Lokmat Sakhi >Health > सतत खाण्याची इच्छा होते? कितीही कण्ट्रोल केलं तरी स्वतःवरचा ताबा सुटतोय? हा खाण्याचा नेमका नवा आजार कोणता?

सतत खाण्याची इच्छा होते? कितीही कण्ट्रोल केलं तरी स्वतःवरचा ताबा सुटतोय? हा खाण्याचा नेमका नवा आजार कोणता?

Binge-eating disorder - Symptoms and causes : बिंज ईटिंग म्हणजे काय? सतत खाण्याची इच्छा का होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 04:00 PM2023-09-29T16:00:27+5:302023-09-29T16:02:11+5:30

Binge-eating disorder - Symptoms and causes : बिंज ईटिंग म्हणजे काय? सतत खाण्याची इच्छा का होते?

Binge-eating disorder - Symptoms and causes | सतत खाण्याची इच्छा होते? कितीही कण्ट्रोल केलं तरी स्वतःवरचा ताबा सुटतोय? हा खाण्याचा नेमका नवा आजार कोणता?

सतत खाण्याची इच्छा होते? कितीही कण्ट्रोल केलं तरी स्वतःवरचा ताबा सुटतोय? हा खाण्याचा नेमका नवा आजार कोणता?

Highlightsसतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. खाल्ल्यानंतरही भूक भागात नाही, असे का होते? यालाच बिंज ईटिंग असे म्हणतात.

निरोगी आरोग्यासाठी वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे. पण कधी कधी जीवनशैली (Lifestyle) बिघडते. ज्यामुळे नकळत गंभीर आजाराचे शिकार आपण होतो. अनकेदा काहीच खाण्याची इच्छा होत नाही. तर कधी सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. खाल्ल्यानंतरही भूक भागात नाही, असे का होते? यालाच बिंज ईटिंग (Binge Eating) असे म्हणतात. हा एक प्रकारचा इटिंग डिसऑर्डर आहे. हा आजार महिला, पुरुष कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. सर्वात जास्त युवा पिढीमध्ये ही समस्या आढळून येते.

पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांच्या मते, 'ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये आपल्याला भूक कण्ट्रोल होत नाही. भूक नसतानाही आपल्याल सतत काही ना काहीतरी खाण्याची इच्छा होते. हे पदार्थ खाताना आपल्यात गिल्ट फीलिंग निर्माण होते. तरी देखील आपण खाणं सोडत नाही. ही समस्या जास्त प्रमाणात अधून-मधून किंवा वारंवार होऊ शकते'(Binge-eating disorder - Symptoms and causes).

ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी

नकारात्मक भावना

राग, एकटेपणा, कंटाळवाणे जीवन, चिंता आणि तणाव या काही नकारात्मक भावना आहेत, ज्यांना मॅनेज करणे खूप कठीण जाते. ज्यामुळे आपल्यावर कोणतातरी दबाव असल्यासारखे वाटते. अशा वेळी आपल्याला सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात अन्न खावेसे वाटते. बिंज ईटिंग केल्याने आपल्याला पॉवरफूल इमोशनपासून ब्रेक मिळतो. मात्र, ही सवय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीस टाळायला हवे.

नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

भावनांवर नियंत्रण ठेवणे होते कठीण

जेव्हा बरेच लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात, तेव्हा ते स्वतःवर अनेक बंधने लादतात. अनेकदा इच्छा असूनही लोकं आवडीचे पदार्थ खाण्यास टाळतात. अशा पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन वाढण्याची भीती असते. काही लोकांचे वजन कमी जास्त होत असते. यामागचे कारण स्वतःवरचे कण्ट्रोल कमी होणे. अशा वेळी त्यांच्याकडून ऑव्हरइटिंग होते. त्यामुळे अन्न पूर्णपणे सोडू नका, पोर्शनमध्ये कण्ट्रोल ठेवा. 

Web Title: Binge-eating disorder - Symptoms and causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.