आपल्या शरीरात काही बदल झाले की आपल्याला त्याचे पूर्वसंकेत मिळू लागतात. (Iron deficiency symptoms) व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या खनिजांपैकी एक आहे. जे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते.(Signs of low iron levels) शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागली की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, त्वचेच्या रंगात बदल होण्यापासून ते मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो. (Early signs of anemia)
लोहाच्या कमतरतेमुळे शरीर आतून पोकळ होते. उठण्या-बसण्याचा देखील त्राण आपल्यात राहात नाही.(Fatigue iron deficiency) आपल्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्याला सतत थकल्यासारखे वाटणे किंवा चक्कर येणे.(Iron deficiency in women) श्वास घेण्यास अडचणी, त्वचेचा रंग बदलणे यांसारखी लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. हा फक्त ताण नसून लोहाच्या कमतरेती लक्षणे आहेत. जाणून घेऊया लोहाच्या कमतरतेची आणखी पाच लक्षणे कोणती?
प्लास्टिकची खुर्ची, दाराला हात लावताच झटकन शॉक बसतो तुम्हाला? करंट लागण्याचं पाहा कारण..
1. सतत थकवा येणे
जर आपल्याला सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल. थोडे काम केल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होत असेल तर ते लोहाच्या कमरतेमुळे असू शकते. लोहाची कमतरता झाल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवता येत नाही, ज्यामुळे लवकर थकवा येतो.
2. ओठांचा रंग बदलतो
रक्ताच्या कमरतेमुळे शरीराच्या अनेक भागात बदल होतात. त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. आपली त्वचा, ओठ किंवा डोळ्यांखालील भाग पिवळा किंवा पांढरा पडू लागतो. तसेच यामुळे चेहऱ्यावर असलेली चमक देखील कमी होते.
बाथरुममध्ये चुकूनही ठेवू नका ५ गोष्टी, तब्येत सतत बिघडेल आणि डॉक्टरांकडे चकरा मारुन वैतागाल!
3. चक्कर येणे
शरीराला योग्य प्रमाणात लोह किंवा रक्तपुरवठा मिळाला नाही तर चक्कर येते. यामध्ये मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. सतत डोके दुखणे, चक्कर येणे किंवा डोके जड होणे यांसारख्या समस्या येतात.
4. श्वास घेण्यास अडचण
शारीरिक क्रियाकल्प वाढल्यास आपल्याला त्रास होऊ लागतो, हे देखील शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होते. अचानक हृदय जोरात धडधडणे, चालतना किंवा पायऱ्या चढताना त्रास होणे. शरीराला पुरेशा ऑक्सिजन मिळाला नाही की, असे होते.
5. केसगळती
लोहाच्या कमरतेचा आपल्या केसांवर आणि नखांवर देखील परिणाम होतो. ज्यामुळे केसगळती, नखांवर पांढरे किंवा पिवळे डाग येणे. नख सतत तुटणे किंवा नखे पातळ होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.