Lokmat Sakhi >Health >Adolescence > Breast size : स्तनांची वाढ न होणं हा आजार आहे की हार्मोनल प्रॉब्लेम? 6 कारणांमुळे वाढते ही समस्या

Breast size : स्तनांची वाढ न होणं हा आजार आहे की हार्मोनल प्रॉब्लेम? 6 कारणांमुळे वाढते ही समस्या

Breast size : मुलींमध्ये स्तनाचा विकास 10 वर्षापासून सुरू होतो, काही मुलींमध्ये 12-13 वर्षाच्या वयानंतर स्तनाचा विकास होऊ लागतो. परंतु अशा बर्‍याच मुली आहेत, ज्यांच्या तरूण वयात स्तनाचा आकार लहान राहतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 04:39 PM2021-07-15T16:39:06+5:302021-07-15T16:56:46+5:30

Breast size : मुलींमध्ये स्तनाचा विकास 10 वर्षापासून सुरू होतो, काही मुलींमध्ये 12-13 वर्षाच्या वयानंतर स्तनाचा विकास होऊ लागतो. परंतु अशा बर्‍याच मुली आहेत, ज्यांच्या तरूण वयात स्तनाचा आकार लहान राहतो.

Breast size : Reasons why breast size does not increase | Breast size : स्तनांची वाढ न होणं हा आजार आहे की हार्मोनल प्रॉब्लेम? 6 कारणांमुळे वाढते ही समस्या

Breast size : स्तनांची वाढ न होणं हा आजार आहे की हार्मोनल प्रॉब्लेम? 6 कारणांमुळे वाढते ही समस्या

Highlightsहे सहसा पाहिले जाते की ज्या मुली किंवा स्त्रियांचे वजन कमी असते, त्यांच्या स्तनाचे आकार देखील लहान असतात. म्हणूनच, आपल्या स्तनाच्या आकारासाठी आपलं वजन देखील कारणीभूत ठरतं.जरी स्तनांच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाहाचाअभाव असला तरी त्यांचा आकार वाढत नाही. आपल्या शरीरात रक्त पुरवठा किंवा रक्त परिसंचरण चांगले ठेवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

प्रत्येक मुलगी परिपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी परफेक्ट फिगर मिळविण्याची आकांक्षा ठेवते. यासाठी मुलींच्या स्तनाचा योग्य आकार असणे फार महत्वाचे आहे. परंतु बर्‍याच मुली आपल्या स्तनाचा आकार न वाढल्यामुळे काळजीत असतात. चांगले स्तन महिलांचे शरीर सुसज्ज, परिपूर्ण आणि आकर्षक बनविण्यात मदत करतात.

मुलींमध्ये स्तनाचा विकास 10 वर्षापासून सुरू होतो, काही मुलींमध्ये 12-13 वर्षाच्या वयानंतर स्तनाचा विकास होऊ लागतो. परंतु अशा बर्‍याच मुली आहेत, ज्यांच्या तरूण वयात स्तनांचा आकार लहान राहतो. यासाठी जीवनशैलीशी निगडीत काही गोष्टी जबाबदार असू शकतात. आकाश हेल्थकेयरच्या स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर शिल्पा घोष यांनी ओन्ली माय  हेल्थशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

पोषक तत्वांनी भरपूर डाएट न घेणं

स्तनाचा आकार न वाढण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे आहारातील पोषक तत्वांचा अभाव. आहारामध्ये योग्य आणि पोषक घटकांचा समावेश न केल्यामुळे बर्‍याच मुलींचे स्तन आकार लहान राहतात. जेव्हा शरीराला पोषकद्रव्ये योग्य प्रमाणात मिळत नाहीत तेव्हा स्तनाचा योग्य विकास होत नाही. स्तन विकसित करण्यासाठी आपल्यासाठी चांगला आहार घेणे खूप महत्वाचे आहे. निरोगी आहार घेतल्यास स्तनाचा आकार वाढवता येतो.

हार्मोन्सचं असंतुलन

स्तनाचा आकार न वाढण्यामागील एक कारण हार्मोन असंतुलन देखील आहे. स्तनांच्या आकाराच्या विकासासाठी इस्ट्रोजेन हार्मोन जबाबदार आहे. अशा परिस्थितीत, शरीरात इस्ट्रोजेन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे, स्तनाचा आकार लहान राहतो. अनेक मुलींमध्ये, इस्ट्रोजेन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या जास्त प्रमाणामुळे स्तनाचा आकार वाढू शकत नाही.

शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी आपण योग्य आहार घ्यावा. अशा पदार्थांचे सेवन करा, जे शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढविण्यात मदत करतात. इस्ट्रोजेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने स्तनाचा आकार वाढतो. यासह तुम्ही व्यायाम आणि योगासन करूनही स्तन वाढवू शकता. स्तनाचा आकार वाढविण्यासाठी वॉल प्रेस व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे.

वजन कमी होणं

हे सहसा पाहिले जाते की ज्या मुली किंवा स्त्रियांचे वजन कमी असते, त्यांच्या स्तनाचे आकार देखील लहान असतात. म्हणूनच, आपल्या स्तनाच्या आकारासाठी आपलं वजन देखील कारणीभूत ठरतं. सड पातळ मुलींच्या स्तनाचा आकार नेहमीच लहान असतो. आपण आपल्या स्तनांचे आकार वाढवू इच्छित असल्यास आपले वजन वाढविणे सुरू करा. वजन वाढल्यास आपल्या स्तनाचा आकार देखील आपोआप वाढेल.

अनुवांशिक  कारणं

बर्‍याच प्रकरणांमध्ये, स्तनाच्या आकारात वाढ किंवा घट होण्याचे कारण देखील अनुवांशिक असते. जर आपल्या आईचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे स्तन आकार लहान असतील तर पुढील पिढीमध्येही ही समस्या दिसून येते. म्हणून जर आपल्या कुटूंबातील सदस्यांकडे स्तनाचा आकार लहान असेल तर आपण लहान वयपासूनच आपल्या आहाराकडे लक्ष देणे सुरू केले पाहिजे.

रक्तप्रवाहाची कमतरता 

स्तनांच्या स्नायूंमध्ये  जरी रक्तप्रवाहाचाअभाव असला तरी त्यांचा आकार वाढत नाही. आपल्या शरीरात रक्त पुरवढा किंवा रक्त परिसंचरण चांगले ठेवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या स्तनांना कोणत्याही तेलाने मालिश करू शकता ज्यामुळे रक्तभिसारण वाढेल. यासाठी आपण गोलाकार पद्धतीने आपल्या स्तनांची मालिश करा.

जास्त ताण घेणं

तणावामुळे अनेक समस्या उद्भवतात. स्तनाच्या छोट्या आकाराच्या मागे ताणतणाव देखील महत्त्वपूर्ण कारण असू शकतात. बर्‍याचदा मुली ज्या जास्त ताण तणावाखाली असतात, त्यांच्या स्तनाचा आकार योग्य प्रमाणात विकसित होऊ शकत नाही. अतिरिक्त ताण, चिंता आणि नैराश्य स्तनांच्या विकासात बाधा निर्माण करतात. म्हणून निरोगी राहण्यासाठी आणि आपल्या स्तनांचा विकास करण्यासाठी, आपण नेहमी पुरेश्या प्रमाणात विश्रांती घ्यावी.
 

Web Title: Breast size : Reasons why breast size does not increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.