Lokmat Sakhi >Health >Anemia > रोज सुकामेव्याचा खुराक, पालक-बिटचा मारा तरी हिमोग्लोबिन वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात २ चुका

रोज सुकामेव्याचा खुराक, पालक-बिटचा मारा तरी हिमोग्लोबिन वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात २ चुका

How to increase hemoglobin and iron levels diet tips by amita Gadre : सगळं नीट करुनही हिमोग्लोबिनची पातळी सतत कमीच का असते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 05:31 PM2024-10-16T17:31:03+5:302024-10-16T17:45:22+5:30

How to increase hemoglobin and iron levels diet tips by amita Gadre : सगळं नीट करुनही हिमोग्लोबिनची पातळी सतत कमीच का असते...

How to increase hemoglobin and iron levels diet tips by amita Gadre : Daily dose of dry fruits, spinach does not increase hemoglobin? Experts say 2 mistakes | रोज सुकामेव्याचा खुराक, पालक-बिटचा मारा तरी हिमोग्लोबिन वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात २ चुका

रोज सुकामेव्याचा खुराक, पालक-बिटचा मारा तरी हिमोग्लोबिन वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात २ चुका

आपल्याला सतत थकवा आल्यासारखं जाणवतं, अंगात त्राण नाही असं वाटतं. यामागे इतर कारणांबरोबरच रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी कमी असणं हेही एक महत्त्वाचं कारण असतं. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. मात्र ते न मिळाल्यास सततचा थकवा, चिडचिड, निस्तेजपणा, जीव घाबरल्यासारखे होणे अशा समस्या निर्माण होतात.  असं होऊ नये यासाठी आपण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात सुकामेवा, पालक, बीट, खजूर, नाचणी यांसारख्या सगळ्या गोष्टींचा समावेश करत असतो. तरीही चाचणी केल्यावर आपल्या रक्तात कमतरता असल्याचं दिसतं (How to increase hemoglobin and iorn levels diet tips by amita Gadre) . 

आता आहाराचे सगळे नियम पाळूनही असं का होतं असा प्रश्न आपल्याला पडतो. तर त्यामागे महत्त्वाची २ कारणे असतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच यासंबंधीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये आपण शरीराला लोह आणि हिमोग्लोबिन पुरवठा व्हावा यासाठी झटतो पण ते पुरेसे पडत नाही यामागची महत्त्वाची २ कारणं सांगितली आहेत. त्या २ गोष्टी नियमित पाळल्यास रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहते आणि त्यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या नकळत दूर होण्यास मदत होते. मुख्यत: महिलांच्या आहारात लोह मिळावे यासाठी उपयुक्त घटकांचा समावेश करुनही लोह आणि हिमोग्लोबिन कमी येतं. यामागे एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे शाकाहारी घटकांपासून आपल्याला नॉन-हिम प्रकारचे लोह मिळते. हे लोह शरीरात सहज शोषले जात नाही. 

सी व्हिटॅमिन

(Image : Google)
(Image : Google)

बरेचदा महिलांमध्ये लोहाबरोबरच व्हिटॅमिन सी चीही कमतरता असते. त्यामुळेही शरीरात लोहाची कमतरता उद्भवते. यासाठी आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी अशाप्रकारच्या फळांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवी. 

प्रोटीन्स

लोहाची पातळी कमी असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या आहारात असणारे प्रोटीन्सचे प्रमाण. शरीरात प्रोटीनचे प्रमाण कमी असेल तर शरीराची लोह साठवून ठेवण्याची क्षमता नकळत कमी होते. त्यामुळे आहारात प्रोटीनचे प्रमाण चांगले असायला हवे. 


Web Title: How to increase hemoglobin and iron levels diet tips by amita Gadre : Daily dose of dry fruits, spinach does not increase hemoglobin? Experts say 2 mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.