Join us

How To Remove Stretch Marks : स्तनांवर स्ट्रेच मार्क? हे हार्मोनल बदल की लाइफस्टाइल आजार? एक्सपर्ट सांगतात उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 13:40 IST

How To Remove Stretch Marks : जर तुम्हाला स्तनावर स्ट्रेच मार्क्स दिसले तर त्या खूप पातळ आणि लांब रेषा दिसतील.  सुरुवातीला ते  थोडेसे लाल किंवा जांभळे रंगाचे असू शकतात. या रेषा जुन्या झाल्या की त्यांचा रंग पांढरा होतो.

शरीराच्या काही भागांवर स्ट्रेच मार्क्स (Stretch Marks) जास्त असतात. विशेषत: शरीराच्या अशा भागांवर जिथे जास्त चरबी असते. या अवयवांमध्ये स्तनाचाही समावेश होतो. तुमच्या स्तनावर स्ट्रेच मार्क्स येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जर तुम्हाला तुमच्या स्तनावर जांभळ्या रंगाच्या रेषा दिसल्या तर त्या पाहिल्यानंतर घाबरू नका कारण यामध्ये तुम्हाला कोणताही गंभीर आजार किंवा कोणतीही गंभीर स्थिती नाही. काही सोप्या उपायांनी ते कमी  होऊ शकतात. (How To Remove Stretch Marks)

जर तुम्हाला स्तनावर स्ट्रेच मार्क्स दिसले तर त्या खूप पातळ आणि लांब रेषा दिसतील.  सुरुवातीला ते  थोडेसे लाल किंवा जांभळे रंगाचे असू शकतात. या रेषा जुन्या झाल्या की त्यांचा रंग पांढरा होतो. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमच्या स्तनांसह तुमच्या पोटावर, नितंबांवर आणि मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स असू शकतात.

स्ट्रेच मार्क्सची कारणं काय आहेत?

डॉ मनोज जोहर,(वरिष्ठ संचालक, सौंदर्य आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार स्तनांवर स्ट्रेच मार्क्सचे कारण त्यांच्या आकारात बदल होणं हे आहे. विशेषत: गरोदरपणात आणि गर्भधारणेनंतर स्तनाच्या आकारात बदल होतो, ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात. पण ती गंभीर स्थिती नाही. याशिवाय स्तनांवर स्ट्रेच मार्क्स येण्याची इतरही कारणे आहेत.

प्रेग्नंट नसतानाही स्तनांमधून पांढरं पाणी येतं? दुर्लक्ष करण्याआधी 'या' आजारांची लक्षणं जाणून घ्या

प्यूबर्टी

जेव्हा तुम्ही किशोरावस्थेत येता तेव्हा तुमच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे तुमच्या शरीरातही बदल होऊ शकतात. या काळात, मुलींच्या स्तनाच्या ऊतींचा मोठ्या प्रमाणात विकास होतो आणि हे ऊतक विकसित होताच ते त्वचेला ताणतात, ज्यामुळे तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात.

प्रेग्नंसी

तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात स्ट्रेच मार्क्स येण्याचे मुख्य कारण म्हणजे गर्भधारणा. गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांत, तुम्हाला स्तनावर स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. इस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने दुधाच्या नलिकांचा देखील विकास होतो ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात.

वजन वाढणं, कमी होणं

तुमचे वजन अचानक थोडे वाढले किंवा कमी झाले तरीही तुमच्या स्तनावर स्ट्रेच मार्क्स असू शकतात. वजन वाढल्याने तुमच्या स्तनातील चरबीचे ऊतक देखील वाढते. यामुळे तुमची त्वचा खेचली जाते आणि तुम्हाला हे स्ट्रेच स्ट्रेच मार्क्सच्या रूपात पाहायला मिळतं.

इतर कारणं

तुम्हाला कुशन सिंड्रोम किंवा मार्फन सिंड्रोम असल्यास, या प्रकारच्या आरोग्य स्थितीमुळे स्ट्रेच मार्क्स देखील होऊ शकतात. ऑटोइम्यून रोगांमुळे स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात.

स्ट्रेच मार्क्सपासून बचाव कसा कराल?

जर तुम्ही तुमच्या स्तनाला मॉइश्चरायझरने मसाज केले तर त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि स्ट्रेच मार्क्स कमी होतात. बदामाच्या तेलाने १५ मिनिटे मसाज करू शकता.

एक्सफोलिएशन तुमची त्वचा निरोगी ठेवते आणि ते तुमच्या त्वचेला मृत त्वचेच्या पेशींपासून मुक्त होण्यास मदत करते. यामुळे तुमची त्वचा मऊ होते आणि तुम्ही स्ट्रेच मार्क्स टाळू शकता.

..म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी जाणून घ्या उपाय

तुमच्या त्वचेला केवळ वरूनच नाही तर आतूनही हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन आवश्यक आहे. कोरडी त्वचा चांगली ताणली जाते जेव्हा ती ताणली जाते तेव्हा तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येतात.

स्ट्रेच मार्क्सपासून बचावाचे वैद्यकीय उपाय

लेझर थेरपी ही एक सुरक्षित उपचार आहे ज्यामध्ये तुमचे हरवलेले इलास्टिन तंतू पुन्हा निर्माण केले जातात आणि कोलेजनचे उत्पादन सुरळीत केले जाते. 

 रात्री 'या' वेळेला झोपल्यानं घटतो जीवघेण्या हार्ट अटॅकचा धोका; समोर आला रिसर्च

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, त्यात  अॅसिड वापरले जाते, ज्यामुळे वरची त्वचा गुळगुळीत होते आणि मार्क्स कमी होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर स्ट्रेच मार्क्स किंवा सुरकुत्या  कमी करण्यासाठी हा एक चांगला कॉस्मेटिक हा पर्याय आहे.

या उपचारात लेझरचा वापर केला जातो. निरोगी जीवनशैलीचे आणि या पद्धतींचे अनुसरण करून, आपण स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होऊ शकता. नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. त्वचेची काळजी घ्या आणि संतुलित आहार घ्या.

टॅग्स : स्त्रियांचे आरोग्यब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सत्वचेची काळजी