Lokmat Sakhi >Health >Adolescence > वयात येताना तुमच्या शरीरात झालेल्या बदलांची लाज वाटते? समजून घ्या या वयात शरीरात काय बदल होतात

वयात येताना तुमच्या शरीरात झालेल्या बदलांची लाज वाटते? समजून घ्या या वयात शरीरात काय बदल होतात

Women Health Tips in Marathi : ॲडलोसन्स अर्थात पौगंडावस्था हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यात शरीरात आणि मनात, भावनांतही अनेक प्रकारचे बदल होतात. हा अनुभव तुमच्यासाठी नवा असला तरी हे बदल मोठं होणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 04:40 PM2021-03-07T16:40:31+5:302021-03-07T16:54:41+5:30

Women Health Tips in Marathi : ॲडलोसन्स अर्थात पौगंडावस्था हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यात शरीरात आणि मनात, भावनांतही अनेक प्रकारचे बदल होतात. हा अनुभव तुमच्यासाठी नवा असला तरी हे बदल मोठं होणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात होतात.

Feeling ashamed of the changes comes in your body? Understand what changes take place in the body at this age | वयात येताना तुमच्या शरीरात झालेल्या बदलांची लाज वाटते? समजून घ्या या वयात शरीरात काय बदल होतात

वयात येताना तुमच्या शरीरात झालेल्या बदलांची लाज वाटते? समजून घ्या या वयात शरीरात काय बदल होतात

(Image Credit-Unisafe, Quora)

टीनएजर म्हणून आपण काहीतरी भलतंच वागतो, बोलतो असं वाटतं तुम्हाला, शरीरात होणाऱ्या बदलाने लाज वाटते स्वतःची ? रिलॅक्स. जे काही सध्या तुमचं होतंय ते एकदम नॉर्मल आहे. सगळ्यांचं असंच होतं. वयात येताना , ऍडोलसन्स अर्थात पौंगडावस्था या टप्प्यात तुमच्या शरीरात, शारीरिकआणि मानसिक असे अनेक बदल घडतील.

तुमच्या मनात आणि शरीरात जे काही बदल होतायेत ते अगदी नैसर्गिक आहेत. नॉर्मलही आहेत. या वयात सगळ्यांमध्ये असे बदल होतात. ॲडलोसन्स अर्थात पौगंडावस्था हा आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यात शरीरात आणि मनात, भावनांतही अनेक प्रकारचे बदल होतात. हा अनुभव तुमच्यासाठी नवा असला तरी हे बदल मोठं होणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात होतात.

शरीरात आणि मनात बदल घडून येतात कारण तुमच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होत असतो. वाढीच्या वयात शरीरातल्या हार्मोन्समध्ये झपाट्याने बदल होताततुमचं शरीर कालपेक्षा वेगळं दिसायला लागतं. सर्वसाधारणपणे पौगंडावस्था वयाच्या ८ ते १३ या वयादरम्यान कधीतरी सुरु होते. पण शरीरातले ठळक बदल साधारण वयाच्या दहाव्या नाहीतर अकराव्या वर्षी दिसायला लागतात. पौगंडावस्थेत तुमच्या शरीरातील अंडाशयाची म्हणजे ओव्हरीजची वाढ होते. शिवाय शरीरात दोन महत्वाची हार्मोन्स स्त्रवायला लागतात. एक आयस्ट्रोजेन आणि दुसरं प्रोजेस्टेरॉन.

ॲडोलसन्समध्ये  होणारे बदल कोणते

पिंपल्स येतात.

काखेत सतत घाम येतो.

मासिक पाळी सुरु होते.

तुमची उंची वाढते.

स्तनांचा आकार वाढतो.

काखेत केस येतात. पायांवर आणि जांघेत केस येतात.

हार्मोन्सचा लैंगिक अवयवांवर होणारा परिणाम

या हार्मोनल बदलांमुळे तुमच्या स्तनांचा आकार वाढतो. स्तनाग्रं किंवा निपल्स उठावदार होतात. याच हार्मोन्समुळे योनी मार्ग, गर्भाशय आणि अंडनलिका (फॅलोपिअन ट्यूब) विकसित होतात. त्याचप्रमाणे म्युकोसल स्रावात वाढ झाल्याने व्हजायनल डिस्चार्जलाही सुरुवात होते. त्यापाठोपाठ मासिक पाळी सुरु होते आणि याच हार्मोन्समुळे मासिक पाळीच चक्र निश्चित होतं.

शारीरिक बदल

तुमच्या शरीरातही अनेक बदल झालेले तुमच्या लक्षात येतील. तुमची उंची वाढेल. हे हार्मोन्सच तुमच्या शरीरात फॅट्स कुठे साचून राहील हे ठरवतात. कंबर, मांड्या, ढुंगण याठिकाणी ही फॅट्स जमायला सुरुवात होते आणि हे अवयव उठावदार दिसायला लागतात. तुमची ताकद आणि वजनही वाढते. सेबेशीयस ग्रंथीमधून तेल अधिक प्रमाणात स्रवायला लागते. ज्यामुळे चेहरा आणि त्वचा तेलकट होते. या ग्रंथीमुळेच चेहऱ्यावर पिंपल्स, पुरळ येतं. तुम्हाला जास्तच घाम यायला लागतो. पण ते अगदीच नॉर्मल आहे. गुप्तांगाच्या आजूबाजूला केस यायला लागतात. सुरुवातीला हे केस लहान आणि मऊ असतात. पण कालांतराने वयानुसार ते अधिक दाट होत जातात. फक्त गुप्तांगांवरच नाही तर काखेत, पायांवर, हातांवरही केस येतात. काहीवेळ पोटावरही केस येतात.

भावनिक बदल

हार्मोनल बदलांमुळे तुमचे मुड‌्स अचानक बदलायला लागतात.  मूड सविंग्स म्हणजे क्षणात आनंद आणि क्षणात राग, दुःख, उदासी असे भावनिक हेलकावे तुम्हाला अनुभवयाला मिळतात. त्याचप्रमाणे तुमच्या लैंगिक भावनेतही अनैच्छिक वाढ होते. हे सगळे बदल अत्यंत नैसर्गिक असतात हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. हार्मोनल बदलांमुळे ते होतात. त्यामुळे या सगळ्या बदलांची लाज वाटून घेऊन नका. आपल्यात काहीतरी भलतंच घडतंय असं वाटून घाबरून जाऊ नका किंवा स्वतःविषयी चुकीचा विचारही करू नका. गरज वाटलीच तर तुमच्या विश्वासातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीशी बोला. म्हणजे हे बदल नेमके कसे हाताळायचे याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल.

तज्ज्ञ सल्ल्यासाठी विशेष आभार: डॉ. सुप्रिया अरवारी (एमडी, डिजिओ)
 

Web Title: Feeling ashamed of the changes comes in your body? Understand what changes take place in the body at this age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.