Lokmat Sakhi >Health > मिठात भेसळ आहे हे कसे ओळखाल? बाबा रामदेव सांगतात १ सोपी ट्रिक

मिठात भेसळ आहे हे कसे ओळखाल? बाबा रामदेव सांगतात १ सोपी ट्रिक

Baba Ramdev told 1 easy method to identify fake salt : मीठ जेवणात हवेच, पण त्यात भेसळ असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2023 05:39 PM2023-12-12T17:39:40+5:302023-12-12T17:40:24+5:30

Baba Ramdev told 1 easy method to identify fake salt : मीठ जेवणात हवेच, पण त्यात भेसळ असेल तर..

Baba Ramdev told 1 easy method to identify fake salt | मिठात भेसळ आहे हे कसे ओळखाल? बाबा रामदेव सांगतात १ सोपी ट्रिक

मिठात भेसळ आहे हे कसे ओळखाल? बाबा रामदेव सांगतात १ सोपी ट्रिक

आजकाल बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. भेसळयुक्त पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. या पदार्थांमध्ये मिसळलेले विष हळूहळू शरीरात जाते आणि अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देते. भेसळयुक्त पदार्थांमध्ये बऱ्याच पदार्थांचा समावेश आहे. भेसळयुक्त मीठ (Fake Salt) खाल्ल्याने मेंदू, किडनी, यकृत आणि पचनसंस्थेचे नुकसान होते. पण मिठात देखील भेसळ होते का? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल?

मिठाशिवाय अन्नाला चव नाही. मीठ घालताच पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. पण मिठातही भेसळ केली जाते. त्यात घातक रसायनांची मोठ्या प्रमाणात भेसळ होते. त्यामुळे असली आणि नकली मीठ ओळखण्यात अनेकांची धांदल उडते. जर आपल्याला असली आणि नकली मिठातील फरक जाणून घ्यायचं असेल तर, योग गुरु स्वामी बाबा रामदेव (Swami Ramdev Baba) यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे आपण भेसळयुक्त मीठ न खाता, शुद्ध मीठ खाऊ शकता(Baba Ramdev told 1 easy method to identify fake salt).

बनावट मीठ ओळखण्यासाठी टिप्स

बटाटा

- बटाट्याचा वापर करून आपण बनावटी आणि असली मिठातील फरक शोधून काढू शकता.

- बटाट्याचे दोन तुकडे करा. एका बटाट्याच्या तुकड्यावर मीठ किंवा सैंधव मीठ ठेवा. दुसऱ्या बटाट्याच्या तुकड्यावर इतर कोणत्याही ब्रॅण्डचं मीठ ठेवा.

पपई खाल्ल्याने खरंच मासिक पाळी लवकर येते? काय खरं-काय खोटं? तज्ज्ञ सांगतात पपई कधी आणि कशी खावी?

- जर काही वेळानंतर बटाट्याचा रंग बदलला तर, समजून जा ते भेसळयुक्त मीठ आहे.

- जर मीठ शुद्ध असेल तर, बटाट्याचा रंग बदलणार नाही.

यासंदर्भात बाबा रामदेव सांगतात, 'मिठाच्या भेसळीचा मोठा खेळ बाजारात सुरू आहे. व्यापारी सामान्य मिठात रंग मिसळून त्याला सैंधव मीठ म्हणून बाजारात विकतात. जर पाण्यात घालताच रंग मिठातून निघत असेल तर, समजून जा ते मीठ भेसळयुक्त आहे.'

नकली मीठ खाण्याचे नुकसान

बनावट मीठामध्ये अनेक प्रकारच्या रसायनांची भेसळ केली जाते, ज्यामुळे शरीराला हानी पोहोचते. भेसळयुक्त मीठ खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे किडनी स्टोन, संधिवात, यकृताच्या निगडीत समस्या निर्माण होऊ शकते.

मुठभर मुरमुरे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पचन सुधारेल-वजनही होईल कमी, हाडांना मिळेल बळकटी

उत्तम आरोग्यासाठी चिमुटभर मीठ का गरजेचं?

आयोडीनयुक्त मीठ कमी प्रमाणात खायला हवे. पण आहारातून वगळू नये. यामुळे आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डरपासून बचाव होतो. मेंदू आणि शरीराच्या चांगल्या विकासासाठी आणि शरीराचे तापमान राखण्यासाठी आयोडीन महत्त्वाची भूमिका बजावते.

Web Title: Baba Ramdev told 1 easy method to identify fake salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.