Join us   

मासिक पाळीविषयी आपल्या लेकीला कधी आणि कशी माहिती द्यावी? पाळीची भीती वाटू नये म्हणून... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 1:35 PM

Tips For Talking To Your Daughter About Periods: मासिक पाळीविषयी लेकीला कसं आणि केव्हा सांगावं हा प्रश्न प्रत्येक आईपुढे असतोच.. (how to tell daughter about her first period)

ठळक मुद्दे पाळी आल्यानंतर सुरुवातीला काही मुलींना खूप भीती वाटते, आपल्यासोबत हे काय विचित्र होत आहे, असं वाटून त्या घाबरतात. रडतात.

मासिक पाळी हा प्रत्येक मुलीच्या आणि तिच्या आईच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग. पाळी तिला येणारच, ती काही चुकणार नाही हे आईला माहिती असतं. पण तरीही लेकीला पहिल्यांदा पाळी आली की आधी आईच्याच मनात चुकचुकतं.. कारण ती पाळी येते आणि लेकीचं बालपण भुर्रकन उडवून लावते. अल्लड वाटणारी लेक मग एकदमच समजूतदार, बंधनात राहणारी होऊन जाते. पाळी आल्यानंतर सुरुवातीला काही मुलींना खूप भीती वाटते, आपल्यासोबत हे काय विचित्र होत आहे, असं वाटून त्या घाबरतात. रडतात. अशावेळी आईलाच त्यांना धीर द्यावा लागतो, समजावून सांगावं लागतं. पण ते कसं आणि कोणत्या शब्दांत सांगावं हे कळत नाही (How to speak to your daughter about periods?). म्हणूनच या काही गोष्टी पाहा.. तुमच्या मुलीला पाळीविषयी माहिती देण्यासाठी त्या नक्कीच उपयोगी ठरतील.(how to tell daughter about her first period)

 

मुलींना मासिक पाळीविषयी कधी आणि कशी माहिती द्यावी?

मुलींना मासिक पाळी आल्यानंतर त्याविषयी माहिती देऊन उपयोग नाही. कारण कोणतीही माहिती नसताना असं अचानक काही त्यांच्या बाबतीत झालं तर त्या घाबरून जातात. त्यामुळे तुम्हाला पाळीच्या अनुषंगाने त्यांच्या शरीरात काही बदल होत आहेत, असं जेव्हा जाणवेल, तेव्हा त्यानंतर काही दिवसांनी त्यांना पाळीविषयीची कल्पना देऊन ठेवा.

डाळ- तांदूळ भिजत घालण्याची गरजच नाही, १० मिनिटांत करा कणकेचा कुरकुरीत डोसा- बघा सोपी रेसिपी

तुझ्या शरीरात असे बदल होत आहेत, ते तुला जाणवत आहेत का असं आधी अगदी लाईट मूडमध्ये विचारा... त्यानंतर या बदलानंतर पुढे कशा पद्धतीने मासिक पाळी येऊ शकते, हे सांगा. सॅनिटरी पॅडची ओळख करून द्या. सांगताना तुमच्या चेहऱ्यावर अजिबात कोणतेही गंभीर भाव ठेवू नका. कारण तुमच्या चर्चेतून हे काहीतरी विचित्र आहे, भयंकर आहे असं मुलींना वाटायला नको.

 

जेव्हा मुलींना प्रत्यक्षात पाळी येते तेव्हा पाळीविषयीची संपूर्ण शास्त्रीय माहिती द्या. आता यु ट्यूबवर याबाबतीत माहिती देणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्या व्हिडिओंद्वारे मुलींना माहिती सांगा. पण व्हिडिओमधलं चित्रीकरण खूप भडक तर नाही ना हे तुम्ही आधी तपासून घ्या.

D3, B12 तेव्हाच वाढेल जेव्हा 'हा' पदार्थ खाल, बघा सप्लिमेंट्स घेऊनही D3, B12 कमी का असतं

तुम्हाला पहिल्यांदा पाळी आली तेव्हाचा तुमचा अनुभव सांगा. त्यावेळी तुमची झालेली थोडी फजिती, एखादा गमतीदार किस्सा असंही सांगा. यामुळे त्यांच्या मनातली भीती थोडी कमी होऊन त्या पाळीचा हसतखेळत स्विकार करू शकतील. पाळी आल्यानंतर त्यांच्यावर निश्चितच बंधनं येतात. पण ती नेमकी कोणती हे सगळं त्यांना एकदम सांगू नका. नाहीतर पाळी म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन आणणारं काहीतरी वाईट आहे, असं त्यांना वाटू शकतं.   

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्यलहान मुलंहेल्थ टिप्स