदिन्याचा चहा :- आले आणि पुदिना त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. आल्यामध्ये जिंजेरॉल नावाचे संयुग असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, तर पुदिन्याच्या थंडाव्यामुळे नाक बंद होण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळते. सर्वप्रथम आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन तो किसून त्याचा बारीक किस करून घ्यावा. आता एका भांड्यात एक कप पाणी घेऊन ते चांगले उकळवून घ्यावे. त्यानंतर त्यात आल्याचा किस घालून घ्यावा. आता गॅस बंद करून हे आल्याचे पाणी गाळून एका कपात घ्यावे. आता त्यात आपल्या आवडीनुसार पुदिन्याची ३ ते ४ पाने घालावीत. आता हा गरम चहा प्यावा, जेणेकरून आपल्या घश्याला त्याचा शेक मिळेल यामुळे आपल्याला आराम पडेल.

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...

Web Title: 3 Ayurvedic Remedies For Blocked Nose and Congestion In Monsoon Season.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.