Lokmat Sakhi >Health > दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल

7 Foods That Highest In Calcium And Vitamin D : एक कप शिजवलेल्या पालकात २४५ मिलीग्राम कॅल्शियम असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:43 PM2024-09-19T12:43:28+5:302024-09-23T17:58:27+5:30

7 Foods That Highest In Calcium And Vitamin D : एक कप शिजवलेल्या पालकात २४५ मिलीग्राम कॅल्शियम असते.

7 Foods That Highest In Calcium And Vitamin D Other Than Milk | दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल

कॅल्शियम हाडं आणि दातांच्या विकासासाठी फार महत्वाचा घटक आहे. नर्व्स सिस्टीमचे कामकाज चांगले चालण्यासाठी, ब्लड क्लोटींग, मांसपेशींचे संकुचन, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कॅल्शियम हा महत्वाचा घटक आहे. दूधाव्यतिरिक्त कॅल्शियमने परीपूर्ण इतर खाद्यपदार्थ आहेत ज्याच्या सेवनानं  हाडं आणि दातं मजबूत होण्यास मदत होत आणि तब्येतही चांगली राहते. (7 Foods That Highest In Calcium And Vitamin D Other Than Milk)

मेडीकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार एक कप सुर्यफुलाच्या बियांमध्ये १०९ मिलीग्राम कॅल्शियम असते.  या बिया मॅग्नेशियमने परिपूर्ण असतातत. ज्यामुळे शरीरातील नर्व्हस आणि मसल्स चांगले राहण्यास मदत होते. यात व्हिटामीन ई आणि कॉपर असते (Ref). ज्यामुळे स्ट्रेथ आणि फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि या बियांच्या सेवनाने एक्स्ट्रा कॅलरीज इन्टेक टाळता येतो. २ कप चिरलेल्या केलमध्ये जवळपास १८० ग्रॅम कॅल्शियम असते. केलमध्ये एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यात कमीत कमी कॅलरीज असतात. १०० ग्रॅम मध्ये  ३५ कॅलरीज असतात.

एक औंस म्हणजेच जवळपास २३ बदामात ७६  मिलीग्राम कॅल्शियम असते. ब्राजील नट्स आणि हेजलनट्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. 

एक औंस म्हणजे जवळपास २ चमचे चिया सिड्समध्ये १७९ मिलीग्राम कॅल्शियम  असते. १ चमचा तिळाच्या बियांमध्ये ८८ मिलीग्राम कॅल्शियम असते. 

१ चमचा खसखसच्या बियांमध्ये १२६ मिलीग्राम कॅल्शियम असते. एक कप पांढऱ्या डाळींमध्ये १६१ मिलीग्राम कॅल्शियम असते. एक कप काबुली चण्यांमध्ये ८० मिलीग्राम कॅल्शियम असते. एक कप शिजवलेल्या चवळीत २११ मिलीग्राम कॅल्शियम असते. 

कॅल्शियमचा टोफू एक उत्तम स्त्रोत आहे,अर्धा कप  टोफूमध्ये ८६१ मिलीग्राम कॅल्शियम असते. फोर्टिफाईड प्लांटबेस्ड दूध आणि ज्यूस, बदाम दूध, सोया दूध आणि ओट्स दूध हे कॅल्शियम फोर्टिफआईडपासून तयारे झालेले असतात. 

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

फोर्टिफाईड  संत्र्याचा रससुद्धा ३०० मिलीग्राम कॅल्शियम प्रदान करतो.  संत्र्याचा रस प्यायल्यानं व्हिटामीन सी मिळते आणि इम्यूनिटी मजबूत राहते. 

एक कप शिजवलेल्या पालकात २४५ मिलीग्राम कॅल्शियम असते. यासोबतच केल, कोलार्ड ग्रीन्स, बोक चोय या पानांमध्ये कॅल्शियम असते.

कितीतरी शॅम्पू बदलले-केसांची अवस्था वाईटच? डॉक्टर सांगतात, सकाळी १ काम करा, लांबसडक होतील केस

एक मोठ्या संत्रीमध्ये जवळपास ७४ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. एक ग्लास संत्र्याच्य रसात  ३०० मिलीग्रॅम कॅल्शियम असते. 

Web Title: 7 Foods That Highest In Calcium And Vitamin D Other Than Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.