Lokmat Sakhi >Health > रोजच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर करण्याचे ४ फायदे, पोषण उत्तम, तब्येत छान

रोजच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर करण्याचे ४ फायदे, पोषण उत्तम, तब्येत छान

Home Remedy Coconut Oil खोबरेल तेलात आहे अनेक गुणधर्म, जो केसांसह शरीरासाठीही आहे उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 06:00 PM2022-10-30T18:00:24+5:302022-10-30T18:01:18+5:30

Home Remedy Coconut Oil खोबरेल तेलात आहे अनेक गुणधर्म, जो केसांसह शरीरासाठीही आहे उपयुक्त

4 benefits of using coconut oil in daily food, good nutrition, good health | रोजच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर करण्याचे ४ फायदे, पोषण उत्तम, तब्येत छान

रोजच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर करण्याचे ४ फायदे, पोषण उत्तम, तब्येत छान

केसांच्या वाढीसाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. त्यात खोबरेल तेल महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कारण खोबरेल तेलात अनेक गुणधर्म आहेत, जे केसांवरील समस्या सोडवण्यासाठी मदत करतात. खोबरेल तेल अनेक कारणांसाठी वापरण्यात येतो. हे तेल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे तेल सेवन केल्याने आपल्याला अनेक आजारांचा सामना करण्यास मदत करते. रक्त पुरवठा, अतिरिक्त चरबी, विविध संसर्गाशी लढणे यांच्यावर रामबाण उपाय हा खोबरेल तेल ठरला आहे. चला तर मग, या तेलाचे थोडक्यात महत्त्व जाणून घेऊयात.

उपचारासाठी फायदेशीर

इतर संतृप्त चरबीपेक्षा, नारळ तेल हे एक निरोगी तेल आहे, जो शरीरासाठी उपयुक्त ठरणारे चांगले गुणधर्म देतो. जे आतील शरीरात असलेल्या आजारांना उपचारांसाठी समर्थन देतो. खोबरेल तेलामध्ये 80% पेक्षा अधिक संतृप्त चरबी असते.

फॅट बर्निंगला प्रोत्साहन देते

या तेलात अनेक उत्तम गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरासाठी आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकतात. शरीरातील जळजळ कमी करणे, थायरॉईड/मेटाबॉलिज्म कमी करणे अश्या विविध उपायांसाठी मदत करते. या तेलात असलेल्या एंटीमाइक्रोबियल आणि एंटीऑक्सीडेंट गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यास मदत करते.

संसर्गाशी लढण्यास मदत

नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड असते आणि शरीर लॉरिक ऍसिडचे मोनोलॉरिनमध्ये रूपांतर करते, ज्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि ते बॅक्टेरियाशी लढण्यास उत्कृष्ट असतात.

कोलेस्टेरॉल कमी करते

दररोज नारळाच्या तेलाचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलचे प्रेग्नेनोलोन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये रूपांतर होऊन त्याचे प्रमाण सामान्य पातळीवर येऊ शकते. त्यामुळे हे तेल नियमित जेवणामध्ये वापर केल्यास शरीरासाठी उत्तम ठरेल.

Web Title: 4 benefits of using coconut oil in daily food, good nutrition, good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.