Join us  

डायबिटीस असेल तर अजिबात खाऊ नका ४ फळं; रक्तातील साखर वाढण्यास ठरतील कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2023 2:08 PM

Avoid 4 Fruit Which Increase Blood Sugar levels : आहार हा डायबिटीसमधील अतिशय महत्त्वाची गोष्ट असून त्याकडे लक्ष द्यायला हवे.

डायबिटीस ही अशी समस्या आहे ज्यामुळे आपल्या खाण्यापिण्यावर खूप बंधनं येतात. डायबिटीस ही  मुळात जीवनशैलीविषयक समस्या असल्याने आपला आहार, व्यायाम, झोप, ताणतणाव, अनुवंशिकता या सगळ्यांचा त्यात अतिशय महत्त्वाचा रोल असतो. डायबिटीस म्हणजेच रक्तातील साखर वाढते म्हटल्यावर सगळ्यात आधी गदा येते ती आपल्या आहारावर. सग साखर, गूळ बंद, भात बंद, मैद्याचे पदार्थ बंद अशी बरीच बंधने डायबिटीस असलेल्या व्यक्तीला घातली जातात. इतकेच नाही तर बहुतांशवेळा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे, इन्शुलिन यांचीही मदत घेतली जाते. पण तरीही काहीवेळा साखरप म्हणावी तशी नियंत्रणात येतेच असं नाही (Avoid 4 Fruit Which Increase Blood Sugar levels). 

डायबिटीसमुळे आरोग्याच्या इतरही बऱ्याच समस्या वाढत असल्याने तो नियंत्रणात ठेवणे हा एक मोठा टास्क असतो. शुगरमुळे हळूहळू इतर अवयवांवर परीणाम होतो आणि ते निकामी होण्यास सुरुवात होते. असे होऊ नये तर साखर नियंत्रणात ठेवणे हा एकमेव उत्तम उपाय आहे हे लक्षात ठेवायला हवे. फळं हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक असून त्यातून आरोग्याला बरेच आवश्यक घटक मिळत असतात. पण डायबिटीस असेल तर कोणती फळं खाऊ नयेत हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे. याचा शुगर नियंत्रणात राहण्यास चांगला फायदा होतो. 

(Image : Google )

१. आंबा

आंबा हा फळांचा राजा असून वर्षातील २ ते ३ वर्षेच आपण आंबा खातो. मात्र एका आंब्यामध्ये १४ ग्रॅम साखर असल्याने रक्तातील साखर वाढण्यास आंबा कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे आंबा कितीही आवडत असला तरी डायबिटीस असणाऱ्यांनी विचार करुन आंबा खायला हवा. 

२. केळं 

केळं थोडं कच्चट असेल तर ठिक आहे. पण पिकलेलं केळं प्रमाणापेक्षा जास्त गोड असते. अशा केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ७० ते १०० च्या दरम्यान असतो. केळं सहज उपलब्ध होणारे फळ त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी शक्यतो केळं खाऊ नये.

३. अननस

अननसात जवळपास १६ ग्रॅम शुगर असते. तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो. त्यामुळे आंबटगोड असलेले अननस कितीही आवडत असले तरी शुगर असणाऱ्यांनी हे फळ खाणे टाळावे.

(Image : Google )

४. लिची 

लिची हे अतिशय चविष्ट असे फळ गेल्या काही वर्षांपासून भारतात मिळू लागले. पाणीदार आणि चवीला गोड असलेल्या या फळातही साखरेचे प्रमाण १६ ग्रॅम असते. त्यामुळे लिचीतून पाणी मिळते असे वाटत असेल तरी साखरही मिळत असल्याने हे फळ डायबिटीस असलेल्यांनी शक्यतो खाऊ नये. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह