Lokmat Sakhi >Health > दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल

दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल

4 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth - Rajgira : दुधापेक्षा हाडांना जास्त कॅल्शियम देणार 'हे' छोटे दाणे; दूध - दही; पालेभाज्या आवडत नसतील तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 04:27 PM2024-09-23T16:27:23+5:302024-09-23T16:30:46+5:30

4 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth - Rajgira : दुधापेक्षा हाडांना जास्त कॅल्शियम देणार 'हे' छोटे दाणे; दूध - दही; पालेभाज्या आवडत नसतील तर..

4 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth - Rajgira | दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल

दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल

प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वांप्रमाणेच कॅल्शियम (Calcium) हे शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहे. हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आणि मजबुतीसाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खायला हवे (Rajgira). याशिवाय मसल्स गेनसाठीही मदत होते. पण शरीरात होणाऱ्या कॅल्शियमच्या तोट्यामुळे बरेच नुकसान होते. त्याच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात.

दात किडणे, मुंग्या येणे, सुन्न होणे यासह हाडंही ठिसूळ होतात. कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत दुग्धजन्य पदार्थाला मनाले जाते. पण काही जण दुग्धजन्य पदार्थ खाताना नाकं मुरडतात(4 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth - Rajgira).

बाप म्हणून मला अपराधी वाटतंच, फरहान अख्तर सांगतो आईबाबा वेगळे होतात पण मुलं मात्र..

जर आपल्याला दुग्धजन्य पदार्थ आवडत नसतील तर, आहारतज्ज्ञ यांनी सांगितल्याप्रमाणे राजगिरा खायला सुरुवात करा. यासंदर्भात ते म्हणतात, ' दूध आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये अधिक कॅल्शियम असते. पण आपण राजगिरा खाऊनही कॅल्शियम मिळवू शकता.'

दररोज किती कॅल्शियम आवश्यक आहे?

एका व्यक्तीला दररोज किमान १००० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना कॅल्शियमची जास्त गरज असते.

राजगिरा हा कॅल्शियमचा खजिना

राजगिरा हा अतिशय पौष्टीक पदार्थ आहे. ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त त्यात मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी आवश्यक तत्वही असतात. फक्त लाडू नसून, आपण राजगिऱ्याचे अनेक पदार्थ करून खाऊ शकता.

राजगिऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती असते?

USDA नुसार, १०० ग्रॅम राजगिरामध्ये ४७ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. या व्यतिरिक्त, त्यात लोह, मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर आहे. ज्याचा फायदा संपूर्ण आरोग्याला होतो.

मुलांच्या शाळेत पेरेण्ट्स मिटिंगमध्ये वर्गशिक्षकांना विचारा ४ प्रश्न, तरच कळेल मुलांची प्रगती..

कॅल्शियमचे इतर स्त्रोत

कॅल्शियमसाठी आपण दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. याव्यतिरिक्त पालक, पालेभाज्या, हरभरे, सोयाबीन, बदाम, शेंगदाणे यासह इतर पौष्टीक पदार्थ खाऊ शकता. 

Web Title: 4 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth - Rajgira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.