Lokmat Sakhi >Health >Anemia > How to Increase Red Blood Cell Count : रक्ताची कमतरता दूर करतात ५ पदार्थ; सप्लीमेंट्स, गोळ्या घेण्याची गरजच नाही भासणार

How to Increase Red Blood Cell Count : रक्ताची कमतरता दूर करतात ५ पदार्थ; सप्लीमेंट्स, गोळ्या घेण्याची गरजच नाही भासणार

How to Increase Red Blood Cell Count : लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असते, जे फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:00 PM2022-04-04T12:00:27+5:302022-04-04T12:03:09+5:30

How to Increase Red Blood Cell Count : लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असते, जे फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेते.

How to Increase Red Blood Cell Count : Include 5 foods and supplements in your diet to increase rbc | How to Increase Red Blood Cell Count : रक्ताची कमतरता दूर करतात ५ पदार्थ; सप्लीमेंट्स, गोळ्या घेण्याची गरजच नाही भासणार

How to Increase Red Blood Cell Count : रक्ताची कमतरता दूर करतात ५ पदार्थ; सप्लीमेंट्स, गोळ्या घेण्याची गरजच नाही भासणार

व्यवस्थित झोप घेऊनही तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला अॅनिमिया असू शकतो. जेव्हा तुमची लाल रक्तपेशींची संख्या (RBC) कमी असते तेव्हा अॅनिमिया होतो. जर तुमची RBC संख्या कमी असेल, तर तुमच्या शरीराला संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. आरबीसी मानवी रक्तातील सर्वात सामान्य पेशी आहेत. (Include 5 foods and supplements in your diet to increase rbc)

लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असते, जे फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेते. शरीर दररोज लाखो पेशींचे उत्पादन करते. (Bone Marrow) अस्थीमज्जेमध्ये आरबीसी तयार होतात. (low red blood cell count) कमी आरबीसी संख्येमुळे थकवा, चक्कर येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आम्ही तुम्हाला अशा पाच पौष्टिक पदार्थांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात.


 

आरबीसी काऊंट वाढवण्यासाठी लोह गरजेचं

पालेभाज्या, हिरव्या भाज्या,  सुका मेवा, बदाम आणि मनुका, बीन्स, शेंगा, अंड्याचा बलक फॉलिक एसिडही गरजेचं असतं. ब्रेड अन्नधान्य, डाळी, वाटाणे, काजू आहारात असायला हवे. जर तुम्हाला नेहमी अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी-12 समृद्ध असलेल्या गोष्टी वाढवाव्यात.

फक्त २ मिनिटात स्वच्छ होतील मळलेले, डाग पडलेले पांढरे शूज; 'या' ट्रिक्स वापरून शूज चमकवा

व्हिटॅमिन बी-12 शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आणि अॅनिमियापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. तांबे हे एक पोषक तत्व आहे जे थेट RBC उत्पादनास कारणीभूत ठरत नाही, परंतु ते आपल्या RBC ला आवश्यक असलेल्या लोहापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते. त्यासाठी अंडी, शेंगा, चेरी, काजू, व्हिटॅमिन ए सारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

पांढरे केस दिवसेंदिवस वाढत चाललेत? काळ्याभोर केसांसाठी १ उपाय, म्हातारे होईपर्यंत केस राहतील काळे

शरीरातील आरबीसीची पातळी वाढवण्यासाठी जे पोषक तत्व आवश्यक आहे. ते रेटिनॉल म्हणून ओळखले जाते, ते RBC उत्पादनास चालना देते. रताळे, गाजर, लाल मिरची, फळे, जसे की टरबूज, द्राक्षे यांचा समावेश आहारात केल्यास आरबीसी  काऊंट वाढण्यास मदत होते. 

Web Title: How to Increase Red Blood Cell Count : Include 5 foods and supplements in your diet to increase rbc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.