Join us   

Health Tips : वर्षातून एकदा करायलाच हव्यात 'या' ४ ब्लड टेस्ट्स; भविष्यातील धोक्याबाबत आधीच कळतील अनेक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 6:12 PM

Health Tips : ते. रक्त आपल्या संपूर्ण शरीरात आणि प्रत्येक अवयवातून प्रवास करत असल्याने, ते आपल्या अंतर्गत आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकते.

ठळक मुद्दे खूप कमी लोक असे आहेत जे वेळच्यावेळी चाचण्या करून आपल्या आरोग्याची काळजी घेतात. आपल्या जीवनासाठी रक्त ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे विविध अवयव, स्नायू आणि पेशींना पोषक आणि ऑक्सिजन पुरवते आणि टॉक्सिन्स आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर काढून टाकते.

आजारी पडल्यानंतर अनेकदा डॉक्टरकडे जाऊन, गोळ्या- औषधं खाऊनही बरं वाटत नसेल तेव्हाच लोक ब्लड करण्याकडे वळतात. खूप कमी लोक असे आहेत जे वेळच्यावेळी चाचण्या करून आपल्या आरोग्याची काळजी घेतात. आपल्या जीवनासाठी रक्त ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. रक्त विविध अवयव, स्नायू आणि पेशींना पोषक आणि ऑक्सिजन पुरवते आणि टॉक्सिन्स आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर काढून टाकते. रक्त आपल्या संपूर्ण शरीरात आणि प्रत्येक अवयवातून प्रवास करत असल्याने, ते आपल्या अंतर्गत आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा 4 टेस्ट्स सांगणार आहोत ज्या तुमच्या संपूर्ण शारीरिक आरोग्याबाबत सांगू शकतात.

कंप्लीट ब्लड काऊंट म्हणजेच CBC टेस्ट

संपूर्ण रक्ताची गणना आपल्या अनेक अवयवांच्या आरोग्याबद्दल सांगते, म्हणून ही एक महत्त्वाची चाचणी आहे. संपूर्ण रक्त गणना चाचणीद्वारे, आपल्याला यकृत, हृदय आणि किडनीबद्दल माहिती मिळते. या चाचणीमध्ये व्यक्तीच्या रक्तात असलेल्या पेशींची तपासणी केली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या रक्तात कमी किंवा जास्त रक्तपेशी असतील तर त्याला आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात.

इलेक्ट्रोलाइट्स/ किडनी फंक्शन टेस्ट

किडनी फंक्शन टेस्टद्वारे किडनीच्या आरोग्याबाबत माहिती मिळवता येऊ शकते. किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे कारण किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते आणि शरीरात असलेले विषारी पदार्थ काढून टाकते. हे घटक किडनी फंक्शन टेस्टमध्ये तपासले जातात - सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, बायकार्बोनेट, युरिया, क्रिएटिनिन इ.

थायरॉईड टेस्ट

थायरॉईड एक सायलेंट किलर आहे. हा रोग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो. जेव्हा हा रोग खूप धोकादायक होतो तेव्हा त्याची लक्षणे दिसतात. थायरॉईडची समस्या निद्रानाश, तणावासह आहारात सोडियम आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवते. अति सक्रिय थायरॉईड ग्रंथीमुळे हृदयरोग, वजन कमी होणे, थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच थायरॉईड चाचणी वेळीच करणं देखील खूप महत्वाची आहे.

कोलेस्ट्रॉलची चाचणी

कोलेस्टेरॉल चाचणीद्वारे हृदयाच्या आरोग्याची स्थिती कळते. या चाचणीमध्ये एचडीएलचे आकार आणि त्यांचे कण निश्चित केले जातात. ही चाचणी सहसा कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एचडीएल, एचलडीएल आणि कोलेस्टेरॉल/एचडीएल गुणोत्तर तपासते.

एचडीएलला हाय डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणतात. त्याची कमतरता हृदयरोगाचा धोका वाढवते. जर चाचणीमध्ये HDL कोलेस्टेरॉलची पातळी 60 mg/dl पेक्षा जास्त असेल तर हृदयरोगाचा धोका कमी असतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीचा एचडीएल स्तर 40 mg/dl  पेक्षा कमी असेल तर हृदयरोगाची शक्यता वाढते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहृदयविकाराचा झटका