Lokmat Sakhi >Health > बेकिंग सोड्याचे ५ फायदे, खराब पोट ते तोंडाची दुर्गंधी यावर उत्तम उपाय

बेकिंग सोड्याचे ५ फायदे, खराब पोट ते तोंडाची दुर्गंधी यावर उत्तम उपाय

Baking Soda Tips and Tricks खराब पोट, तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात, स्वयंपाकघरात आढळून येणाऱ्या बेकिंग सोडाचा करा असा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 03:34 PM2022-10-25T15:34:10+5:302022-10-25T15:35:41+5:30

Baking Soda Tips and Tricks खराब पोट, तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात, स्वयंपाकघरात आढळून येणाऱ्या बेकिंग सोडाचा करा असा वापर

5 Benefits of Baking Soda, Best Remedy for Bad Stomach to Bad Breath | बेकिंग सोड्याचे ५ फायदे, खराब पोट ते तोंडाची दुर्गंधी यावर उत्तम उपाय

बेकिंग सोड्याचे ५ फायदे, खराब पोट ते तोंडाची दुर्गंधी यावर उत्तम उपाय

बेकिंग सोडा हा एक असा पदार्थ आहे, जो तुम्ही विविध कामांसाठी वापरू शकता. बेकिंगसाठी तर वापरलाच जातो. परंतु, यासह जेवणात वापरण्यासाठी देखील त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक पदार्थांमध्ये सोडा वापरला जातो. किचनमधील अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. शरीराच्या निगडित देखील आपण बेकिंग सोडाचा वापर करू शकतो. सर्वांच्या स्वयंपाकघरात आढळून येणारा या सोड्याच्या निगडित आज आपण अनेक ट्रिक्स जाणून घेणार आहोत. त्वचेची काळजी घेण्यापासून ते पोट खराब होण्यापर्यंतच्या अनेक समस्यांवर ही पावडर किफायतशीर आणि प्रभावी उपाय आहे. चला तर मग या बेकिंग सोडाची जादू पाहुयात.

दात साफ करणे

हसल्यावर दात मोत्यासारखे चमकावेत अशी सर्वांची इच्छा असते. दात मोत्यासारखे चमकदार दिसण्यासाठी सर्वप्रथम पेपरमिंट ऑइल आणि हायड्रोजन पेरोक्साईडमध्ये बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा आणि दात घासून घ्या. यामुळे तुम्हाला पांढरे चमकदार दात मिळण्यास मदत होईल.

तोंडाची दुर्गंधी

तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे अनेकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत 2 चमचे बेकिंग सोडा लिंबाच्या रसात मिसळा आणि त्यात अर्धा कप पाणी घाला. या मिश्रणाने तोंड स्वच्छ धुवा. तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी होईल.

तेलकट त्वचा
तेलकट त्वचेमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे मुरूम देखील तयार होतात. अशावेळी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. तुम्हाला फक्त एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि त्यात थोडे पाणी घालायचे आहे. आता पेस्ट पिंपल्सवर लावा. पेस्ट 15 मिनिटे ठेवा, त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

खराब पोट

अन्न खाल्ल्यानंतर जर तुमच्या पोटाला आराम मिळत नसेल आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर याचा अर्थ अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. अशा परिस्थितीत एक कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे लवकर आराम मिळेल. 

कीटक चावल्याने पुरळ येणे

जर तुम्हाला एखादा कीटक चावला असेल तर बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावी भागावर लावा. कीटकांनी चावल्यानंतर होणारी खाज किंवा पुरळ यापासून मुक्त होण्यास हे मदत करेल.

Web Title: 5 Benefits of Baking Soda, Best Remedy for Bad Stomach to Bad Breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.