Lokmat Sakhi >Health > पावसाळ्यात त्वचेला होणारे फंगल इन्फेक्शन कसे टाळायचे? ५ उपाय- गंभीर त्वचारोगांचा धोका टाळा...

पावसाळ्यात त्वचेला होणारे फंगल इन्फेक्शन कसे टाळायचे? ५ उपाय- गंभीर त्वचारोगांचा धोका टाळा...

How To Prevent Fungal Infections During Monsoon Season ? : पावसाळ्यात त्वचेला विविध इन्फेक्शन होतात, त्याकडे लक्ष दिले नाही तर ते वाढते, त्वचारोग लवकर बरे होणेही अवघड-काळजी घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 08:34 AM2023-07-12T08:34:34+5:302023-07-12T08:51:55+5:30

How To Prevent Fungal Infections During Monsoon Season ? : पावसाळ्यात त्वचेला विविध इन्फेक्शन होतात, त्याकडे लक्ष दिले नाही तर ते वाढते, त्वचारोग लवकर बरे होणेही अवघड-काळजी घ्या.

5 Quick Ways To Avoid Fungal Infections This Monsoon With These Hygiene Tips. | पावसाळ्यात त्वचेला होणारे फंगल इन्फेक्शन कसे टाळायचे? ५ उपाय- गंभीर त्वचारोगांचा धोका टाळा...

पावसाळ्यात त्वचेला होणारे फंगल इन्फेक्शन कसे टाळायचे? ५ उपाय- गंभीर त्वचारोगांचा धोका टाळा...

उन्हाळ्यांत असणाऱ्या गरम तापमानामुळे आपल्या जीवाची काहिली होते. हा उन्हाळा कधी एकदा जाऊन पावसाळा सुरु होतो याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहात असतो. पावसाळा हा ऋतू तसा सगळ्यांच्या आवडीचा ऋतू आहे. पावसाळा येताना आपल्याबरोबर आनंद तर घेऊन येतोच पण सोबतच आजारपण देखील घेऊन येतो. पावसाळा हा ऋतू आपल्याला कितीही प्रिय असला तरीही त्याच्यासोबत येणारं आजारपण नको वाटत. येणाऱ्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार व संसर्गजन्य रोग होणं ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. यासोबतच पावसाळ्यात त्वचेवर येणाऱ्या फंगल इंफेक्शनची (Fungal Infection) समस्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना होते. पावसाळ्यात ओल्या आणि दमट वातावरणामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो. 

पावसाच्या घाणेरड्या पाण्यामुळे कधीकधी फंगल इंफेक्शनची (Fungal Infection) समस्या उद्भवते. यामध्ये त्वचेवर खाज येणे, त्वचा लाल होणे, लहान पुरळ येणे, हाता - पायांवर चट्टे उठणे अशा अनेक प्रकारे फंगल इंफेक्शन होऊ शकते. फंगल इनफेक्शन तेव्हाच होते जेव्हा बाहेरील बुरशी आपल्या शरीरातील काही खास भागांवर येऊन वाढते. असे झाले आणि त्यातही आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, तर आपले शरीर या फंगसला प्रतिकार करू शकत नाही. तसेच याचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. फंगस किंवा  बुरशी वातावरणातील हवा, पाणी, माती, वृक्षवेलींवर वाढत असते. परंतु यातील काही प्रकार हे माणसाच्या शरीरावर पोसले जातात. इतर जीवजंतूप्रमाणेच ते आपल्या आरोग्यासाठी हितकारक नसतात. म्हणूनच अशा फंगल इंफेक्शनवर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय(5 Quick Ways To Avoid Fungal Infections This Monsoon With These Hygiene Tips).

पावसाळयात होणाऱ्या फंगल इंफेक्शनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरगुती उपाय... 

१. आरामदायक कपडे घाला :- पावसाळयात शक्यतो आरामदायक कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे. पावसाळ्यात सुती किंवा लिननचे कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे. जरी आपण पावसाळ्यात भिजलो तरी या फॅब्रिक्सचे कपडे लगेच वाळण्यास मदत होते. त्याचबरोबर अंगाला फिट बसतील असे कपडे घालणं  टाळावे. पावसाळ्यात जर आपण अंगाला फिट बसणारे कपडे घातले तर असे कपडे पावसात भिजून आपल्या शरीराला चिकटून बसतात यामुळे त्वचा सतत ओली राहून अंगावर फंगल इंफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात फंगल इंफेक्शन पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लूज व मोकळे - ढाकळे कपडे घालावेत. 

पावसाळ्यात मॉर्निंग वॉकला जाता येतं नाही? ६ सोपे उपाय, घरातच राहून वजन होईल कमी...

२. पर्सनल हाइजीनची घ्या काळजी :- पावसाळ्यात फंगल इंफेक्शन होऊ नये म्हणून पर्सनल हाइजीनची काळजी घेतलीच पाहिजे. पावसात भिजून आल्यानंतर आपले हात - पाय, संपूर्ण शरीर अँटी फंगल साबणाने अवश्य धुवा. पावसात भिजल्यानंतर आपल्या त्वचेप्रमाणेच नखांची देखील तितकीच काळजी घ्यावी. पावसाळ्यात शकयतो नखं वाढवू नका लहानच ठेवा जेणेकरून त्यात पाणी जाऊन फंगल इंफेक्शन होणार नाही. पावसाळ्यात काही खाण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. 

पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.. पाय सांभाळा..

३. त्वचा कायम कोरडी ठेवा :- जास्त ओलाव्यामुळे त्वचेवर बुरशीची वाढ होऊ शकते. जेव्हा आपण पावसात भिजून येतो त्यानंतर आपली संपूर्ण त्वचा पुसून कोरडी करावी. बुरशीचा धोका हाताखाली, पायांच्या जांघांमध्ये, स्तन आणि पायांची बोटे यांच्यामध्ये जास्त असतो, म्हणून हे भाग चांगले पुसून कोरडे करावेत. 

पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

४. हायड्रेटेड रहा :- पावसाळ्यात वारंवार तहान लागत नसली तरीही पुरेसे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा. पुरेसे पाणी प्यायल्याने आपली त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे ते बुरशीजन्य संसर्गास अधिक प्रतिरोधक बनते.

पावसाळ्यात घरभर माश्या-लाइटभोवतीचे किडे फिरतात? करा ४ घरगुती उपाय- किटकांचा त्रास कमी...

५. अँटीफंगल पावडर वापरा :-  त्वचा कोरडी ठेवण्यासाठी आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी आपण अँटीफंगल पावडर वापरू शकता. विशेषतः ज्या भागात जास्त घाम येतो त्या भागात अँटीफंगल पावडर दिवसातून किमान २ वेळा तरी लावावी. तसेच त्वचेवर ज्या भागात अधिक घाम येतो तो भाग सतत पुसून कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा.

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

Web Title: 5 Quick Ways To Avoid Fungal Infections This Monsoon With These Hygiene Tips.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.