भूक ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला झोपू देत नाही (Hungriness). भूक लागली की आपल्याला दुसरं काहीचं सुचत नाही. काही वेळेला सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. तर, काही वेळेस आपण तासंतास उपाशी राहतो. हिवाळ्यात भूक खूप जास्त लागते. अनेकदा आपण पाहिलं असेल की, पोटभर जेवण केल्यानंतरही भूक लागते. पण असे का होते? जेवण केल्यानंतरही भूक का लागते? याचा आपण कधी विचार केला आहे का?
जेवल्यानंतरही भूक लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम तर होतेच, शिवाय वजन वाढण्यासही (Weight Gain) कारणीभूत ठरते. जर आपल्याला सतत काही ना काही खाण्याची इच्छा होत असेल, तर खाण्याच्या इच्छामागे ४ कारणे असू शकतात(4 Reasons Why You're Always Hungry).
स्ट्रेस
द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, अधिक काळ स्ट्रेसमध्ये राहिल्याने आपल्याला सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. स्ट्रेस वाढल्याने शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन्सचे प्रमाण वाढते. तणावामुळे आपल्या शरीरातील एनर्जी लेव्हल कमी होते. ही एनर्जी भरून काढण्यासाठी कॉर्टिसॉल हार्मोन्स आपल्याला खाण्यास प्रवृत्त करतात. जर कॉर्टिसॉलची पातळी वाढली तर, आपल्याला सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते.
मिठात भेसळ आहे हे कसे ओळखाल? बाबा रामदेव सांगतात १ सोपी ट्रिक
थकवा
जेव्हा आपल्या शरीराला पुरेशी झोप किंवा आराम मिळत नाही, तेव्हा शरीरातील घ्रेलिन हार्मोन (खाण्यास प्रवृत्त करणारा हार्मोन) ची पातळी वाढते. शिवाय लेप्टिनची पातळी कमी होते. लेप्टिनमुळे आपली उलट-सुलट खाण्याची इच्छा कमी होते. हे दोन्ही हार्मोन्स भुकेच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. जर या चक्रात काही बिघाड झाले तर, आपल्याला सतत खाण्याची इच्छा होते.
एंग्जायटी
एंग्जायटी म्हणजेच चिंतेमुळेही आपल्याला सतत खाण्याची इच्छा होते. जर आपण कोणत्याही गोष्टीची काळजी किंवा चिंतेत असाल तर, अशावेळी काही जण स्ट्रेस इटिंग करतात. नैराश्य आणि मूड डिसऑर्डरमुळे आपण भावनेच्या भरात भरपूर खातो. शिवाय काय आणि किती प्रमाणात खात आहोत, याची आपल्याला कल्पनाही नसते.
पपई खाल्ल्याने खरंच मासिक पाळी लवकर येते? काय खरं-काय खोटं? तज्ज्ञ सांगतात पपई कधी आणि कशी खावी?
पर्याय शोधणे
बऱ्याचदा आपल्याला घरातील अन्न आवडत नाही, किंवा दुसरं काही तरी चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण बाहेरून ऑर्डर करतो, किंवा अॅप्सवर सर्च करतो. स्क्रोल करताना खाद्यपदार्थांच्या जाहिराती किंवा फोटो पाहूनही आपल्याला भूक लागते. त्यामुळे भूक नसतानाही आपण एक्स्ट्रा खातो.