Lokmat Sakhi >Health > केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त

केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त

6 Ways To Know If Your Mango Was Chemically Ripened : बाजारातील केमिकलयुक्त आंब्यांपासून राहा सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2024 10:00 AM2024-05-01T10:00:00+5:302024-05-01T10:00:02+5:30

6 Ways To Know If Your Mango Was Chemically Ripened : बाजारातील केमिकलयुक्त आंब्यांपासून राहा सावधान!

6 Ways To Know If Your Mango Was Chemically Ripened | केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त

केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त

उन्हाळा सुरु होताच, लोकांना वेध लागते आंबे (Mango Season) खाण्याचे. फळांचा राजा म्हणजे आंबा. संपूर्ण वर्ष आपण आंब्याची वाट पाहतो (Summer Special). आंब्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. पण प्रत्येक आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवला असेलच असे नाही. काही विक्रेते अधिक नफा कमावण्याच्या नादात, कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर करून आंबे लवकर पिकवतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा कोणता? केमिकल रसायनांचा वापर करून पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? असा प्रश्न निर्माण होतो.

या बद्दलची माहिती देताना, आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, 'केमिकलने पिकवलेले आंबे खाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. यामुळे आपल्याला उलट्या, जुलाब, अशक्तपणा, छातीत आम्लपित्त, डोकेदुखी यासारख्या समस्या छळू शकतात. इतकेच नाही तर, डोळ्यांना इजा होणे, घसा खवखवणे आणि अन्न गिळण्यास त्रास होणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात'(6 Ways To Know If Your Mango Was Chemically Ripened).

रसायनयुक्त आंबा खाण्याचे तोटे

केमिकल रसायनयुक्त आंबे खाल्ल्याने खोकला, घशात खवखव, यांसारखी लक्षणे दिसू शकतात. आंबे खाल्ल्यानंतर श्वास घेण्यात अडचण येत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

१६ ते १८ वयातल्या मुलींसाठी कोणती ब्रा योग्य? ॲडल्ट ब्रा खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

हायपोक्सियाचा धोका

रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्याने हायपोक्सियाची समस्या उद्भवू शकते. हायपोक्सिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पुरेसा ऑक्सिजन ऊतींपर्यंत पोहोचत नाही. शिवाय रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

रसायनाने पिकवलेला आंबा कसा ओळखायचा?

- आंबा खरेदी करताना आंब्यावर पांढरी किंवा राखाडी पावडर नसेल याची काळजी घ्या. अशी पावडर दिसली तर समजून जा की हे आंबे केमिकलचा वापर करून पिकवले आहे.

- आंब्याचा निरखून रंग पाहा. जर केमिकल रसायनांनी आंबा पिकवला असेल तर, त्याचा रंग गडद असू शकतो.

- रसायनांचा वापर करून पिकवलेला आंब्यावर हिरवे डाग असतात. जे नैसर्गिक दिसत नाहीत.

मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी? वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कशी निवडायची?

- बाहेरून पूर्णपणे पिकलेले आंबे आतून कच्चे असू शकतात. तसेच हे आंबे कमी गोड असू शकतात.

- रसायनांनी पिकवलेले आंबे चवीनुसार आपण ओळखू शकता. हे खाल्ल्यानंतर तोंडात थोडी जळजळ होऊ शकते.

- कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेले आंब्यामध्ये जास्त रस नसतो आणि लगदाही थोडा वेगळा दिसू शकतो.

Web Title: 6 Ways To Know If Your Mango Was Chemically Ripened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.