आपण भलेही किती काटेकोरपणे डाएट प्लॅनला फॉलो करत असलो तरी, कुकिंग ऑईलचा वापर आहारात होतोच. बाजारात बऱ्याच प्रकारचे तेल मिळतात. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार तेलाचा वापर करतो. आपण स्वयंपाक करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करत आहोत, यावर आपले आरोग्य अवलंबून असते. मात्र, काही प्रकारचे तेल आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. बरेच लोक विचार न करता बाजारातून स्वस्त दरात तेल विकत आणतात, व त्या तेलात पदार्थ तयार करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, बॅड कोलेस्टेरॉलमध्ये वाढ, लठ्ठपणा, अशा समस्या निर्माण होतात(5 Worst Oils for Your Health).
यासंदर्भात, मायउपचार या वेबसाईटला दिलेल्या माहितीत पोषणतज्ज्ञ आकांक्षा मिश्रा सांगतात, 'आपण आपल्या आहारात बऱ्याच प्रकारच्या तेलाचा वापर करतो. अनेक प्रकारचे तेल बाजारात उपलब्ध आहेत. पण आपण कोणत्या प्रकारचे तेल वापरत आहात, किती प्रमाणात वापरात आहात, कोणत्या पद्धतीने वापरत आहात यावर आपले आरोग्य अवलंबून असते.'
कॅनोला तेल
यासंदर्भात, एमबीबीएस पोषणतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील सांगतात, ''इतर कोणत्याही कुकिंग ऑईलपेक्षा कॅनोला तेल उत्तम मानले जाते. कॅनोल तेल उच्च पौष्टिक तत्त्वांनी समृद्ध आहे, म्हणून ते वापरण्यासाठी सुरक्षित मानले जाते. त्यात ओमेगा -३ आणि ओमेगा -६ फॅटी ऍसिड आढळते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण याचा वापरही कमी प्रमाणात करावा.''
नाश्ता सोडल्याने वजन कमी होते? तज्ज्ञ सांगतात, ब्रेकफास्ट स्किप केल्याने वजन कमी होईलही पण..
सोयाबीन तेल
सोयाबीन तेल ओमेगा -६, फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. मात्र, यामुळे आपल्या शरीरातील ओमेगा-६ आणि ओमेगा-३ चे प्रमाण असंतुलित होऊ शकते. त्यामुळे शरीरात सूज, संधिवात आणि कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो. नियमित सोयाबीन तेलाचा वापर केल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
मक्याचे तेल
मक्याच्या तेलामध्ये ओमेगा -६, फॅटी ऍसिडचे उच्च प्रमाण असते. आहारात ओमेगा-६, फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असल्यास शरीरावर सूज निर्माण होऊ शकते. याशिवाय यामध्ये प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट नसतात. त्यामुळे आहारात कॉर्न ऑईलचा समावेश करणं टाळा.
गव्हाच्या पिठांत मिसळा ३ प्रकारची पिठं, वजन होईल झरझर कमी- खा चपाती बिंधास्त
ऑलिव्ह ऑईल
सॅलेड किंवा कोणत्याही पदार्थावर वरून कच्चे तेल घालायचे असल्यास, अनेकांची पसंती ऑलिव्ह ऑईलकडे वळते. ऑलिव्ह ऑईल आरोग्याच्या दृष्टीने उत्तमही मानले जाते. पण त्याचा स्मोकिंग पॉईंट इतर काही तेलांपेक्षा कमी आहे, याचा अर्थ ते हाय फ्लेमवर शिजवण्यासाठी योग्य नाही. यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.
पाम ऑईल
पाम तेलात सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. याच्या अतिसेवनामुळे हृदयरोग होऊ शकतो. या तेलाचा वापर आंघोळीचा साबण तयार करण्यासाठी जास्त प्रमाणात होतो. पाम तेल हाय फ्लेमवर वितळते, म्हणूनच ते रेस्टॉरंटमध्ये किंवा टॉफी-चॉकलेट फॅक्टरीमध्ये जास्त प्रमाणात याचा वापर होतो.
मग कोणतं तेल वापरावे?
आपण आपल्याला आहारात खोबरेल तेल, एवोकॅडो तेल आणि तिळाच्या तेलाचा समावेश करू शकता. पण उत्तम आरोग्यासाठी सर्व तेल मर्यादित प्रमाणात खावे.