शरीर व्यवस्थित, सुंदर दिसावं यासाठी नेहमीच महिला ब्रा चा वापर करतात. त्यातही स्तन व्यवस्थित राहावेत निप्पल्स दिसू नये यासाठी पॅडेड ब्रा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. ऑफिसला जाताना, जिमला जाताना किंवा बाहेर फिरायला जाताना कोणत्या आऊटफिटवर कोणती ब्रा चांगली दिसेल याबाबत नेहमीच मुलींच्या डोक्यात कन्फ्यूजन असतं. म्हणून तुमच्या डोक्यातलं कन्फ्यूजन दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारची ब्रा कोणत्या ड्रेसवर वापरायला हवी. तसंच कोणत्या ब्रा शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतात याबाबत सांगणार आहोत. ब्रा चे प्रकार कोणकोणते आहेत?
१) स्पोर्ट्स ब्रा- अशा प्रकारची ब्रा विशेषतः खेळाडू महिलांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. जिम आणि व्यायाम करताना या ब्रा चा करणं फायद्याचं ठरतं.
२) पुशअप्स ब्रा- ही ब्रा तुमच्या फिगरला सुडौल, आकर्षक दाखवण्याचं काम करते. ही ब्रा तुमच्या छातीला वरच्या भागावर उचलून दाखवून क्लीव्हेज दाखवायचं काम करते. ज्या महिलांच्या स्तनांचा आकार लहान आहे त्यांच्यासाठी ही ब्रा उत्कृष्ट आहे.
३) प्लंज ब्रा- ही ब्रा पुशअप ब्रा प्रमाणेच असते. फक्त या ब्रा मध्ये एक कट असतो जेणेकरून तुमचे क्लिव्हेज योग्य प्रकारे दिसू शकतील. ही ब्रा जास्तवेळा कट ड्रेस असल्यास वापरली जाते.
४) स्टिक ऑन ब्रा- याच्या नावाप्रमाणेच या ब्रा चा वापर आहे. ज्या महिलांचे स्तन आकारानं लहान आहेत त्यांनी ही ब्रा वापरावी. दोन कप असणारी ही ब्रा स्तनांना चिकटवून वापरता येते.
५) फूल कप ब्रा- अशा ब्रा तुमच्या छातीला पूर्ण कव्हरेज देते. मोठे स्तन असणाऱ्या महिलांसाठी ही ब्रा अप्रतिम पर्याय आहे. ही ब्रा जास्त सपोर्टिव्ह आहे. यामुळे कोणतेही कपडे घातल्यानंतर स्तन जास्त बेढब दिसत नाहीत.
६) नर्सिंग ब्रा- स्तपान करत असलेल्या महिलांसाठी अशा प्रकारची ब्रा तयार करण्यात आली आहे. या ब्रा मध्ये फ्लॅप अथवा ओपनिंग लेसदेखील असते जी स्तनपान करणाऱ्या आईसाठी अतिशय सोयीस्कर असते. याचं कापड अगदी सॉफ्ट असतं. जेणेकरून स्तनांच्या आकारामध्ये येणाऱ्या बदलावर याच्यामुळे कोणत्याही अयोग्य परिणाम होऊ नये.
७) बँडो ब्रा - ज्या महिलांची छाती थोडी जड असते त्या महिलांसाठी ही ब्रा बनवण्यात आली आहे. ही ब्रा बाजारामध्ये पॅडेड अथवा नॉन पॅडेड या दोन्ही स्वरूपात मिळते. शक्यतो या ब्रा ला वर कोणतेही स्ट्रिप किंवा लेस नसते.
८) बालकोनेट ब्रा- बालकोनेट ब्रा तुमच्या स्तनांना पूर्ण कव्हर करत नाही तर तुमच्या स्तनांना वरच्या बाजूला लिफ्ट करते, त्यामुळे तुमचे स्तन थोडे वर, उभारलेले आणि सेक्सी दिसतात.
९) बिल्ट-इन ब्रा- ही ब्रा सिंगल ब्रा प्रमाणे नसते. तर या ब्रा चे कप बनियन अथवा स्पगेटीवर लावलेले असतात. आजकाल जास्त महिला अशी ब्रा टॉपच्या आत घालणं पसतं करतात. विशेष म्हणजे तुम्ही टिशर्ट, कुर्ती, शर्ट्स कशावरही अशी ब्रा घालू शकता.
१०) कन्व्हर्टिबल ब्रा- कन्व्हर्टिबल ब्रा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. या ब्रा चे स्ट्रिप्स काढता येतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पारदर्शक, लेसवाल्या स्ट्रेप्स लाऊनदेखील या ब्रा वापरू शकता.
रात्रीची ब्रा का घालू नये?
खाज आणि पुरळ
ब्रा चा कपडा, त्याचे इलॅस्टिक त्वचेवर वारंवार घासल्या जाते. यामुळे त्या भागात खाज येऊ शकते. वारंवार घाम येऊन पुरळी येऊ शकतात आणि त्या भागाला कधीच मोकळी हवा मिळत नसल्याने बुरशीप्रमाणे पांढरट आवरणही तयार होऊ शकते.
अपुरी झोप आणि अस्वस्थता
रात्री झोप पुर्ण होत नाही, मनावर दडपण येते अशा समस्या जाणवत असतील, तर रात्री झोपताना अवश्य ब्रा काढून झोपा. कारण ब्रा चा घट्टपणा हे देखील या समस्येमागचे एक कारण असून शकते. ब्रा चे अतिटाईट असणे जाणवत नसले तरी शरीरावर आणि मनावर परिणाम करत असते.
गाठी होण्याची भीती
टाईट ब्रा जर २४ तास घालून ठेवली तर स्तन आवळल्यासारखे होतात. यामुळे त्या भागात रक्तपुरवठा सुरळीतपणे होण्यास अडथळा निर्माण होतो. रक्तपुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास आतल्या आत रक्त साकाळून गाठी होण्याची शक्यता असते. कालांतराने या गाठी कॅन्सरस ट्युमरमध्येही रूपांतरीत होऊ शकतात.
त्वचेचे विकार होऊ शकतात
ब्रेसिअर हे अतिशय घट्ट असल्याने त्याचे इलॅस्टिक छातीवर, पाठीवर काचू शकते. वर्षानुवर्षे असेच चालू राहिले तर त्यातून त्या भागात त्वचा विकारही उद्भवू शकतात.