Lokmat Sakhi >Health > रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ३ गोष्टी, वजन वाढेल - आजारही छळतील

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ३ गोष्टी, वजन वाढेल - आजारही छळतील

3 Things You Shouldn't Do After a Full Meal निरोगी राहायचंय? तर जेवणानंतर या ३ गोष्टी करणे टाळा, अन्यथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 07:51 PM2023-07-23T19:51:24+5:302023-07-23T20:01:47+5:30

3 Things You Shouldn't Do After a Full Meal निरोगी राहायचंय? तर जेवणानंतर या ३ गोष्टी करणे टाळा, अन्यथा..

3 Things You Shouldn't Do After a Full Meal | रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ३ गोष्टी, वजन वाढेल - आजारही छळतील

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ३ गोष्टी, वजन वाढेल - आजारही छळतील

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सकस व संतुलित आहार घ्यायला अनेकांना जमत नाही. योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका शरीरात वाढतो. उत्तम आहारामध्ये फळे, भाज्या, प्रोटीन्स, कडधान्यांचा समावेश करायला हवा. जेवणाची वेळ देखील निश्चित करायला हवी. यासह रात्रीच्या जेवणाआधी, व जेवण केल्यानंतर काय करावं - काय करणे टाळावे हे देखील माहित असणं गरजेचं आहे.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जेवणानंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कारण, काही चुकांमुळे वजन तर वाढतेच यासह इतर समस्या देखील निर्माण होऊ शकतात. मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा यांनी जेवणानंतर कोणत्या ३ गोष्टी टाळायला हव्यात याबाबतीत माहिती दिली आहे(3 Things You Shouldn't Do After a Full Meal).

गोड पदार्थ खाणे टाळा

अनेकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांचे जेवण पूर्ण होत नाही. मात्र, जेवणानंतर लगेच गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढणे, कफ, खोकला, जडपणा जाणवू शकतो.

वजन कमी करायचं म्हणून आवडता भात बंद? भात कुणी आणि किती खाल्ला तर वजन हमखास कमी होते

जेवणानंतर आईस्क्रीम खाणे

गोड पदार्थांप्रमाणेच लोकं डिनरनंतर आईस्क्रीम खातात. मात्र, जेवणानंतर लगेच आईस्क्रीम खाणे हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदात गरम अन्नानंतर थंड अन्न खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. याला विरुद्ध आहार म्हणतात.

जेवणानंतर व्यायाम करणे

फिट राहण्यासाठी व्यायाम व डाएट खूप गरजेचं आहे, यामुळे आरोग्य सुधारते, व वजन देखील नियंत्रणात राहते. पण जेवणानंतर लगेच जिम किंवा व्यायाम करू नका. त्यामुळे उलट्या, पोटदुखी, अपचन होऊ शकते.

जवसाचे तेल आहारात रोज असले तर बॅड कोलेस्टेरॉल कमी होते, हे किती खरे?

जेवणानंतर करा शतपावली

तज्ज्ञांच्या मते, ''जेवणानंतर शतपावली करावी. जेवणानंतर किमान १०० पावले चालावी. यामुळे अन्न पचण्यास आणि रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते.''

Web Title: 3 Things You Shouldn't Do After a Full Meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.