Lokmat Sakhi >Health > दातांवर पिवळा-जाड थर दिसतो? रामदेव बाबा सांगतात १ आयुर्वेदीक उपाय, पांढरेशुभ्र चमकतील दात

दातांवर पिवळा-जाड थर दिसतो? रामदेव बाबा सांगतात १ आयुर्वेदीक उपाय, पांढरेशुभ्र चमकतील दात

Simple Ayurvedic Remedy To Get Rid Of Yellow Teeth : हळदीत थोडं मीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांना आणि हिरड्यांना लावून हलक्या हातानं घासा.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:26 PM2024-11-13T12:26:23+5:302024-11-13T12:35:02+5:30

Simple Ayurvedic Remedy To Get Rid Of Yellow Teeth : हळदीत थोडं मीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांना आणि हिरड्यांना लावून हलक्या हातानं घासा.

Baba Ramdev Told A Simple Ayurvedic Remedy To Get Rid Of Yellow Teeth Toothache Bleeding Gums | दातांवर पिवळा-जाड थर दिसतो? रामदेव बाबा सांगतात १ आयुर्वेदीक उपाय, पांढरेशुभ्र चमकतील दात

दातांवर पिवळा-जाड थर दिसतो? रामदेव बाबा सांगतात १ आयुर्वेदीक उपाय, पांढरेशुभ्र चमकतील दात

डेंटल हेल्थकडे (Dental Health) आजकाल प्रत्येकाकडूनच दुर्लक्ष केलं जातं. याच कारणामुळे अनेकजण कोणत्या ना कोणत्या दातांच्या समस्येनं त्रस्त असतात (Oral Teeth Care Tips). आजकाल फक्त वयस्कर लोकच नाही तर तरूणांनाही डेंटल प्रोब्लेम्सचा सामना करावा लागत आहे.  मजबूत सुंदर दात फक्त सुंदरता वाढवत नाहीत तर चांगल्या आरोग्याची निशाणी आहेत. जर तुम्ही अशा लोकांमध्ये असाल की ज्यांचे दात खूपच हलतात, हिरड्या कमकुवत झाल्या आहेत तर योगगुरू बाबा रामदेव (Yogguru Baba Ramdev) यांनी सांगितलेले आयुर्वेदीक उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. ज्यामुळे तुमच्या हिरड्या मजबूत होतील. दातांना मजबूत करण्यासाठी आयुर्वेदीक  उपाय कोणते ते समजून घेऊ. (Baba Ramdev Told A Simple Ayurvedic Remedy To Get Rid Of Yellow Teeth Toothache Bleeding Gums)

या उपायासाठी कोणकोणत्या वस्तू तुम्हाला लागतील

तुरटी, सैंधव मीठ, हरड, आवळा, बाभूळाची काडी, कडुलिंबाची काडी, लवंग, हळद हे साहित्य तुम्हाला लागेल. एक मोठ्या भांड्यामध्ये तुरटी घालून पाणी गरम करून घ्या. नंतर वर दिलेल्या वस्तू वाटून घ्या. हे सर्व पदार्थ तुरटीच्या पाण्यासोबत  एकजीव करून घ्या. हे मिश्रण दातांवर वापरण्यासाठी सगळ्यात आधी  हातावर थोडं मिश्रण घ्या, नंतर बोटानं दातांवर ५ मिनिटं रगडून घ्या.  ५ मिनिटांनी व्यवस्थित गुळण्या करा. 

कडुलिंबाची  काडी

कडुलिंबाच्या काडीचा तुम्ही वापर करू शकता. यात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. जे दातांना मजबूत बनवतात. ज्यामुळे किटाणूंपासून दूर राहण्यास मदत होते.  याच पद्धतीनं तुम्ही लवंगाचाही वापर करू शकता. दातांमध्ये वेदना झाल्यास दात मजबूत बनवण्यासाठी तुम्ही लवंगाचे तेल किंवा लवंग दातांवर रगडू शकता. यात एंटीइंफ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरिअल गुण असतात  जे दातांना सुरक्षा देतात.


हळद

हळदीत थोडं मीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांना आणि हिरड्यांना लावून हलक्या हातानं घासा. हळदीत एंटीसेप्टीक गुण असतात. ज्यामुळे हिरड्यांची सूज आणि संक्रमण कमी होते. याव्यतिरिक्त त्रिफला पावडर पाण्यात मिसळून या पाण्यानं गुळण्या करा. ज्यामुळे हिरड्या आणि दात मजबूत होण्यास मदत होईल.

Web Title: Baba Ramdev Told A Simple Ayurvedic Remedy To Get Rid Of Yellow Teeth Toothache Bleeding Gums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.