Lokmat Sakhi >Health > रात्री हळदीचे दूध प्यावे का? कुणी आणि कसे प्यावे?

रात्री हळदीचे दूध प्यावे का? कुणी आणि कसे प्यावे?

6 Benefits of Turmeric Milk: Why You Should Drink It Every Night रात्री एक कप दुधात चिमुटभर हळद घालून प्या, आरोग्याला मिळतील ६ भन्नाट फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 05:17 PM2023-08-02T17:17:34+5:302023-08-02T17:56:46+5:30

6 Benefits of Turmeric Milk: Why You Should Drink It Every Night रात्री एक कप दुधात चिमुटभर हळद घालून प्या, आरोग्याला मिळतील ६ भन्नाट फायदे

6 Benefits of Turmeric Milk: Why You Should Drink It Every Night | रात्री हळदीचे दूध प्यावे का? कुणी आणि कसे प्यावे?

रात्री हळदीचे दूध प्यावे का? कुणी आणि कसे प्यावे?

लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याचा सल्ला मिळत आला आहे. दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यात जर आपण हळद मिसळली, तर दुधाच्या पौष्टीकतेत अधिक भर पडते. दुधातून आपल्याला कॅल्शिअम, प्रोटीन्स, कार्ब्स आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळते. हळद हे अॅंटीबायोटीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दुधात हळद घालून पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. परंतु, दुधात हळद घालून कधी प्यावे? हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात?

यासंदर्भात, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर सांगतात, ''हळदीचे दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हळदमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे दुधात योग्य प्रमाणात हळद मिसळा. ज्यांना झोपेची समस्या आहे, त्यांनी दुधात हळद घालून प्यावे. नियमित हळदीचे दूध प्यायल्याने हार्मोन्स संतुलित राहते''(6 Benefits of Turmeric Milk: Why You Should Drink It Every Night).

अंगदुखीपासून आराम

हेल्थलाइन या वेबसाईटनुसार, ''हळदीचे दूध प्यायल्याने अंगदुखीपासून आराम मिळतो. दुधात कॅल्शिअम असल्यामुळे हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे रात्री हळदीचे दूध पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.''

भात तर आपण रोज शिकवतो - रोज खातो पण भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती?

मेंदूसाठी फायदेशीर

हळदीचे दूध हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. नियमित हळदीचे दूध प्यायल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. यासह मेंदूची कार्य क्षमता सुधारते. अल्झायमरसारख्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी हळदीचे दूध  फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

हळदमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. हळद दुधात घालून प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे रोगांशी लढण्यासाठी आपले शरीर आतून सक्षम होते.

पचनसंस्था मजबूत करते

हळदीचे दूध नियमित प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. अपचन आणि गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळतो. याच्या रोजच्या सेवनाने पोट चांगले साफ होते.

खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?

आतडे निरोगी ठेवते

नियमित हळदीचे दूध प्यायल्याने आतडे निरोगी राहतात. हे पोटातील अल्सर आणि कोलायटिसच्या उपचारांमध्ये खूप उपयुक्त ठरते. हे हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याच्या रोजच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.

वेट लॉस

हळद दूध प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यातील कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

या पद्धतीने करा हळदीचे दूध तयार

हळदीचे दूध करण्यासाठी एका भांड्यात एक कप दूध घ्या, त्यात चिमुटभर हळद आणि टेस्ट वाढवण्यासाठी गुळ मिसळा. झोपेच्या आधी दूध कोमट करून प्या. जर आपल्याला डायबिटिज असेल तर त्यात जायफळ पावडर मिक्स करा. जर आपल्यला थायरॉईडची समस्या असेल तर त्यात काही काजू मिक्स करा. जर आपल्याला घसा खवखवणे आणि इन्फेक्शनचा त्रास असेल तर, दुधात आपण चिमुटभर काळी मिरी पावडर मिक्स करू शकता. 

Web Title: 6 Benefits of Turmeric Milk: Why You Should Drink It Every Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.