Lokmat Sakhi >Health >Anemia > उन्हापासून व्हिटॅमिन डी मिळवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला!

उन्हापासून व्हिटॅमिन डी मिळवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला!

Vitamin D : उन्हाच्या माध्यमातून हे व्हिटॅमिन तुम्ही मिळवू शकता. याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2024 10:32 AM2024-12-03T10:32:18+5:302024-12-03T10:35:24+5:30

Vitamin D : उन्हाच्या माध्यमातून हे व्हिटॅमिन तुम्ही मिळवू शकता. याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते.

Best time to get vitamin d from the sun | उन्हापासून व्हिटॅमिन डी मिळवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला!

उन्हापासून व्हिटॅमिन डी मिळवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला!

Vitamin D : शरीराचं काम सुरळीत होण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची गरज असते. यातीलच एक महत्वाचं व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन डी. हे व्हिटॅमिन वेगवेगळ्या पदार्थांमधून मिळतं. पण याचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरणे असतात. उन्हाच्या माध्यमातून हे व्हिटॅमिन तुम्ही मिळवू शकता. याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच ऊन कमी घेतल्याने सेराटोनिन हार्मोन लेव्हल कमी होते. ज्यामुळे तणाव आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.

उन्हामुळे रक्तात फॉस्फरस आणि कॅल्शिअम रेग्युलेट होण्यास मदत मिळते. जे हाडं आणि रक्तासाठी महत्त्वाचे असतात. हिवाळ्यात तर लोकांना ऊन अंगावर घेणं इतकं आवडतं की, तासन् तास ते उन्हात बसून राहतात. मात्र, उन्हाद्वारे जरी व्हिटॅमिन डी मिळत असेल तरी टॅनिंगचा धोकाही असतो. इतकंच नाही तर उन्हात जास्त वेळ राहिल्याने त्वचेवर सुरकुत्या, काळे डाग येण्याचा धोकाही असतो. अशात तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की, उन्हात कोणत्या वेळी आणि किती वेळ बसावं. जेणेकरून वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाल्यावर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, ऑस्टियोपोरोसिस, कॅन्सर, डिप्रेशन, मसल्स वीकनेससहीत अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा शरीरात व्हिटॅमिन डी संतुलित प्रमाणात असणं गरजेचं असतं.

उन्हात बसण्याची योग्य वेळ

एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत उन्हात बसणे सगळ्यात चांगलं असतं. असं केल्याने शरीराला आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळतं. मात्र, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ ही वेळ सगळ्यात फायदेशीर असते. हाडांच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी दुपारी उन्हात बसणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं.

उन्हात किती वेळ बसावं?

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हात जास्तीत जास्त २० ते ३० मिनिटे इतकाच वेळ बसावं किंवा फिरावं. हार्ड स्कीन असलेल्या लोकांनी यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसावं. ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसू नये कारण याने त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

Web Title: Best time to get vitamin d from the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.