Lokmat Sakhi >Health > बॅड कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक झाल्या? रोज खा ५ पदार्थ, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

बॅड कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक झाल्या? रोज खा ५ पदार्थ, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

5 foods that fight high cholesterol : खराब कोलेस्ट्रॉल नैसर्गिक पद्धतीने कमी करण्याचे ५ सर्वोत्तम उपाय, नियमित खा-तब्येत सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2023 05:23 PM2023-10-29T17:23:39+5:302023-10-29T17:24:22+5:30

5 foods that fight high cholesterol : खराब कोलेस्ट्रॉल नैसर्गिक पद्धतीने कमी करण्याचे ५ सर्वोत्तम उपाय, नियमित खा-तब्येत सांभाळा

5 foods that fight high cholesterol | बॅड कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक झाल्या? रोज खा ५ पदार्थ, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

बॅड कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक झाल्या? रोज खा ५ पदार्थ, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

धकाधकीच्या जीवनात खाण्यापिण्याच्या सवयी खराब होताताच. ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, हृदयरोगाच्या निगडीत समस्या वाढतात. मुख्य म्हणजे नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये व्यत्यय येते. नसा ब्लॉक होतात.

अशावेळी हाय बीपी, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज अशा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जर आपल्याला नैसर्गिकरित्या बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करायचं असेल तर, पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी सांगितलेल्या ५ पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होईलच, शिवाय इतर आजारांचा धोकाही टळेल(5 foods that fight high cholesterol).

अळशीच्या बिया

अळशीच्या बिया हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. यातील पौष्टीक गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असते. जे फक्त हृदयासाठी उत्तम नसून, शरीरातील इतर गंभीर आजारांसाठी फायदेशीर ठरते. आपण अळशीच्या बिया भाजून, पदार्थात मिक्स करून किंवा पावडर तयार करून खाऊ शकता. अळशीच्या बियांची पावडर सकाळी कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते.

शिळी चपाती फेकू नका, थंड दुधासोबत कुस्कुरून खा, वजन होईल कमी, ब्लड शुगरही राहील नियंत्रणात

ओट्स

ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होतेच, शिवाय वजनही कमी करण्यास प्रभावी ठरते. ओट्समधील पौष्टीक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

लिंबू

लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सीयुक्त लिंबू रक्तवाहिन्या स्वच्छ करतात. याशिवाय लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेले चयापचय एंझाइम उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. आपण लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळांव्यतिरिक्त द्राक्षे आणि आवळा यांचाही आहारात समावेश करू शकता.

वाढत्या वजनापुढे हतबल आहात? रात्री झोपताना कोमट पाण्यात ‘हा’ चिमूटभर पदार्थ घालून प्या, फॅट्स होतील गायब

 

मेथी

मेथी दाणे किंवा मेथीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मेथी रक्तातील ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यात गॅलेक्टोमनन, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे इतर अनेक गुणधर्म आहेत. ज्यामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होते.

सुकामेवा

जर आपण हाय कोलेस्टेरॉलपासून त्रस्त असाल तर, आहारात सुकामेव्यांचा समावेश करा. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. 

Web Title: 5 foods that fight high cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.