आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे महिलांना कंबरदुखीच्या त्रासचा सामना करावा लागतो. घरकाम असो किंवा वर्क होममुळे तासनतास एकाच जागी बसल्यानं आराम न मिळाल्यानं कंबरदुखीची समस्या वाढच जाते. शरीरातील विविध भागांना रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर असा त्रास होऊ शकतो. त्यासाठी शरीरात पुरेश्या प्रमाात हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे.
खूप थकवा येणं, पाठ दुखणं हा रक्तातील लोह कमी असल्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. तसेच सतत थकवाही जाणवत राहातो. जर सतत थकल्यासारखं वाटत असेल आणि पूरेसा आराम करुनही थकवा जात नसेल तर मग आपल्याला रक्त तपासून घेण्याची गरज आहे हे जाणून घ्यावं. खासकरून महिलांना या समस्येचा सामना पुष्कळवेळा करावा लागतो. खेळताना जखम होणे, जॉइंट्सवर सतत प्रेशर पडणे किंवा फार जास्तवेळ एकाच पद्धतीने बसणे यामुळे हे होतं. काही बाबतील पाठिच्या मणक्यासंबंधित समस्याही निर्माण होऊ शकते.
कंबर का दुखते?
आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये २६ हाडांचा समूह असतो. ही हाडे एका सॉफ्ट डिस्कच्या मदतीने एकमेकांशी जोडलेली असतात. या डिस्कमध्ये मुलायम द्रव्यपदार्थ असल्याने हाडांची हालचाल शक्य होते. पण वाढतं वय, आनुवांशिक आजार किंवा अपघातांनंतर या डिस्कच्या हालचालीमध्ये अडचण येते. डिस्कचा ओलावा हळूहळू कमी होऊ लागतो आणि रक्तप्रवाह सुद्धा कमी होतो.
या कारणाने डिस्क स्वत:ला रिपेअर करुन शकत नाही. त्यामुळे कंबरदुखी आणि सूज येण्याची समस्या होते. अशात यावर उपाय म्हणून पेन किलर, स्टीरॉइड इंजेक्शन आणि फिजिओथेरपीची मदत घेतली जाते. तर फार जास्त त्रास असेल तर सर्जरी केली जाते. पण आता स्टेम सेलच्या माध्यमातून यावर उपाय करणे सहज शक्य होऊ शकतं.
उपाय
एका जागी खूप वेळ ताठ बसू नका
जास्त वेळ ताठ बसल्याने पाठीच्या कण्यावर जोर येऊन पाठीच्या समस्या जास्त उद्भवू शकता. सतत पाठ ताठ ठेवल्याने स्नायूंवर जोर येतो त्यामुळे हाडांची लवचिकता कमी होते.
वजन खूप कमी करू नका
वजन कमी असणाऱ्या व्यक्तींना पाठदुखीचा जास्त त्रास होतो. तसंच पाठीला बाक येण्याची देखील शक्यता असते. पाठीला बाक आल्याने चाळीशीनंतर वाकताना, चालताना व बसताना त्रास होतो.
जास्त जड सामान उचलू नका
जड सामानामुळे पाठीवर सर्वात जास्त वजन येऊन पाठ दुखू लागते. तसंच वद्ध व्यक्तींनी अवजड वस्तू उचलल्यास पाठीचं हाड मोडण्याचीदेखील शक्यता असते.
झोपण्याची स्थिती
झोपेत असताना आपली उशी व पाठ यांमध्ये पोकळी निर्माण झाल्याने पाठीचे आजार उद्भवतात. तसंच जास्त झोप नेहमीच शरीरासाठी हानिकारक असल्याने झोपत असताना जर उशी घेत असाल तर तुम्ही पाठीच्या दुखणींना निमंत्रण देत आहात असं समजा.
धुम्रपान टाळा
धुम्रपान केल्याने पाठीतील हाडांतील कॅल्शियम कमी होऊन त्यांची झीज होते. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींपेंक्षा न करणाऱ्या व्यक्तींची हाडं ही मजबूत असतात.
वजन नियंत्रणात ठेवा
वजनदार व्यक्तींना पाठदुखीचा त्रास हा उतार वयात होतो. खूप जास्त प्रमाणात वजन वाढल्याने पाठीच्या स्नायुजवळ काही काळानंतर दुखू लागते.
स्वतःला हेल्दी लाइफस्टाइलसाठी त्यांना प्रोत्साहित करा. सतत एकाचजागी बसून राहू नका. कंबरदुखी जास्त असेल तर व्यायाम करणं टाळावं. डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरिपी, व्यायाम अथवा मसाज करुन घ्यावा. कंबर दुखत असतांना कंबर, पोटांच्या खालील अवयवांचा व्यायाम करावा. व्यायाम न केल्याने कंबरेचे स्नायू कमकुवत होतात. पोहणे, सायकल चालवणे, फिरणे हे कंबरेसाठी उत्तम व्यायाम आहेत. याशिवाय आठवड्यातून एकदा मसाज करून घ्या.