Lokmat Sakhi >Health > डायबिटिस कंट्रोलसाठी सद्गुरू नाश्त्याला खातात 'हा' पदार्थ; तुम्हीही खा-कधीच वाढणार नाही डायबिटीस

डायबिटिस कंट्रोलसाठी सद्गुरू नाश्त्याला खातात 'हा' पदार्थ; तुम्हीही खा-कधीच वाढणार नाही डायबिटीस

Best breakfast for diabetes control (Sugar Control Sathi Nashta) : शेंगदाणे आणि केळी या पदार्थांचा आहारात समावेश करून सद्गुरू स्वत:ला एनर्जेटिक ठेवतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 01:55 PM2023-12-06T13:55:52+5:302023-12-06T16:28:33+5:30

Best breakfast for diabetes control (Sugar Control Sathi Nashta) : शेंगदाणे आणि केळी या पदार्थांचा आहारात समावेश करून सद्गुरू स्वत:ला एनर्जेटिक ठेवतात. 

Best Breakfast for Diabetes Control : Sadhguru Jaggi Vasudev Breakfast to Control Blood Sugar Level | डायबिटिस कंट्रोलसाठी सद्गुरू नाश्त्याला खातात 'हा' पदार्थ; तुम्हीही खा-कधीच वाढणार नाही डायबिटीस

डायबिटिस कंट्रोलसाठी सद्गुरू नाश्त्याला खातात 'हा' पदार्थ; तुम्हीही खा-कधीच वाढणार नाही डायबिटीस

डायबिटीस (Diabetes) ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहत नाही. लोक शुगर कंट्रोलसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. (Best breakfast for diabetes control) अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सोपे उपाय सांगितले आहेत. सोशल मीडियावर ते नेहमीच फिटनेस आणि आहाराशी निगडीत  व्हिडिओज शेअर करत असतात. (Sadhguru Jaggi Vasudev Breakfast to Control Blood Sugar Level)

सद्गुरू ब्लड शुगर नियंत्रण ठेवण्यासाठी नाश्त्यात हेल्दी पदार्थांचे सेवन करतात. ब्रेकफास्टमध्ये ते स्प्राऊटेड मेथी, मूंग डाळ, हिरव्या चण्यांचे सेवन  करतात. सद्गुरू यांच्या मते नाश्त्याला हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात. त्यांचा ब्रेकफास्ट खूपच कमी आणि हेल्दी असतो. मेथी दाणे खाल्ल्याने रक्त स्वच्छ राहते याशिवाय शरीराला मिनरल्स, व्हिटामीन्स आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात मिळतात. (Sadhguru's breakfast for healthful living)

डायबिटीस कंट्रोलसाठी नाश्त्या काय खायला हवे? (Breakfast Ideas For Sugar Control)

सद्गुरूंच्यामते ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्याला नट्स, सीड्स, शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. भिजवलेले बदाम आणि मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.  ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होत नाहीत. याशिवाय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. आहारात धान्यांचा समावेश केल्यास शुगर नियंत्रणातत राहण्यात मदत होते.

प्रोटीन्स शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मासंपेशींच्या विकासासाठी आवश्यक असतात. शेंगदाणे आणि इतर ड्रायफ्रुट्समध्ये प्रोटीन्स असतात ज्यामुळे जास्तवेळ पोट भरल्यासारखं वाटतं. रात्री भिजवून सकाळी सालं काढून शेंगदाणे खा ज्यामुळे शरीरातील कमकुवतपणा कमजोरी निघून शरीराला उर्जा मिळते. शेंगदाणे खाल्ल्यास शरीरातील प्रोटीन्सची कमतरता दूर होण्यास मदत होते. यातील एंजाईम्स शरीराच्या कार्यासाठी चांगले ठरतात.

शेंगदाणे आणि केळी या पदार्थांचा आहारात समावेश करून सद्गुरू स्वत:ला एनर्जेटिक ठेवतात.  शुगर वाढू नये यासाठी सगळ्या आधी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या हेल्दी पदार्थाचा आहारात समावेश करा. नियमित व्यायाम करा आणि अन्य शारीरिक एक्टिव्हिजचा समावेश करा. भरपूर झोप घ्या आणि जास्तीत जास्त पाणी प्या. 

Web Title: Best Breakfast for Diabetes Control : Sadhguru Jaggi Vasudev Breakfast to Control Blood Sugar Level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.