Join us

Ira khan : इरा खानला आई रिनानं दिलं सेक्स एज्यूकेशनचं पुस्तक; पोस्ट शेअर करत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 17:08 IST

Ira khan : पुन्हा एकदा इरा खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे जी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

ठळक मुद्दे इराने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे सांगितले आहे की ती जेव्हा तारुण्य (puberty) गाठत होती तेव्हा तिची आई रीना दत्ताने तिला सेक्स-एड पुस्तक दिले. अलिकडेच त्यांनी 'अगत्सु फाउंडेशन' लॉन्च केलं आहे. ही संस्था मानसिक आरोग्याबाबतच्या मुद्द्यांवर लोकांची मदत करते. या संस्थेला लॉन्च करत असताना इरानं लोकांना मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केलं.

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते. इरा खानचं नाव अशा लोकांमध्ये येतं जे चित्रपटांपासून दूर असूनही फिल्मी तारकांप्रमाणे लाईमलाईटमध्ये असतात. कधी आपले  आकर्षक फोटो तर कधी बॉयफ्रेंड अशा वेगवेगळ्या कारणांसाठी इरा खान नेहमी चर्चेत असते.  सोशल मीडियावर इराचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि यामुळेच तिच्या पोस्ट व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा इरा खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे जी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

आई रिना दत्तकडून मिळालं होतं सेक्स इज्यूकेशनचं पुस्तक

यावेळी, तिनं पोस्टच्या माध्यमातून तरूणावस्थेच्या सुरूवातीचा एक प्रसंग सांगितला आहे.  आईने तिला स्वत: ला समजण्यास मदत कशी केली हे इराने सांगितले. इन्स्टाग्रावरील कॅप्शनमध्ये ती म्हणते, मी वयात येत होती तेव्हा. इराने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे सांगितले आहे की ती जेव्हा तारुण्य (puberty) गाठत होती तेव्हा तिची आई रीना दत्ताने तिला सेक्स-एड पुस्तक दिले. इराने स्वत: शी संबंधित ही गोष्ट इंस्टाग्राम स्टोरीवर सांगितली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'उत्सुक व्हा'. 

पुढे लिहिलंय की, 'मला वाटत नाही की मी यापूर्वी कधीही स्वत: ला पूर्णपणे आरश्यात पाहिले. मी लहान असताना माझ्या आईने मला लैंगिक शिक्षणावर एक पुस्तक दिले होते आणि असे म्हटलं की मी स्वत: ला व्यवस्थित आरशात पाहावे, परंतु ते मला करता आले नाही.  नंतर साधारणपणे माझ्या शरीरात अनेकदा बदल झाले. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.'

दरम्यान इरानं 'अगत्सु फाउंडेशन' ला टॅग केलं आहे. अलिकडेच त्यांनी 'अगत्सु फाउंडेशन' लॉन्च केलं आहे. ही संस्था मानसिक आरोग्याबाबतच्या मुद्द्यांवर लोकांची मदत करते. या संस्थेला लॉन्च करत असताना इरानं लोकांना मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केलं.

आमिर खानची लाडकी इरा बर्‍याचदा मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर शेअर करते. नुकतंच तिनं आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने 'सेल्फ केअर'च्या सकारात्मक बाबींबद्दल सांगितले. स्वत: ची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, असं ती म्हणाली. इराने  दिलेल्या माहितीनुसार ती अगत्सु फाउंडेशनच्या माध्यमातून ती सेल्फ केअर बाबत  जनजागृती करणार आहे.

इरा खान मानसिक आरोग्यावर मनमोकळेपणाने बोलते आणि त्याबद्दल लोकांना जागरूक करते कारण ती स्वत: देखील नैराश्यातून गेली आहे. वर्क फ्रंटमध्ये इराने अभिनयाऐवजी दिग्दर्शन निवडले आहे आणि काही दिवसात ती थिएटर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.

टॅग्स : इरा खानबॉलिवूडमहिला