Lokmat Sakhi >Health > १०० पाऊले चालली तरी दम लागतो? श्वास फुलतो, पाय दुखतात? खा ५ पदार्थ- वाढेल झटपट एनर्जी

१०० पाऊले चालली तरी दम लागतो? श्वास फुलतो, पाय दुखतात? खा ५ पदार्थ- वाढेल झटपट एनर्जी

5 Foods That Can Naturally Boost Your Stamina : ऐन तारुण्यात अनेकांना चालवत नाही, पळण्याचीच तर गोष्टच लांब, आहार बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2023 03:48 PM2023-12-06T15:48:24+5:302023-12-06T15:49:19+5:30

5 Foods That Can Naturally Boost Your Stamina : ऐन तारुण्यात अनेकांना चालवत नाही, पळण्याचीच तर गोष्टच लांब, आहार बदला

5 Foods That Can Naturally Boost Your Stamina | १०० पाऊले चालली तरी दम लागतो? श्वास फुलतो, पाय दुखतात? खा ५ पदार्थ- वाढेल झटपट एनर्जी

१०० पाऊले चालली तरी दम लागतो? श्वास फुलतो, पाय दुखतात? खा ५ पदार्थ- वाढेल झटपट एनर्जी

बऱ्याचदा चार पायऱ्या किंवा टिचभर जागेवर धावलं की दम लागतो, श्वास फुलतो. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर, नक्कीच आपल्या शरीरात स्टॅमिनाची (Stamina) कमतरता असू शकते. खरंतर स्टॅमिना ही आपल्या शरीरातील उर्जा असते. जी शारीरिक आणि मानसिकरित्या शरीराला मजबूत करते.

सध्या लोकांची जीवनशैली बिघडत चालली आहे. शिवाय काही लोकं डेस्कवर तासंतास बसून काम करतात. सकस आहाराचे सेवन न करणे, व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात गंभीर आजारांचा शिरकाव होतो. विशेष म्हणजे स्टॅमिना कमी होतो. अशा स्थितीत काही वेळ काम केल्यानेही शरीर थकते. जर आपल्यालाही स्टॅमिना वाढवायचा असेल तर, आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे(5 Foods That Can Naturally Boost Your Stamina).

सुकामेवा

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आपला स्टॅमिना वाढू शकतो. नट्समध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात. शिवाय त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचे प्रमाणही अधिक असते. ज्यामुळे स्टॅमिना तर वाढतेच शिवाय ब्लड सर्क्युलेशन देखील सुधारते.

बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?

ब्राऊन राईस

व्हाईट राईसच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये स्टार्च कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. एक वाटी ब्राऊन राईस खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय त्यात कार्बोहायड्रेट असते. ज्यामुळे मसल्स मजबूत आणि स्टॅमिना वाढते.

केळी

केळ्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शारीरिक उर्जा तर वाढतेच. शिवाय स्टॅमिना वाढण्यास देखील मदत करते.

पालेभाज्या

स्टॅमिना वाढवण्यासह निरोगी आरोग्यासाठी आहारात पालेभज्यांचं सेवन करणं गरजेचं आहे. पालेभाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन यासह इतर पौष्टीक घटक असतात. शिवाय त्यात आयर्नचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे कमजोरी दूर होते. शिव्या स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. नियमित पालेभाज्या खाल्ल्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

अस्ताव्यस्त सुटलेलं बेढब पोट उपाशी राहून पोट कमी होणार नाही, चरबी घटवण्यासाठी खा ४ पदार्थ

सफरचंद

सफरचंद आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे आपल्याला फ्रेश उत्साही वाटते.

Web Title: 5 Foods That Can Naturally Boost Your Stamina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.