Lokmat Sakhi >Health >Adolescence > टीनएजर्सना लैंगिक छळाचा धोका, तो टाळा, सावध व्हा!

टीनएजर्सना लैंगिक छळाचा धोका, तो टाळा, सावध व्हा!

मुलगा असो की मुलगी कुणीही सुरक्षित नाहीये. टिनेजर्सना जाळ्यात पकडण्यासाठी अनेक शिकारी टपलेले असताना मुलामुलींना या सगळ्यापासून वाचवायचं असेल तर जागरूकता आणि आवश्यक उपाययोजनांची आवश्यकता आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 PM2021-04-08T16:22:32+5:302021-04-08T17:18:22+5:30

मुलगा असो की मुलगी कुणीही सुरक्षित नाहीये. टिनेजर्सना जाळ्यात पकडण्यासाठी अनेक शिकारी टपलेले असताना मुलामुलींना या सगळ्यापासून वाचवायचं असेल तर जागरूकता आणि आवश्यक उपाययोजनांची आवश्यकता आहे.

Teenagers can be victims of sexual harassment! What is the solution to avoid this? | टीनएजर्सना लैंगिक छळाचा धोका, तो टाळा, सावध व्हा!

टीनएजर्सना लैंगिक छळाचा धोका, तो टाळा, सावध व्हा!

Highlightsटिनेजर्समध्ये अनेकदा लैंगिकतेबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल बराच गोंधळ असतो. त्यातच अनेक समज गैरसमज लैंगिकतेला चिकटलेले असतात.आवश्यक ते सामंजस्य आलेलं नसतं. त्यामुळे त्यांना घोळात घेणं, त्यांच्यावर जबरदस्ती करणं, त्यांचा गैरफायदा घेणं त्यामानानं सोपं असतं.टिनेजर्समध्ये लैंगिक शिक्षण, जागरूकता निर्माण केली तर लैंगिक छळाचे नकोसे अनुभव सहज टाळता येऊ शकतात.


लैंगिक छळाचा अनुभव आयुष्यात एकदातरी अनेकांनी घेतलेला असतो. लैंगिक छळ ही असामान्य आणि गोष्ट नाहीये. वयात येतानाही असे अनुभव येऊ शकतात. प्रौढ व्यक्तींपेक्षा लैंगिक दडपशाहीचा आणि छळाचा धोका पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना अधिक असतो. अनैसर्गिक लैंगिक संबंधांसाठी टिनेजर्सवर दबाव टाकण्यासारख्या घटनाही झपाट्यानं वाढतायेत ही अतिशय काळजीची गोष्ट आहे. लैंगिक छळ फक्त मुलींचा होतो असं नाही, मुलांनाही लक्ष केलं जातं. मुलगा असो की मुलगी कुणीही सुरक्षित नाहीये. टिनेजर्सना जाळ्यात पकडण्यासाठी अनेक शिकारी टपलेले असताना मुलामुलींना या सगळ्यापासून वाचवायचं असेल तर जागरूकता आणि आवश्यक उपाययोजनांची आवश्यकता आहे. 

पौगंडावस्थेतच लैंगिक छळाच्या केसेस अधिक का?
टिनेजर्समध्ये अनेकदा लैंगिकतेबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल बराच गोंधळ असतो. त्यातच अनेक समज गैरसमज लैंगिकतेला चिकटलेले असतात. लैंगिक संबंधांबद्दलही पुरेशी आणि शास्त्रीय माहित अनेकदा टिनेजर्सकडे नसते. अनेकांचं सगळं ज्ञान ऐकीव माहितीवर अवलंबून असतं. वाढीच्या वयात त्यांच्यापर्यंत पोचणाऱ्या अर्धवट माहितीवरही विश्वास बसतो कारण वयाचा दोष! आवश्यक ते सामंजस्य आलेलं नसतं.  त्यामुळे त्यांना घोळात घेणं, त्यांच्यावर जबरदस्ती करणं, त्यांचा गैरफायदा घेणं त्यामानानं सोपं असतं आणि या सगळ्यातच टिनेजर्स लैंगिक छळाला बळी पडतात.

लैंगिक छळापासून वाचायचं कसं?
- पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक शिक्षण आणि जागरूकता. लिंगभेद आणि लिंग समानता म्हणजे मुलगा मुलगी समान आहेत हे समजावून सांगितलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. एखाद्याच्या रंग, रुपावरुन, शारीरिक आकारावर, आर्थिक, सामाजिक स्तरावरून चेष्टा मस्करी करणं, टोचून बोलणं, त्या व्यक्तीला त्रास होईल असं वागणं, बुल्ली करणं  चूक आहे.
असं वागणं कुठल्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नये.
- एखाद्या वेळी समलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं आणि आपण समलिंगी आहोत असंही वाटायला लागतं. या गोष्टी अनेकदा हार्मोन्समधल्या बदलांमुळे होतात हेही लक्षात घेतलं पाहिजे. अशावेळी त्या व्यक्तीला त्याच्या बदललेल्या वागण्या बोलण्यावरून त्रास देणं, लैंगिक छळ करणं यातून मानसिक ताण निर्माण होतो आणि नैराश्य येऊ शकतं. अशाप्रकारे बुल्ली झालेल्या मुलांना त्यांच्या जवळ असणाऱ्या वडीलधाऱ्यांना किंवा पालकांनी मदत केली पाहिजे. आधार दिला पाहिजे.

- एखाद्याच रंग रूप काय आहे, लैंगिक अग्रक्रम काय आहे, जात धर्म कुठला आहे, यापेक्षाही माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे बघायला लहानपणापासून मुलामुलींना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे लहान वयातच गुड टच, बॅड टच सारख्या संकल्पना समजावून सांगितल्या पाहिजेत. जर एखाद्या मुलाला असा नकोसा अनुभव आलाच आणि मूल याबाबतीत जागरूक असेल तर लगेच मदत मागेल. घाबरून गप्प राहणार नाही. मुलांनाही आपल्याला स्वरक्षण शिकवण्याची गरज आहे आणि ते जागरूकतेमधूनच येतं. शिवाय योग्य मदत मिळाली तर अशा नकोशा अनुभवांमुळे निर्माण होणारा ताण, अस्वस्थता कमी करता येऊ शकते.

निष्कर्ष काय?
लैंगिक गैरफायदा घेऊ बघणाऱ्यांसाठी टिनेजर्स नेहमीच 'सॉफ्ट टार्गेट्स' असतात. टिनेजर्समध्ये लैंगिक शिक्षण, जागरूकता निर्माण केली तर लैंगिक छळाचे नकोसे अनुभव सहज टाळता येऊ शकतात.

तज्ज्ञ मार्गदर्शक : डॉ. सुप्रिया अरवारी

(एमडी, डिजिओ)

Web Title: Teenagers can be victims of sexual harassment! What is the solution to avoid this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.