Lokmat Sakhi >Health >Anemia > Research: आपल्या शरीरात प्रोटिनची कमतरता आहे, हेच माहिती नाही? कोरोना आणि प्रोटीनयुक्त आहाराचा थेट संबंध!

Research: आपल्या शरीरात प्रोटिनची कमतरता आहे, हेच माहिती नाही? कोरोना आणि प्रोटीनयुक्त आहाराचा थेट संबंध!

प्रोटिन्सची गरज आणि प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे उद्भवू शकणारे आजार याविषयी आपण भारतीय लोक खूपच कमी जागरूक असून नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार ७३ टक्के भारतीयांमध्ये प्रोटिन्सची कमतरता आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करायचा असेल, तर प्रोटिनयुक्त पदार्थ खाल्लेच पाहिजे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 01:37 PM2021-07-27T13:37:19+5:302021-07-27T13:39:11+5:30

प्रोटिन्सची गरज आणि प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे उद्भवू शकणारे आजार याविषयी आपण भारतीय लोक खूपच कमी जागरूक असून नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार ७३ टक्के भारतीयांमध्ये प्रोटिन्सची कमतरता आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करायचा असेल, तर प्रोटिनयुक्त पदार्थ खाल्लेच पाहिजे.

To fight against corona, we need a protein rich diet, protein difficiency creates health issue | Research: आपल्या शरीरात प्रोटिनची कमतरता आहे, हेच माहिती नाही? कोरोना आणि प्रोटीनयुक्त आहाराचा थेट संबंध!

Research: आपल्या शरीरात प्रोटिनची कमतरता आहे, हेच माहिती नाही? कोरोना आणि प्रोटीनयुक्त आहाराचा थेट संबंध!

दरवर्षी २४ ते ३० जुलै या काळात protein week म्हणजेच प्रोटीन सप्ताह साजरा केला जातो. या अनुशंगाने देशातील १६ शहरांमध्ये एक सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य भारतीयांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असल्याचे दिसून आले. ज्या लोकांमध्ये प्रोटीन्सची कमतरता आहे,  अशा लोकांमध्ये  महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही सर्व्हेक्षणाच्या अहवालात सांगितले आहे. एखाद्या इमारतीच्या बांधकामासाठी जशी विटांची गरज असते, तसेच शरीरासाठी प्रोटिन्सची गरज आहे. त्यामुळेच प्रोटिन्सला blocks of life असे म्हटले जाते. 

 

इंडियन काऊंन्सलिंग ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामते प्रत्येकाला दररोज कमीतकमी ४८ ग्राम प्रोटिन्सची  गरज असते. मात्र भारतीय लोक यापेक्षा खूपच कमी प्रमाणात प्रोटीन्स घेतात. एखाद्या व्यक्तीचे वजन जेवढे असेल, तेवढे ग्रॅम प्रोटिन्स दररोज शरीरात जाणे गरजेचे आहे. शारीरिक विकासासाठी प्रोटीन्स अतिशय आवश्यक आहे.

भारतीयांमध्ये प्रथिनांची कमतरता का?
- भारतीय लोकांच्या आहारात फॅट्स आणि स्टार्च यांचे प्रमाण सर्वाधिक असते.
- शाकाहारातून प्रोटीन्सचा योग्य पुरवठा होत नाही. त्यामुळे सर्व्हेक्षणानुसार ९१ टक्के शाकाहारी लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता दिसून येते.


- आहाराविषयी भारतीयांमध्ये पुरेशा प्रमाणात जागरूकता नाही.
- बदलत्या जीवनशैलीमुळे संतुलित आहाराचे प्रमाण दिवसेंदिवस खूप कमी होत चालले आहे.
- भारतीय आहारात गहू आणि तांदूळ यांचे प्रमाण अधिक आणि डाळींचे प्रमाण कमी असते.

प्रथिनांची कमतरता असल्यास उद्भवणारे आजार
- हाडे ठिसूळ होणे.
- प्रतिकारशक्ती कमी होणे.
- निद्रानाश.
- शारीरिक उर्जेची कमतरता भासणे.


- केस गळणे आणि नखे तुटणे.
- थकवा येणे.
- मूड सतत बदलत राहणे आणि चीडचीड वाढणे.
- स्नायूंमध्ये थकवा जाणवणे.
- कुपोषण होणे.
- मुत्रपिंड खराब होणे.

 

कोणते पदार्थ खावेत?
- शाकाहारी लोकांनी डाळींचे सेवन अधिक प्रमाणात केले पाहिजे.
- यासोबतच बदाम, शेंगदाण्याचे बटर, मासे, अंडी, चिकन, दही, डाळी, कडधान्ये आणि हरबरा या पदार्थांच्या सेवनातून प्रोटिन्स मिळते. 
 

Web Title: To fight against corona, we need a protein rich diet, protein difficiency creates health issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.