Join us   

Breast size : अचानक स्तनांचा आकार वाढू लागला तर दुर्लक्ष चुकूनही करू नका; घाबरण्याआधी कारणं समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 1:40 PM

Breast size : जसजसं तुमचं वजन वाढत जातं. तुम्ही जितकं अनहेल्दी खाता तसा तुमच्या छातीच्या आकारात बदल होत जातो. पण नेहमीच छातीत होत असलेल्या  लहान मोठ्या बदलांकडे तुमचं लक्ष असायला हवं

जसजसं वय वाढत जातं तसं प्रत्येक मुलीला शारीरिक बदलांचा सामना करावा लागतो. ब्रा कधी, कधी घट्ट होते, आपल्या छातीचा आकार आधीपेक्षा वाढलाय का? असे अनेक विचार डोक्यात येतात. ब्रेस्ट टिश्यू हे मुख्य स्वरूपात फॅट्सच्या लेअर्सनी तयार झालेले असतात. त्यामुळे छातीच्या आकारात बदल होणं हे खूपच सामान्य आहे.  पण अचानक तुम्हाला खूप मोठा बदल जाणवत असेल आणि दिवसेंदिवस छातीचा आकार अधिकाधिक वाढत जात असेल तर घाबरून जाण्याआधी काही कारणं लक्षात घ्यायला हवीत. जेणेकरून छातीचा आकार का वाढत जातो  हे समजणं सोपं होईल.

अनेक महिला आपल्या छातीच्या आकारात होत असलेल्या बदलांकडे लक्ष देत नाहीत. अंडर गारर्मेंटस विकत घेताना त्यांच्या लक्षात येत की आकारात वाढ झाली आहे. जसजसं तुमचं वजन वाढत जातं. तुम्ही जितकं अनहेल्दी खाता तसा तुमच्या छातीच्या आकारात बदल होत जातो. पण नेहमीच छातीत होत असलेल्या  लहान मोठ्या बदलांकडे तुमचं लक्ष असायला हवं. ब्रेस्टचा आकार कोणत्या कारणांमुळे वाढतो याबाबत गायनोकॉलोजिस्ट आशा यांनी एका वेबसाईटशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. 

वजन वाढणं

जीवनशैली, आहारात बदल आणि व्यायाम न करण्यासारख्या सवयींमुळे  वजन वाढू लागतं तेव्हा तुमच्या स्तनांचा आकार वाढण सामान्य आहे. तथापि, वजन वाढणे आणि लठ्ठपणा यामुळे आपल्याला स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असू शकतो, म्हणूनच अनेकांकडून वजन कमी करण्याची शिफारस केली जाते. काही केसेसमध्ये वजन वाढण्याचे काही खास कारण नसेल तर हार्मोनल बदल हे कारणंही असू शकते. 

गर्भनिरोधक गोळ्या

जर आपण दररोज गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर स्तनाच्या आकारात अचानक बदल होईल. बर्थ कंट्रोल पिल्समुळे शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढते, ज्यामुळे स्तनाच्या आकारावर परिणाम होतो.

मासिक पाळी

पिरिएड्स दरम्यान आणि ओव्हुलेशन प्रक्रियेनंतर शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी खूप जास्त असते, म्हणून स्तनाचे आकार वाढतात. त्याशिवाय या काळात स्तन अत्यंत संवेदनशील आणि किंचित सूज आल्याप्रमाणे जाणवतात.  असं जाणवतं कारण या कालावधी दरम्यान स्तनातील दुधाच्या ग्रंथी वाढतात.  हेच कारण आहे की पीरियड दरम्यान स्तन मोठे होतात. तथापि, एकदा हार्मोनची पातळी नियंत्रणात आल्यास पुन्हा स्तन सामान्य आकारात येतात. 

गरोदरपणा

गर्भधारणेदरम्यान स्तनाचे वाढणे खूप सामान्य आणि नैसर्गिक आहे. हार्मोन्समधील बदल हे यामागील मुख्य कारण आहे. अचानक स्तनांच्या पेशींमध्ये जास्त रक्ताचे  असते ज्यामुळे स्तनाच्या आकारात वाढ होते. काही प्रकरणांमध्ये, गरोदरपणाच्या 9 व्या महिन्यापर्यंत स्तनाचे आकारमान वाढत जाते. बर्‍याच स्त्रियांमध्ये, गर्भधारणेदरम्यान स्तनाच्या आकारात झालेला बदल टिकून राहतो. म्हणून नवीन आकाराचे अंडरगारमेंट खरेदी करणं योग्य ठरतं. 

प्रसृती

गर्भधारणेदरम्यान आपले स्तन मोठे असल्याचे आपल्याला वाटत असल्यास, स्तनपान कालावधी पूर्ण  होईपर्यंत वाट पाहा. एकदा बाळाला आहार दिल्यानंतर दूध वेगाने वाहू लागते आणि स्तनाच्या ऊतींना व्यापू लागतो, ज्यामुळे स्तनांमध्ये विलक्षण वाढ होते. परंतु जेव्हा बाळाचा आहार देण्याचे वेळापत्रक स्थिर होते तेव्हा स्तनातून  हळूहळू नॉर्मल व्हायला सुरूवात होते.

जर आपल्याला स्तनाच्या आकारात फरक जाणवत असेल आणि तो बराच काळ टिकून असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. बर्‍याच वेळा, आपल्याला लक्षात येण्यापूर्वीच स्तन त्यांच्या मूळ आकारात परत जातात.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमहिला