Lokmat Sakhi >Health > तुमच्या शरीराला कोणत्या पौष्टिक घटकांची गरज आहे, हे कसं ओळखायचं? घ्या ५ टिप्स- राहा फिट 

तुमच्या शरीराला कोणत्या पौष्टिक घटकांची गरज आहे, हे कसं ओळखायचं? घ्या ५ टिप्स- राहा फिट 

5 Signs That Shows Your Body Needs More Nutrients: तुम्ही कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे, तुमच्या शरीरात नेमक्या कोणत्या पौष्टिक घटकांची कमतरता आहे, हे ओळखण्यासाठी ५ टिप्स...(how to identify the deficiency of nutrients in your body?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 09:06 AM2024-10-12T09:06:52+5:302024-10-12T09:10:01+5:30

5 Signs That Shows Your Body Needs More Nutrients: तुम्ही कोणता पदार्थ खाल्ला पाहिजे, तुमच्या शरीरात नेमक्या कोणत्या पौष्टिक घटकांची कमतरता आहे, हे ओळखण्यासाठी ५ टिप्स...(how to identify the deficiency of nutrients in your body?)

5 Signs that shows Your Body Needs More Nutrients, how to identify the deficiency of nutrients in your body | तुमच्या शरीराला कोणत्या पौष्टिक घटकांची गरज आहे, हे कसं ओळखायचं? घ्या ५ टिप्स- राहा फिट 

तुमच्या शरीराला कोणत्या पौष्टिक घटकांची गरज आहे, हे कसं ओळखायचं? घ्या ५ टिप्स- राहा फिट 

Highlightsतुमच्या शरीरात कोणत्या पौष्टिक घटकांची कमतरता आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याविषयीची ही माहिती...

आपल्या शरीरात एखाद्या अन्नपदार्थाची कमतरता असेल तर आपले शरीर त्याबाबत सूचना देत असते. पण आपल्याला त्याबद्दलची कोणतीही माहिती नसल्याने आपल्याला ते ओळखता येत नाही. म्हणूनच कळत- नकळतपणे शरीर देत असलेल्या सूचनांकडे आपले दुर्लक्ष होते. यामुळे मग एखादा आजार गंभीर स्वरूपात आपल्यासमोर येतो आणि मग शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी जास्त वेळ लागतो (5 Signs That Shows Your Body Needs More Nutrients). म्हणूनच तुमच्या शरीरात कोणत्या पौष्टिक घटकांची कमतरता आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याविषयीची ही माहिती...(how to identify the deficiency of nutrients in your body?)

 

तुमच्या शरीरात कोणत्या पौष्टिक घटकांची कमतरता आहे?

आपल्या शरीरात कोणत्या पदार्थांची कमतरता आहे आणि ती कशी भरून काढावी, याविषयीची माहिती डॉक्टरांनी doctor.sethi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

कुंडीतल्या रोपांना घाला ४ प्रकारचं पाणी, सुकलेली रोपेही होतील टवटवीत आणि बहरतील फुलांनी

१. जर तुमची नखे खूप ठिसूळ असतील तर तुमच्या शरीरात लोह, कॅल्शियम आणि प्रोटीन्स या पदार्थांची कमतरता आहे. 

२. जर तुमचे केस अकाली पांढरे होत असतील तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमतरता आहे. 

 

३. शरीरावर झालेल्या जखमा चटकन भरून निघत नसतील किंवा त्यांचे काळपट डाग शरीरावर अधिक काळ तसेच राहत असतील तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात आहे, हे ओळखा..

बाळासाठी महागडी फूड पावडर कशाला हवी? ‘हा' घरगुती पौष्टिक पदार्थ खाऊ घाला- बघा रेसिपी

४. जर तुमच्या डोळ्यांखाली सूज आल्यासारखी वाटत असेल आणि डोळ्यांच्या वरच्या पापण्या खाली पडल्यासारख्या होत असतील तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियम कमी प्रमाणात आहे.

५. बसता- उठता गुडघ्यांमधून करकर आवाज येत असेल तर शरीरात व्हिटॅमिन डी ३ आणि कॅल्शियमची कमतरता आहे. 


 

Web Title: 5 Signs that shows Your Body Needs More Nutrients, how to identify the deficiency of nutrients in your body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.