आपल्या शरीरात किडनी हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे (Kidney Stones). शरीरात असलेल्या अनावश्यक गोष्टी बाहेर फेकण्यास किडनी मदत करते (Kidney Health). किडनी निरोगी असल्यास अनेक आजारांवर मात करता येऊ शकते (Health Tips). किडनीचे आजारही अनेकदा जीवघेणे ठरु शकतात. मुतखड्याचा त्रास आजकाल अनेकांना छळतो. अगदी तरुण वयातही मूतखड्यानं असह्य वेदना सहन करणारे आहेतच. किडनीचे आजार टाळायचे तर काही गोष्टी नियमित करायला हव्या.
योगगुरू बाबा रामदेवही यासंदर्भात वारंवार माहिती देतात. ते योगाभ्यासाचं महत्त्व तर सांगतातच पण जीवनशैलीतले बदलतही सुचवतात ज्यामुळे मुत्राशयांना अपाय होणं टळेल(4 Home Remedies for Kidney Stones).
भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..
काय नियमित करायला हवं?
भरपूर पाणी प्या
किडनीचे आरोग्य राखण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी विषारी पदार्थ फिल्टर करते आणि शरीर हायड्रेट ठेवते. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
धुम्रपान टाळा
धुम्रपान केल्यानं किडनीचं आरोग्य बिघडते. शिवाय किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. यासह हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही वाईट परिणाम होतात. कालांतराने किडनी खराब होऊ शकते.
वजन ठेवा आटोक्यात
वजन आटोक्यात ठेवणं आवश्यक. यामुळे किडनीसह हृदय निरोगी राहण्यासही मदत होते. वाढलेलं वजन अनेक समस्यांचं कारण ठरतं.
व्यायाम आवश्यक
ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल
धावणे, पोहणे, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, योगा, पायलेट्स आणि स्ट्रेचिंग रोज करणं एकूण शरीरासह किडनीचंही आरोग्य ठणठणीत ठेवतं.