Lokmat Sakhi >Health >Adolescence > सॅनिटरी पॅड्स कसे वापराल ? आरोग्य सांभाळा, फजितीही टाळा!

सॅनिटरी पॅड्स कसे वापराल ? आरोग्य सांभाळा, फजितीही टाळा!

पाळी आली की पॅड्स वापरणं ही फार सामान्य बाब वाटते. पण पॅड्स वापरण्याआधी ते कसे वापरायचे ते आधी समजून घ्यायला हवं. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 06:33 PM2021-03-23T18:33:27+5:302021-03-24T13:27:09+5:30

पाळी आली की पॅड्स वापरणं ही फार सामान्य बाब वाटते. पण पॅड्स वापरण्याआधी ते कसे वापरायचे ते आधी समजून घ्यायला हवं. 

Humilitation can happen if you don't know how to use sanitary pads narikaa ! | सॅनिटरी पॅड्स कसे वापराल ? आरोग्य सांभाळा, फजितीही टाळा!

सॅनिटरी पॅड्स कसे वापराल ? आरोग्य सांभाळा, फजितीही टाळा!

Highlights मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पॅड्स वापरणं हा पर्याय असतोपॅड्स वापरायला सोपे आणि सुरक्षित असतात.पॅड्स वेगवेगळ्या साइजेसमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे होणाऱ्या रक्तस्रावावर पॅडचा साइज निवडता येऊ शकतो.

वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला मासिक पाळी येतेच. प्रजननासाठी मासिक पाळी अत्यावश्यक असते. होणारा रक्तस्त्राव आणि त्यामुळे डाग पडू नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पॅड्स वापरणं हा पर्याय असतो. कारण पॅड्स वापरायला सोपे आणि सुरक्षित असतात. मासिक पाळी आल्यानंतर सुरुवातीला पॅड्स वापरणं कधीही उत्तम. शिवाय पॅड्स वेगवेगळ्या साइजेसमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे होणाऱ्या रक्तस्रावावर पॅडचा साइज निवडता येऊ शकतो.

पॅड कसं वापरलं पाहिजे?
आपल्या चड्डीत किंवा पॅंटीमध्ये पॅड लावताना या गोष्टींचा अवलंब  नक्की  करा.
१) पॅड वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. म्हणजे कुठलेही संसर्ग होणार नाहीत.
२) अनेकदा पॅड्स रॅपरमध्ये बांधलेली असतात. एका बाजूनं रॅपर बंद केलेलं असतं. जरासं ओढलं की रॅपर उघडत आणि पॅड बाहेर काढता येतो. हेच रॅपर वापरून झालेलं पॅड फेकून देण्यासाठीही वापरता येतं. पॅड बदलताना जुनं पॅड या रॅपरमध्ये गुंडाळून मग कचऱ्यात टाकावं.
३) प्रत्येक पॅडच्या मागच्या बाजूला आणि दोन्ही बाजूंना स्ट्रिप्स असतात. या चिकटपट्ट्या काढून पॅड्स पँटीमध्ये बसवायचा आणि बाजूचे विंग्स वाळवून ज्या त्या बाजूने पॅंटीच्या मागच्या बाजूला बसवायचे. म्हणजे पॅड हालत नाही. आपण कितीही हालचाली केल्या तरी पॅडची जागा बदलत नाही.
४) पॅड पॅंटीला लावण्यासाठी पाय एकमेकांपासून लांब करून गुढग्यात वाकावं. आणि वर सांगितल्याप्रमाणे स्टिकर्स काढून पॅड पॅंटीला चिकटवावं.
५) विंग्स बरोबर बसले आहेत ना हे तपासावं. ज्या पॅड्सना विंग्स नसतील ते पॅड्स पॅंटीला घट्ट चिकटवावे. म्हणजे पॅड हलणार नाहीत.
६) पॅड नीट लावल्यानंतर नेहमी घालतो तशी पॅंटी घालावी.
७) पाळीचा रक्तस्त्राव या पॅडमध्ये जमा होईल.


८) पॅड काढताना पहिल्यांदा हलक्या हातानं विंग्स काढावे. त्यानंतर वरच्या बाजूनं पॅडचं टोक पकडावं आणि हलकेच दुसऱ्या बाजूपर्यंत ओढावं आणि काढावं.
९) वापरलेलं पॅड व्यवस्थित फोल्ड करून कागदात गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावं.
१०) चुकूनही टॉयलेटमधे पॅड फ्लश करू नये . कारण गटारीत पॅड्स गेले तर त्यामुळे गटार तुंबू शकते आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.
११) पॅड बदलल्यानंतरही हात ढोपरापर्यंत स्वच्छ धुवावेत.
१२)मासिक पाळीचा फ्लो कमी/जास्त कसाही असो,  दर ४/५ तासांनी पॅड बदललंच पाहिजे. 
१३)कुठल्याही परिस्थितीत ८ तासांपेक्षा जास्त काळ पॅड वापरू नये. ओल्या पॅड्समध्ये विषाणू वाढतात. जर तुम्ही जास्त वेळ एकच पॅड वापरलात तर त्यातून जननेंद्रियांचं इन्फेक्शन्स होऊ शकतं.


विशेष आभार: डॉ. रिना वाणी 
(MD, FRCOG, DNB, DGO, FCPS, DFP, FICOG)
 

Web Title: Humilitation can happen if you don't know how to use sanitary pads narikaa !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.