असं म्हटलं जातं की आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल तर निरोगी राहणंही तितकंच महत्वाचं आहे. वाढत्या वयात शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवायला सुरूवात होते. अशा स्थितीत या कमतरतांकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही. (Iron deficiency anemia) असाच एक पोषक घटक म्हणजे लोह. शरीरात लोहाची कमतरता खूप सामान्य आहे आणि विशेषत: ज्या महिला गर्भवती आहेत किंवा मासिक पाळी येत आहेत किंवा ज्या रजोनिवृत्तीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात जाणवते. (Food for iron deficiency anemia)
लोहाच्या कमतरतेची काही लक्षणे आहेत जी तुम्हाला जाणवू शकतात. जसे की थकवा, अनियमित मासिक पाळी येणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे, चक्कर येणे, थंड हात आणि पाय इ. (Iron deficiency anemia symptoms) खरं तर, बाजारात अशी अनेक पूरकउत्पादने आहेत जी लोहाची कमतरता भरून काढू शकतात. पण तुम्हाला काही खाद्यपदार्थ निवडायचे असतील. तर या खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते.
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर त्यात असलेल्या आयर्नमुळे अॅनिमियामध्येही हे फायदेशीर मानले जाते. तुम्ही आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता, जसे की लोणचे, कँडी, पावडर, मुरंबा इ. याशिवाय आवळा कच्चा किंवा उकडलेलाही खाल्ला जातो. असे म्हटले जाते की दररोज फक्त एक आवळा खाल्ल्यानेही तुमच्या आरोग्याला फायदा होतो.
गूळ
जर तुम्ही गोड खाण्याचे शौकीन असेल तर तुम्ही सर्वप्रथम आहारातून साखर काढून टाका आणि तुमच्या आहारात गुळाचा समावेश करा. गुळाच्या फक्त एका सर्व्हिंगने तुमची दिवसभराची लोहाची मागणी पूर्ण होऊ शकते. तसेच, जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर साखरेऐवजी गुळाचा समावेश करा, याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
चवळी
जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल किंवा तुम्हाला लोहयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर तुमच्या आहारात चवळीचा अवश्य समावेश करा. त्यात 26 ते 29 टक्के लोह असते. यामुळे तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता लवकर दूर होऊ शकते.
मनुके
मनुक्यांमध्ये लोहासोबत तांबे आणि जीवनसत्त्वे देखील आढळतात, जे रक्त निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यासाठी 8 ते 10 मनुके रात्री भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. याचा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदा होईल.
पालक
पालक हा अनेक पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. पालकाद्वारे स्नायूंच्या वाढीसाठी देखील हे प्रभावी मानले जाते. त्याच वेळी, असे म्हटले जाते की आठवड्यातून फक्त दोनदा पालक खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात आणि लोहाची कमतरता देखील दूर होते.