भाग्यश्री कांबळे
वयात येणाऱ्या मुलींच्या शरीरामध्ये अनेक बदल घडतात (Bra). बदल घडत असताना सर्वात आधी आई ब्रा कशी वापरायची याचे धडे देते. ब्रेसियर ही एक प्रकारे महिलांची सखी असते (Women). कायम आपल्याबरोबर अगदी आपल्याजवळ. आपलं शरीर सुडौल आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी ब्रा वापरणं अतिशय गरजेचं आहे. ८ ते १२ वयोगटापर्यंत आपण क्रॉप टॉप ब्रा परिधान करतो. पण जस जसं वय वाढतं, तस तसं स्तनाच्या आकारामध्ये देखील वाढ होते. सोळाव्या वर्षीपर्यंत स्तनाचा आकार वाढतो. त्यामुळे मुलींमध्ये असा संभ्रम निर्माण होतो की, या वयात कोणती ब्रा घालणं योग्य?
बाजारात बऱ्याच प्रकारचे ब्रेसियर मिळतात, आपल्या स्तनाच्या आकारानुसार योग्य कोणती? मुलींनी साइज कशी निवडायची? या व अशा प्रश्नांची उत्तरं स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ शिल्पा चिटणीस जोशी यांनी लोकमत सखीशी बोलताना दिले आहे(Which bra type is best for everyday use for 16-19 year old girl).
स्तनाचा आकार केव्हा वाढतो?
महिलांची ब्रेस्ट साईन ३ टप्प्यांमध्ये वाढते. पहिली जेव्हा ब्रेस्टच्या टिश्यूमध्ये असलेली कॅपस्युल ब्रेक होते. दुसरी जेव्हा मुलगी वयात येते, सेक्शुअल अॅक्टिव्हिटी घडतात. पण प्रत्येक मुलीची सेक्शुअल अॅक्टिव्हिटी दरम्यान, ब्रेस्ट साईज वाढेल असे नाही. आणि तिसरी प्रेग्नन्सीमध्ये वाढ होते. याव्यतिरिक्त वजन वाढल्यावर सतनाचा आकार वाढू शकतो.
मुलींनी कितव्या वर्षी ब्रा वापरायला सुरुवात करावी? वयात येणाऱ्या मुलींसाठी योग्य ब्रा कशी निवडायची?
१६ ते १८ वयातल्या मुलींसाठी कोणती ब्रा योग्य?
बाजारात विविध प्रकारचे ॲडल्ट ब्रा मिळतात. जे १६ ते १८ वयोगटातील मुलींसाठी योग्य असते. प्रत्येक मुलगी आपल्या अंगकाठीनुसार ब्राची निवड करते. लाईटली असो किंवा हेविली ब्रा. पॅडेड असो किंवा अंडरवायर ब्रा. मुली किंवा महिला ज्यात कमफर्टेबल राहतील, अशा ब्राची निवड करावी. मुख्य म्हणजे ब्रा अशी निवडा, जी ब्रेस्टला सपोर्ट देईल.
मुलींनी ब्रा खरेदी करताना साइज कशी निवडायची?
ब्रेसियर खरेदी करताना कप साईजवर लक्ष द्या. नंतर ब्रेस्टच्या खालील बॅण्ड साईज पहावी. उदारणार्थ, एकीची साईज ३४ C असेल. तर ३४ ही बॅण्ड साईज असते. तर, C ही कप साईज असते. कप साईजमध्ये A,B,C,D हे प्रकार असतात. त्याप्रमाणे ब्रा खरेदी करावी. शिवाय फॅब्रिक सिंथेटिक नसून, कॉटन किंवा होजिअरी मटेरियलच्या ब्रा खरेदी करा.
ॲडल्ट ब्रा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
विशीतच वजन वाढले-हाडांचीही समस्या छळते? 'या' तेलात शिजवा अन्न; पन्नाशीतही राहाल फिट
ॲडल्ट ब्रा खरेदी करताना साईज पहावी. ट्रायल करून आपण त्यात कमफर्टेबल आहोत की नाही, हे चेक करावे. शिवाय बाजारात विविध प्रकारकचे ॲडल्ट ब्रा उपलब्ध आहेत, ऋतूनुसार आपण परिधान करत असलेल्या कपड्यानुसार खरेदी करावी. आपण हेल्दी असाल तर, सपोर्टिव्ह ब्रा खरेदी करावी.
एकच ब्रा दोन दिवस घालू नये
एकच ब्रा दोन दिवस घालू नये. दोन दिवस घातल्यावर शरीरावर साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. ब्रा कायम नियमित स्वरुपात साफ करणे अत्यंत गरजेचे आहे. एकच ब्रा दोन ते तीन दिवस घातल्यावर इन्फेक्शन होण्याची किंवा छातीला दुखापत होण्याची दाट शक्यता असते. शिवाय उन्हाळ्यात स्तनाखाली पावडर लावा. यामुळे ब्रेस्टखाली अधिक वेळ घाम जमा होणार नाही.