Lokmat Sakhi >Health > सततच्या सर्दी- खोकल्याने वैतागलात? १ आयुर्वेदिक उपाय करा, २ दिवसांतच मिळेल आराम- कफ होईल कमी

सततच्या सर्दी- खोकल्याने वैतागलात? १ आयुर्वेदिक उपाय करा, २ दिवसांतच मिळेल आराम- कफ होईल कमी

Ayurvedic Home Remedies For Cold, Sour Throat And Cough: सर्दी- खोकल्याचा त्रास घालविण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा. या उपायामुळे घसादुखीही कमी होईल तसेच रोग प्रतिकारक शक्तीही वाढेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 02:03 PM2023-11-22T14:03:50+5:302023-11-22T14:05:04+5:30

Ayurvedic Home Remedies For Cold, Sour Throat And Cough: सर्दी- खोकल्याचा त्रास घालविण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा. या उपायामुळे घसादुखीही कमी होईल तसेच रोग प्रतिकारक शक्तीही वाढेल.

Ayurvedic home remedies for cold, sour throat and cough, Immunity booster kadha for winter, How to boost immunity in winter, Ayurvedic kadha for throat infection  | सततच्या सर्दी- खोकल्याने वैतागलात? १ आयुर्वेदिक उपाय करा, २ दिवसांतच मिळेल आराम- कफ होईल कमी

सततच्या सर्दी- खोकल्याने वैतागलात? १ आयुर्वेदिक उपाय करा, २ दिवसांतच मिळेल आराम- कफ होईल कमी

Highlightsसकाळी नाश्त्यानंतर आणि संध्याकाळच्या वेळी हा काढा प्यावा.

हिवाळा सुरू झाला की घरोघरी सर्दी- खोकला- घसादुखी- कफ असे त्रास सुरू होतात. शिवाय सर्दीचं दुखणं लगेच एकाकडून दुसऱ्याला होतं. त्यामुळे मग एकेक करत घरातले सगळेच या दुखण्याने वैतागून जातात. तुम्हालाही असा त्रास होत असेल किंवा घरातली कोणती व्यक्ती सर्दी- खोकला- घसादुखी या त्रासाने हैराण असेल तर त्यांना हा एक आयुर्वेदिक काढा देऊन पाहा. अगदी २ दिवसांतच आराम मिळेल. शिवाय हा काढा नियमितपणे घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते (Immunity booster kadha for winter), असं हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे.(Ayurvedic kadha for throat infection, cold and cough)

 

सर्दी- खोकला कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

सर्दी- खोकला- घसादुखी कमी करण्यासाठीचा हा उपाय dr_alamelumangai या इन्स्टाग्राम पेजवर एका योगा आणि नॅचरोपॅथी अभ्यासकांनी शेअर केला आहे.

वेटलॉससाठी हिवाळ्यातले 'हे' ५ सुपरफूड खायला विसरू नका

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आल्याचा साधारण १ इंचाचा तुकडा, २ टीस्पून मिरे, १ टीस्पून धने, १ टीस्पून जीरे, १ टीस्पून ओवा आणि विड्याची २ ते ३ पाने लागणार आहे. विड्याच्या पानांचा आकार मोठा असेल तर २ घ्या आणि लहान असतील तर ४ घ्या.

 

एका खलबत्त्यामध्ये वरील सगळं साहित्य टाका आणि ते बारीक कुटून घ्या.

आता एका पातेल्यात १ ग्लास पाणी घ्या. त्यात आपण कुटलेले पदार्थ आणि ५ ते ६ तुळशीची पानं टाका. पाणी ५ ते ७ मिनिटे चांगले खळखळून उकळून घ्या. यानंतर ते गाळून घ्या आणि गरमागरम काढा प्या. 

सुर्यनमस्कार करताना बरेच जण 'या' ५ चुका करतात, तुम्ही पण चुकताय का?- एकदा तपासून पाहा 

चवीसाठी आणि काढ्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही त्या गुळाचा लहानसा खडाही टाकू शकता. 

सकाळी नाश्त्यानंतर आणि संध्याकाळच्या वेळी हा काढा प्यावा. मोठ्या व्यक्तींनी ५० मिली तर लहान मुलांनी २५ मिली एवढा काढ्याचा डोस घ्यावा. 

 

Web Title: Ayurvedic home remedies for cold, sour throat and cough, Immunity booster kadha for winter, How to boost immunity in winter, Ayurvedic kadha for throat infection 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.