Join us   

हिमोग्लोबिन कमी झाल्यानं तुम्हालाही सतत थकवा येतो? न चुकता खा 'हे' पारंपरिक सूपरफूड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 9:46 AM

How to increase hemoglobin levels with diet : हिमोग्लोबिन कमी असेल तर शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम नीट होत नाही

महिलांना अनेकदा खूप थकवा येतो, घरातली कामं, सणवार, आजारपणं, पाहुणे, ऑफीस हे सगळं करता करता त्यांची तारेवरची कसरत होत असते. या सगळ्यानंतर पुरेसा आराम मिळाला नाही तर शरीर आणि मनही थकतं. इतकंच नाही तर शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्याचे एक महत्त्वाचे कारण असते. यामुळे नकळत खूप गळून गेल्यासारखे वाटणे, चिडचिड होणे अशा समस्या निर्माण होतात. महिलांमध्ये साधारणपणे डी व्हिटॅमिन, कॅल्शियम, बी १२ आणि लोह, हिमोग्लोबिन यांची कमतरता असल्याचे दिसते (How to increase hemoglobin levels with diet). 

लोह आणि हिमोग्लोबिन हे घटक एकमेकांशी कनेक्टेड असल्याने दोघांचे शरीरातील प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शरीराला लोहाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते  मात्र हिमोग्लोबिन कमी असेल तर आपल्याला आरोग्याशी निगडीत विविध समस्या उद्भवतात. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. मात्र हिमोग्लोबिन कमी असेल तर शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम नीट होत नाही आणि मग त्यामुळे सतत थकवा येतो. आपल्या शरीरात कमतरता आहे हे वेळीच लक्षात आलं तर त्यावर उपचार करणे सोपे होते.अन्यथा एकाएकी मोठी समस्या उद्भवते आणि मगच आपण जागे होतो. 

(Image : Google)

प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट नेहा रंगलानी हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात असायलाच हवा असा एक महत्त्वाचा घटक सांगतात. तो कोणता आणि त्यामुळे नेमके काय फायदे होतात पाहूया. तर अहळीव हा हिमोग्लोबिनसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असून ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी अहळीवाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. या बियांना लोहाचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १०० ग्रॅम अळीवाच्या बियांमधून १०० मिलीग्रॅम लोह मिळते. 

१. अळीवामध्ये फोलिक अॅसिडचे प्रमाणही चांगले असते. यामुळे रक्तातील लाल पेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 

२. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठीही अळीव उपयुक्त असतात. पोट साफ होण्यास या बियांचा चांगला उपयोग होतो. 

३. पाळीची सायकल नियमित नसेल तर आवर्जून अळीव खाण्याचा सल्ला दिला जातो. 

४. फुफ्फुसांची ताकद वाढण्यासाठी आणि हाडांची ताकद वाढण्यासाठीही हळीव फायदेशीर ठरतात. कारण यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. 

५. त्वचा आणि केसांचा पोत चांगला ठेवायचा असेल तरी तुम्ही रोजच्या रोज थोड्या प्रमाणात अळीव खायलाच हवेत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना