Lokmat Sakhi >Health >Adolescence > कोरोनाकाळात मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काय कराल? वाढत्या वयाच्या मुलांसाठी ही पथ्यं..

कोरोनाकाळात मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काय कराल? वाढत्या वयाच्या मुलांसाठी ही पथ्यं..

रोगप्रतिकारकशक्ती ही कोरोनाविरुध्द लढण्याची सगळ्यात मोठी ताकद. ती वाढवणं हाच त्याच्यासाठीचा मुख्य नियम. हा नियम जसा मोठ्यांना लागू पडतो तसाच तो लहान मुलांसाठीही महत्त्वाचा आहे. रोगप्रतिकारकशक्ती म्हटलं की आधी गोळ्या-औषधं, सप्लिमेण्टसच डोळ्यासमोर येतात. पण लहान मुलांची, वयात येणार्‍या मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे इतर महत्त्वाचे मार्ग आहेत. ते कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 05:42 PM2021-07-02T17:42:49+5:302021-07-02T17:53:30+5:30

रोगप्रतिकारकशक्ती ही कोरोनाविरुध्द लढण्याची सगळ्यात मोठी ताकद. ती वाढवणं हाच त्याच्यासाठीचा मुख्य नियम. हा नियम जसा मोठ्यांना लागू पडतो तसाच तो लहान मुलांसाठीही महत्त्वाचा आहे. रोगप्रतिकारकशक्ती म्हटलं की आधी गोळ्या-औषधं, सप्लिमेण्टसच डोळ्यासमोर येतात. पण लहान मुलांची, वयात येणार्‍या मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे इतर महत्त्वाचे मार्ग आहेत. ते कोणते?

What do you do to boost children's immunity during the corona period? Here are some suggestions | कोरोनाकाळात मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काय कराल? वाढत्या वयाच्या मुलांसाठी ही पथ्यं..

कोरोनाकाळात मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून काय कराल? वाढत्या वयाच्या मुलांसाठी ही पथ्यं..

Highlightsक, ड, अ, इ ही जीवनसत्त्वं आणि झिंक हे घटक रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाचे आहेत. या घटकांचा समावेश मुलांच्या आहारात असायलाच हवा.जीवनसत्त्वं आणि खनिजांच्या सप्लिमेण्टसच्या अतिरेकाचा मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.मुलांसाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. एरोबिक्स, जॉगिंग, सायकलिंग, योग हा कोणत्याही प्रकारचा व्यायाम मुलांसाठी आवश्यक आहे.

 
 कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेलीही नाही तोच तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आणि ही तिसरी लाट 18 वर्षाखालील मुलांसाठी विशेष घातक मानली जात आहे. सर्वच आईबाबा मनातून घाबरलेले आणि गोंधळलेले आहेत. कोरोनाच्या धोक्यापासून आपल्या लेकरांना वाचवायचं तर काय करायला हवं याची जिथून मिळेल तिथून माहिती घेत आहे. रोगप्रतिकारकशक्ती ही कोरोनाविरुध्द लढण्याची सगळ्यात मोठी ताकद. ती वाढवणं हाच त्याच्यासाठीचा मुख्य नियम. हा नियम जसा मोठ्यांना लागू पडतो तसाच तो लहान मुलांसाठीही महत्त्वाचा आहे.

रोगप्रतिकार शक्ती म्हटलं की आधी गोळ्या-औषधं, सप्लिमेण्टसच डोळ्यासमोर येतात. पण लहान मुलांची, वयात येणार्‍या मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे आहार हाच आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाचे असलेले क, ड, अ, इ ही जीवनसत्त्वं आणि झिंक हे घटक महत्त्वाचे आहेत. या घटकांचा समावेश आहारात केल्यास त्याने नैसर्गिकरित्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

आहारातून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी

 आवळा

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याला खूप महत्त्व आहे. मोठे आवळा आवर्जून खातात पण मुलं आंबट विशेषत: तुरट चवीचा आवळा खाण्यास नकार देतात. मुलं आवळा तसा खात नसतील तर आवळ्याचा मुरब्बा, आवळा कॅण्डी, आवळ्याचा ज्ॉम या स्वरुपात तो खाण्यास दिला तरी आवळ्यातील गुणधर्म मुलांच्या पोटात जातात. आवळ्यात क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याच्या सेवनामुळे शरीराला आतून ताकद मिळते.

केशर-हळद दूध

हळद दुधाचा मुलांच्या आहारात समावेश करणं ही आज मोठी गरज अहे. हळद दुधात एक चिमूट केशर आणि थोडं मध घालून मुलांना रोज प्यायला दिल्यास त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

कसदार आहार

प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं यांचा समावेश असलेला संतुलित आहार पौष्टिक असतो. हा आहार मुलांचं विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करतो. आंबट चवीची फळं, हिरव्या पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या, हंगामी ताजी फळं, घरी लावलेलं दही, लसूण, आलं या घटकांचा मुलांच्या आहारात आवर्जून समावेश करावा. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतो.
 

च्यवनप्राश
च्यवनप्राश हे प्रामुख्याने हिवाळ्यातच मुलांना दिलं जातं. पण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात च्यवनप्राश फार महत्त्वाचा आहे. च्यवनप्राशमुळे जिवाणू, विषाणू वा बुरशीजन्य आजारांचा धोका टळतो. च्यवनप्राश नियमित खाल्ल्यानं पचनशक्ती चांगली होते. बध्दकोष्ठता आणि पोटाचे इतर विकार होत नाही.

सप्लिमेण्टस टाळा

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी क, ड, इ ही जीवनसत्त्वं आणि झिंक हे घटक महत्त्वाचे असतात. हे वाढवण्यासाठी सध्या सरळ सप्लिमेण्टस घेण्याला महत्त्व दिलं जात आहे. मुलांना जीवनसत्त्वं आणि खनिजांचे सप्लिमेण्टस दिले म्हणजे आपली मुलं सुरक्षित होतील असा अनेक पालकांचा समज असतो . पण हा वेळीच दूर करुन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य मार्गांचा अवलंब करणं गरजेचं आहे. विशेषत: झिंक हा घटक सप्लिमेण्टसच्या स्वरुपात दिला जातोय. पण त्याचं अतिप्रमाणात सेवन मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतं. झिंक सप्लिमेण्टसच्या अति सेवनाचा मज्जातंतूवर परिणाम होतो, मुलांना अँनेमिया होतो, त्यांच्या शरीरात तांबं या खनिजाची कमतरता निर्माण होते. झिंक हे अन्नातूनही मिळतं. डांगराच्या बिया, तीळ, जवस, या बियांतून, बदाम, काजू सारखा सुकामेवा, दूध, चीज, गहू, तांदूळ, ओटस या धान्यातून, बटाटा, रताळं, शेंगवर्गीय भाज्या, डार्क चॉकलेट यातून झिंक चांगल्या प्रमाणात मिळतं. त्याचं सेवन मुलांसाठी हितकारक आहे.
 

 

क जीवनसत्त्व सप्लिमेण्टसचा अतिरेकही घातक

रोगप्रतिकार शक्तीसाठी क जीवनसत्त्वं महत्त्वाचं असतं. त्यामुळे क जीवनसत्त्वाच्या गोळ्या मुलांना दिल्या जातात . पण त्याच्या अतिरेकाचे दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतात. क जीवनसत्त्व सप्लिमेण्ट्सच्या अतिरेकी सेवनानं मुलांमध्ये अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो, मुलांना अकाली संधिवात होवू शकतो, तोंडाचा अल्सर आणि स्नायुंमधे वेदना हे परिणाम जाणवतात.
 

वाढत्या वयातील मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी

* पौष्टिक आणि समतोल आहारावर भर द्या
* मुलांना घरी शिजवलेलं अन्न द्या
*  मुलांसाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. एरोबिक्स, जॉगिंग, सायकलिंग, योग हा कोणत्याही प्रकारचा व्यायाम मुलांसाठी आवश्यक आहे.
* मुलांनी किमान आठ तास झोप घेणं आवश्यक आहे.
*  मुलं पाणी पिण्याचा कंटाळा करतात. पण रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मुलांनी पुरेसं पाणी प्यायला हवं.
* मुलांना घरी, बाहेर प्रदूषित घटकांपासून दूर ठेवायला हवं.
* घरात पुरेशी खेळती हवा हवी.
*  मुलांना आनंदी वातावरण द्या.

Web Title: What do you do to boost children's immunity during the corona period? Here are some suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.