Lokmat Sakhi >Health > बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे स्वयंपाकघरातले ४ जिन्नस, स्वस्तात मस्त नैसर्गिक उपाय

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे स्वयंपाकघरातले ४ जिन्नस, स्वस्तात मस्त नैसर्गिक उपाय

4 Good Foods and Ayurvedic Remedies to Reduce Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कसं कमी करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो, त्याचंच हे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2023 07:05 PM2023-08-07T19:05:25+5:302023-08-07T19:06:48+5:30

4 Good Foods and Ayurvedic Remedies to Reduce Cholesterol बॅड कोलेस्टेरॉल कसं कमी करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो, त्याचंच हे उत्तर

4 Good Foods and Ayurvedic Remedies to Reduce Cholesterol | बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे स्वयंपाकघरातले ४ जिन्नस, स्वस्तात मस्त नैसर्गिक उपाय

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे स्वयंपाकघरातले ४ जिन्नस, स्वस्तात मस्त नैसर्गिक उपाय

कोलेस्टेरॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. जे शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि एचडीएलला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन असे म्हणतात. एलडीएलला म्हणजेच बॅड कोलेस्टेरोल नसांमध्ये जाऊन जमा होते. बॅड कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी एचडीएल मदत करते.

खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, यासह इतर अवयवांचे देखील नुकसान होते. बॅड कोलेस्टेरोल कमी करायचं असेल तर, आयुर्वेदिक उपायांचा वापर करून पाहा. नोएडा स्थित कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे संचालक डॉ कपिल त्यागी सांगतात, 'बॅड कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. यासह आपण आयुर्वेदिक पदार्थांचा देखील आहारात समावेश करू शकता. यामुळे नैसर्गिकरीत्या बॅड कोलेस्टेरोल कमी होऊ शकते''(4 Good Foods and Ayurvedic Remedies to Reduce Cholesterol).

मेथी दाणे

बॅड कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा आहारात समावेश करा. यामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, फायबर, जीवनसत्त्वे A, C, K आणि B6 असते. जे आरोग्याच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते. मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करतात. यासाठी रात्री पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवा, व सकाळी याचे पाणी प्या.

अश्वगंधा

अश्वगंधाचे आहारात समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल, एलडीएल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होते. अश्वगंधा तणाव कमी करण्यास आणि शरीरातील रक्तवाहिन्या संतुलित करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा, त्यात अश्वगंधा पावडर घालून मिक्स करा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व हे दूध प्या.

बिपाशा बसूच्या लेकीला असलेला हृदयाचा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो, टाळायचा कसा?

लसूण

आयुर्वेदात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. लसणामध्ये अॅलिसिन नावाचे संयुग असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासाठी लसणाच्या ३-४ पाकळ्या घ्या, त्याला सोलून चिरून घ्या. कोमट पाण्यासोबत लसूण कच्चे खा. असे केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

रोज सकाळी उपाशी पोटी खा खोबऱ्याचे २ तुकडे, उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर - वजनही होईल कमी

आवळा

आयुर्वेदानुसार आवळा खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक आढळतात. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. यासाठी मिक्सरमध्ये आवळा बारीक करून त्याचा रस काढा, गरम पाण्यात आवळ्याचा रस मिक्स करा. उपाशी पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.

Web Title: 4 Good Foods and Ayurvedic Remedies to Reduce Cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.