Lokmat Sakhi >Health > दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन

दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन

दिवाळीत जास्त खाणं झाल्यानं वजन वाढलं तर काय याचं अनेकांना टेंशन येतं, त्यावर खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 01:42 PM2022-10-22T13:42:26+5:302022-10-22T13:45:23+5:30

दिवाळीत जास्त खाणं झाल्यानं वजन वाढलं तर काय याचं अनेकांना टेंशन येतं, त्यावर खास उपाय

Afraid of Diwali weight gain, A glass of hot water is a simple solution | दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन

दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन

दिवाळीत खूप गोड खाल्लं की वजन वाढतंच अशी अनेकांना भीती वाटते. त्यात खाणंही जास्त होतं. यासगळ्यात डायटला खंड तर पडतोच. परंतु, दिवाळीत मस्त चांगलंचुंगलं खाल्लं नाही तर मग मजा काय दिवाळीची. मात्र तरीही दिवाळीत गोड खाऊन वजन वाढू नये म्हणून एक खास उपाय करा. जेणेकरून मिठाई खाल्ली तरी झपाट्याने वजन वाढणार नाही. 

एक ग्लास गरम पाणी आहे रामबाण उपाय

गोड किंवा तेलकट खाल्ल्यानंतर फक्त एक ग्लास कोमट पाणी प्या. कोमट किंवा जरासं गरम पाणी जेवताना आणि मध्येमध्ये देखील पीत राहा. गरम पाणी प्यायल्याने वजन वाढणार नाही आणि तेलकट अन्न पचायला सोपे जाईल. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी गरम पाणी प्यावे. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते आणि शरीरावर साठलेली चरबीही कमी होते.

गरम पाणी कसे प्यावे?

जेंव्हा तुम्ही काही तेलकट किंवा गोड पदार्थ खाल, त्यानंतर १ ग्लास गरम पाणी प्या. खाल्ल्यानंतर साधारणतः १० ते १५ मिनिटांनी पाणी प्यायचे. त्यामुळे अन्न पचायला सोपे जाते आणि वजन वाढत नाही. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

Web Title: Afraid of Diwali weight gain, A glass of hot water is a simple solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.