हिवाळ्याच्या दिवसात अनेक लोकं व्यायाम करण्यास कंटाळा करतात. त्यात दिवाळी हा सण येतो आणि या सणात फराळ आणि गोड पदार्थांचं सेवन केल्यामुळे वजन वाढते. तेलकट खाणे, वर्कआऊट न करणे, यामुळे वजन झपाट्याने वाढते. आणि या ऋतूत साहजिकच कंटाळवाणा दिवस जातो. त्यामुळे जर तुम्हाला या दिवसात वजन कमी करायचे असेल. तर, तुम्ही विविध फळ आणि भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करू शकता, जेणेकरून तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी घटेल. आणि हिवाळ्यात एक पोषक आहार देखील मिळेल. चला तर मग कोणत्या आहेत ते फळ भाज्या जाणून घेऊयात.
मुळा
मुळामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरलेले आहेत. मुळा शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यास मदत करते. या हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात मुळा आवश्य समाविष्ट करा. मुळ्याची भाजी, कोंशिंबिर, मुळ्याचा ज्यूस, पराठा, अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या आहारात मुळ्याचा समावेश करू शकता.
गाजर
गाजरात भरपूर फायबर असते. वजन कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. ते खाल्ल्याने पचनशक्तीही मजबूत होते. हिवाळा या ऋतूत गाजर जरूर खा. गाजर खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.
बीटरूट
बीटरूटमध्ये लोह आणि इतर अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी आरोग्यदायी असतात. हे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढते आणि वजन कमी करण्यासही ते उपयुक्त ठरते.
सफरचंद
तुम्हाला माहिती आहेच की सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही रोज याचे सेवन केले तर आजार तुमच्यापासून दूर जातील. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचे सेवन जरूर करा.
संत्री
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात या फळाचे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. हिवाळ्यात नसून इतर ऋतूत देखील तुम्ही संत्र्याचे सेवन केले पाहिजे.
नाशपती
नाशपतीमध्ये बरेच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, म्हणून ते खाल्ल्याने आपल्या शरीराला जीवनसत्त्वे आणि आहारातील खनिजे मिळतात. जे वजन कमी करण्यास देखील मदत करते. या ऋतूत वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाशपतीचे सेवन करू शकता. ते खाल्ल्याने भूक कमी लागते.