Lokmat Sakhi >Health > सकाळी उठल्यानंतर जळजळ, एसिडिटीमुळे डोकं जड होतं? 6 उपाय, पटकन मिळेल आराम

सकाळी उठल्यानंतर जळजळ, एसिडिटीमुळे डोकं जड होतं? 6 उपाय, पटकन मिळेल आराम

Acidity Solution : एसिडिटीचा त्रास जास्त काळ होऊ नये म्हणून घरगुती गोष्टी वापरता येतात. यामुळे आम्लपित्त कमी होण्यास आणि पोटातील उष्णता थंड होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 09:09 AM2022-10-10T09:09:00+5:302022-10-10T09:10:01+5:30

Acidity Solution : एसिडिटीचा त्रास जास्त काळ होऊ नये म्हणून घरगुती गोष्टी वापरता येतात. यामुळे आम्लपित्त कमी होण्यास आणि पोटातील उष्णता थंड होण्यास मदत होते.

Acidity Solution : Six Quick Remedies to Get Rid of Acidity at Home | सकाळी उठल्यानंतर जळजळ, एसिडिटीमुळे डोकं जड होतं? 6 उपाय, पटकन मिळेल आराम

सकाळी उठल्यानंतर जळजळ, एसिडिटीमुळे डोकं जड होतं? 6 उपाय, पटकन मिळेल आराम

तेलकट, तिखट खाल्ल्याने अनेकदा गॅस किंवा  एसिडिटीची समस्या उद्भवते.  एसिडिटी ही एक सामान्य समस्या असली तरी, योग्य उपचार न केल्यास उलट्या, पोटदुखी आणि पेटके देखील होऊ शकतात. (Acidity Solution)अ‍ॅसिडिटीची अनेक कारणे आहेत, जसे की मसालेदार अन्न, तळलेले किंवा जेवणातील दीर्घ अंतर आणि कॅफिनचे जास्त सेवन. एसिडिटीचा त्रास जास्त काळ होऊ नये म्हणून घरगुती गोष्टी वापरता येतात. यामुळे आम्लपित्त कमी होण्यास आणि पोटातील उष्णता थंड होण्यास मदत होते. जाणून घेऊया कोणते 8 घरगुती उपायांनी  एसिडिटीपासून सुटका मिळू शकते. (Six Quick Remedies to Get Rid of Acidity at Home)

पेपरमिंट टी

पेपरमिंट बहुतेक माऊथ फ्रेशनर म्हणून वापरला जातो. पेपरमिंटमध्ये भरपूर प्रमाणात अँटिस्पास्मोडिक असते ज्यामुळे मळमळ आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हेल्थलाइननुसार, अॅसिडिटीच्या बाबतीत पेपरमिंट चहाचे सेवन केले जाऊ शकते. त्यामुळे अपचन दूर होऊन पोटाला आराम मिळतो. तसेच पोटात ऍसिड तयार होण्याचे प्रमाण कमी होते.

एप्पल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासह  त्वचेच्या आरोग्यासोबत पोटाच्या समस्या कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. पोटात असलेल्या ऍसिडमुळे अपचन होऊ शकते, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन केले जाऊ शकते.

आलं

आलं हा अपचनासाठी आणखी एक नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये असलेले एन्झाईम पोटातील आम्ल कमी करू शकतात. आम्लपित्तपासून मुक्ती मिळवण्यासाठी आल्याचा चहा पिऊ शकतो. त्यात लिंबू आणि मध टाकून चहा चविष्ट बनवता येतो. ज्यांना चहा प्यायला आवडत नाही ते आले कँडी किंवा आले आणि मध यांचे मिश्रण घेऊ शकतात.

बेकींग सोडा

बेकिंग सोडा पोटातील ऍसिड लवकर कमी करू शकतो. खाल्ल्यानंतर अपचन, फुगवणे आणि गॅसपासून आराम मिळू शकतो. दोन ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळल्याने लगेच आराम मिळतो. बेकिंग सोडा वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित आहे.

दालचिनी

पोटाच्या विकारात दालचिनीचा चहा खूप फायदेशीर ठरतो. एसिडिटीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी याचे सेवन केले जाऊ शकते. थोडी दालचिनी थोड्या पाण्यात उकळा. चहा थोडा थंड झाल्यावर त्यात लिंबू आणि मध मिसळून प्या.

जीरं

अ‍ॅसिडिटी कमी करण्यातही जिरे उपयुक्त भूमिका बजावू शकते. पाण्यात जिरे उकळवून प्यायल्याने फायदा होतो. याशिवाय अर्धा चमचा भाजलेले आणि बारीक वाटलेले जिरे कोमट पाण्यासोबत घेतल्यानेही आराम मिळतो.

Web Title: Acidity Solution : Six Quick Remedies to Get Rid of Acidity at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.