एकदा पोट सुटलं की ते कमी करणं खूपच कठीण जातं. जास्त कॅलरीजयुक्त पदार्थ खाणं, वजन कमी करण्यात अडथळा आणते. योग्य डाएट, व्यायाम आणि हेल्दी रूटीन सुरू केल्यास वजन कमी करणंसों होऊ सकतं. थायरॉईड, पीसीओडी या कारणांमुळे वजन वाढत जातं. (Belly Fat Loss Tips) लटकलेलं पोट घेऊन कुठेही जायला लाजिरवाणे वाटते. अनेकदा चुकीच्या खाण्यापिण्याच्या परिणाम शरीरावर दिसून येतो. आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ नंदिनी यांनी ४ उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला केल्यानं तुम्हाला शरीरात बदल दिसून येईल. (4 Natural Methods To Reduce Belly Fat According To dietitian And Nutritionist)
हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार एप्पल सायडर व्हिनेगर ताज्या सफरचंदांपासून काढले जाते. एप्पल सायडर कमी प्रमाणात सप्लिमेंट्सच्या माध्यमातून घेतले जाते. २००९ मध्ये १७५ लोकांवर प्रयोग करण्यात आला. जे रोज १ ते २ टेबलस्पून व्हिनेगर रोज घेत होते त्यांचे ३ महिन्यांनंतर २ ते ४ पाऊंड वजन कमी झाल्याचे दिसून आले. हजारो वर्षांपासून एंटीबायोटीक्स, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, डिटॉक्सिफिकेशनसाठी व्हिनेगरचा वापर केला जात आहे याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जेवणानंतर १ ते २ टिस्पून घेतल्यास फरक जाणवतो.
ओटीपोट सुटलं-मांड्याही जाडजूड झाल्या? पाहा आहारात काय बदल करायचा-महिनाभरात दिसेल फरक
पोटाची हट्टी चरबी कमी करण्यासाठी एप्पल सायडर व्हिनेगर एक चांगला उपाय आहे. दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या अर्धा तास आधी १ चमचा एप्पल साडयर व्हिनेगर कोमट पाण्यासोबत तुम्ही पिऊ शकता. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि पोटाची चरबी वितळण्यास मदत होते. याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास एलर्जी होऊ शकते. याची काळजी घ्यायला हवी.
लटकलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही झोप पूर्ण घेणं फार गरजेचं आहे. झोप पूर्ण न घेण्याचं कारण ताण-तणाव असू शकते. यामुळे मेटाबॉलिझ्म स्लो होतो आणि याच कारणामुळे फॅट बर्न करणं कठीण होतं.
बेली फॅट कमी करण्यासाठी ओव्याचा चहासुद्धा फायदेशीर ठरतो. ओवा मेटाबॉलिझ्म वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करतो. ज्यामुळे वाढलेलं वजन कमी होते.
..तर आपल्या आईचं सुद्धा ऐकू नका; काजोल सांगतेय आई झाल्यानंतरच्या मानसिक दबावाचा अनुभव
खासकरून पोट आणि कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळतो. चरबी कमी करण्यासही मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही प्लँक व्यायाम करू शकता. यामुळे पोट आणि कंबरेची चरबी कमी होते. रोज दिवसांतून २ वेळा हा व्यायाम करा.